Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/713

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सन्निसावा ६८७ नाह पेदाभिनिर्मुक सूर्यो वाऽभ्युदितोऽमुया ! मुपितो वर्षपूगाना यताहानि गतान्युत ॥ ८ ॥ . नरदेहाचे आयुष्यक्षण न मिळे देता कोटी सुपर्ण । तें म्या नाशिले सपूर्ण । आपणया आपण नाडिले ॥ १९॥ साधूंचिया निजस्वार्था । साधूनि द्यावया उगवे सविता । निमेपोन्मे परमार्था । साधक तत्तता साधिती ॥ १२० ॥ तोचि सविता सकामासी । आयुष्य हरी अहर्निशीं । हे न कळे ज्याचे त्यासी । नरकपातासी निजमूल ॥२१॥ पुढिलाची गोठी ते कायसी । मीच नाडलों उर्वशीसीं । हासू झाला आयुष्यासी । है हानि कोणासी सागाची ॥ २२ ॥ जनाचिया हितासी वाहिला । सूर्यो अनुदिनी उगवला । ते मी नेणेचि दादलो । उर्वशीकामै भुलला उन्मत्त ॥ २३ ॥ सूर्याचा उदयो अस्तमान । चही लोटल्या नाही ज्ञान । करिता उर्वशीचे अधरपान । तेणे मदें सपूर्ण मातलो ॥२४॥ मयंमद उत्तरे दिनातीं । धनमद जाय निर्धनस्थिता । तारुण्यमदू जाय क्षीणशक्ती । स्त्रीमदप्राप्ती कदा नुतरे ।। २५ ।। नरदेहाची आयुष्यकथा । पुढती दुर्लभ न लगे हाता । जळो हे उर्वशी देवकाता । इणेचि तत्त्वता नागविलो ॥२६॥ मी निर्भय रक्षिता सांसी। त्या मज नागविले उर्वशी । हे लाज सागो कोणापाशी । उकसावुकसी स्फुदत ॥ २७ ॥ माझ्या निजहिताचा चोरू। हे उर्वशी जीवे मारूं । सवैचि उपजला विचारू येथ मीचि पामरू अविवेकी ॥ २८ ॥ मग ह्मणे कटकटा । सृष्टीमाजी मी करटा । आयुष्य नाशिलें कामचेप्टा । अपाय मोटा मज झाला ॥ २९ ॥ मग ऑकदे अति गर्जोनी । काम नौगविली आयुष्य हरोनी । याहीहोनि अधिक हानी । पाहता ये जर्नी असेना ॥ १३० ॥ अहो मे आरमसमोहो यारमा योपिता कृत ! फ्रीडामृगश्चक्रवर्ती नरदेवशिखामणि ॥ ९ ॥ राजे मुकुटाचे प्रतापी पूर्ण । माझ्या चरणा येती गरण । तो मी वेश्येचे धरौं चरण । हे निर्लज्जपण म्यां केले ॥ ३१ ॥ मज पुरूरव्याचे आज्ञेवरी । राजे नाचती चराचरौं । तो मी वेश्येचे आज्ञेवरी । श्वानांचेपरी वर्तलो ।। ३२ ॥ जैसे वानर गारुड्याचे । तैसा स्त्रियेचेनि छदै नाचें । माझ्या चक्रवतीपणाचें । अतिनिध साचे फळ झाले ॥३३॥ सकळ राजे मज देती सन्मान । भूपति सदा वदिती चरण । तो मी झालों स्त्रियेअधीन । हीनदीन अतिरक ॥ ३४ ॥रासता स्त्रियेचा रसरगप्रेम । पाया पडणे हे अनुचित कर्म । हणती ते जळो जन सकाम । हेचि धाडी परम कामाची ॥ ३५ ॥ वलयांकित मी चक्रवर्ती । तोही योपिता घातलों आवर्ती । त्याचि आवर्ताची स्थिती । स्वमुखें भूपति अनुवादे ॥ ३६॥ सपरिच्छदमारमान हिना तृणमिवेश्वरम् । यान्ती स्त्रिय चान्यगम नग उन्मत्तवद्दन् ॥ १०॥ केवळ साकार मायान्त्रम । यालागी प्रर्मदा स्त्रीचें नाम । सर्ग ठकिले उत्तमोत्तम। स्त्रीसभ्रम वाढविता ।। ३७ ॥ अमदा अबरें अलकार । हैं मायेचें सोलीव' सार। एथ भलले थोरथोर । मीही पामर स्त्रीसगै ॥ ३८ ॥ माझीच मज करणी । दिसतसे दैन्य १ मिळवून २ज्याचे मानसी ३ नाश ४ निश्चित, प्रेमा ५ स्वामी, पति, राजा 'पुरुष होऊन' अध रोष्ठाच चुचन ७ मद्याचा मद ८ दारियाकाळी ९ कर दादन रडू लागला १० दीन, मूर्षे ११ हाय हाय १२ अपाय, हानी १३ आरडाओरड करी १४ फसला गेलो १५ कुश्यासारखा १६ सरोखर १७ अनुकूलता १८ हहा १९ समुद्रवलयाक्ति पृथ्वीचा २० भावच्यात २१ अत्यत प्रमाद करनिणारी ह्मणून बीला भगदा झणतात ०२ व २३ गा क्यातील, अतस्थ, सरसर