पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/700

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६७६ एकनाथी भागवत राजस ॥ ३७॥ जेथ साधुनिंदा जोडे । जेथ गुणदोपी दृष्टि वाढे । ऐशिया ठायी वस्ती आवडे । तें तामसाचे गाढ़ें निवासस्थान ॥ ३८ ॥ जेथ कलहाचे कारण । जेथ अविवेकी होय मन । वेश्या द्यूत मद्यसदन । हे निवासस्थान तामस ॥ ३९ ॥ देवालयीं घवघविती। देखोनि माझी निजमूर्ती । सांचार सुखाचे चित्तवृत्ती । ते निर्गुण वस्ती उद्धवा ॥ ३४० ॥ अभेदभक्तांचे निजमंदिर । ते मज निर्गुणाचें निजघर । तेथ सुखत्वे ज्याची वृत्ती स्थिर । ते वस्ती साचार निर्गुण ॥ ४१ ॥ निर्गुणासी घरठावो । हे बोलणे झणसी वावो । जेथ उपजे ब्रह्मसद्भावो । ते वस्ती पहा वो निर्गुण ॥ ४२ ॥ विषयातीत निजस्थिती । सुखें सुखरूप राहे वृत्ती । ते निर्गुणाची निजवस्ती । जाण निश्चिती उद्धवा ॥४३॥ सांडूनि आकाराचे ज्ञान । निराकारी सुखसपन्न । वृत्ति स्थिरावे परिपूर्ण । ते वस्ती निर्गुण जर्नी विजनी ॥४४॥ त्रिगुणसमें त्रिविध कर्ता । निर्गुणलक्षणी लक्षिजे चौथा । चतुर्विध कर्त्यांची व्यवस्था । ऐक आतां सागेन ।। ४५॥ सात्विक कारकोऽसद्धी रागान्धो राजस स्मृत । तामस स्मृतिविभ्रष्टो निर्गुणो मदपाश्चय ॥ २६ ॥ कादेनि कांटा फेडितां । जेवी निवारे निजव्यथा । तेवीं सगे सगातें छेदितां । सात्विकता असगी ॥४६॥ सद्गुरुचरणसत्सगें । सकळ सग छेदी विरागें। सात्विक कर्ता निजांगें । विपयसमें असगी ।। ४७ ॥ फळामिलापेच्या चित्तीं गांठी । तेणे अंध झाली विवेकदृष्टी । राजस कर्ता फळाशेसाठी । अतिदुःखकोटी स्वयें सोशी ॥४८ ॥ निःशेष हारपे विवेकज्ञान । स्मृति सैरी बळंघे रान । नाठवे कार्य कारण । ऐसा कर्ता जाण तामस ॥४९॥ अनन्य भावे हरीसी शरण । कर्मचाळक श्रीनारायण । कदा न धरी कर्माभिमान । हा कर्ता निर्गुण निश्चयें ॥ ३५० ॥ त्रिगुणाची श्रद्धा त्रिविध । निर्गुणाची श्रद्धा शुद्ध । येच अर्थीचे विशद । स्वयें गोविंद सागत ॥५१॥ सास्विक्याध्यात्मिकी श्रद्धा कर्मश्रद्धा तु राजसी । तामस्यधर्मे या श्रद्धा मस्सेचाया तु निर्गुणा ॥ २७ ॥ । । देह इंद्रिय चेतना प्राण । येणेसी स्फुरे जे मीपण । तेथ विवेक करूनिया पूर्ण । आपुलें मीपण आपण पाहे ॥५२॥ देह नव्हें मी जडमूढत्वे । इंद्रिये नन्हें भी एकदेशित्वे । प्राण नव्हें मी चपळत्वे । मन चंचळत्वे कदा मी नव्हें ॥ ५३ ।। चित्त नव्हें.मी चितकत्वे । बुद्धि नव्हें मी बोधकत्वे । 'अहं' नव्हे मी वाधकत्वे । 'मी तो येथें अनादिसिद्ध ॥५४॥ एवं मीपणाचे निजसार । विवंचू जाणे बुद्धिचतुर । ते अध्यात्मश्रद्धा उदार । सात्विक नर सदा वाहती ॥५५॥ जे जे मी नव्हें ह्मणत जाये।तें भी देखल्या मीचि आहे । माझ्या मीपणाचे वंदिल्या पाये । मीचि मी ठायें कोदोनी ॥ ५६ ॥ हे आध्या. --- - - - १ सुपरूप राहे . एकरसाने माझी सेवा करणाऱ्या भक्ताच ३ वस्ती ४ पृथा ५ परवमरूपता प्रियापलीकडली ७ सदसत्सगान वैराग्ययक्त होऊन विपयसगाचा नाश करणारा कता सालिक कलामा १ यासक को राजस, विवेमान नष्ट होऊन मनसोक कमाचरण करणारा कर्ता तामस फर्मचाळक परमात्मा असल्यामुळे कोणत्याही कर्माचा अभिमान न घेणारा तो निर्गुण ८ सात्विकर्ता ९ खतन रीतीन, खच्छदतन १० हत परते १५ आत्मनानाविपर्श जी श्रद्धा ती सात्विक, कर्माविपया जी श्रद्धा ती राजस, अधमाच्या ठिकाणा धन मा " भशा ती तामस, व भगवत्सेवेविषयी जीला ती निर्गुण १२तो मी यथाथत्वे. १३ विवरण करण्याला