पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/701

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पचविसाचा ६७७ त्मिकी शुद्ध श्रद्धा । सात्विकापाशी वसे सदा । आतां राजसाची श्रद्धा । ऐक प्रबुद्धा सांगेन ।। ५७ ॥ मी एक येथे वर्णाश्रमी । मी एक येथे आश्रमधी । मी एक येथे कर्ता कर्मी । हे मनोधर्मी दृढ मानी ॥ ५८ ॥ येणे भावाय कर्मतत्परू । कुशमृत्तिकेचा अत्यादरू । अतिशय वाढवी शौचाचारू | विधिनिषेधां थोरू आवर्त भोंबे ॥ ५९ ॥ दोपहष्टीच्या रगीं । मिरवती गुणदोपांच्या श्रेणी । पवित्रपणाच्या अभिमानी । ब्रह्मासी न मनी शुचित्वं ।।३६०॥ देहाभिमान घेऊनि खादा । सत्य मानणे कर्मवाधा । ते हे राजसाची कर्मश्रद्धा जाण प्रबुद्धा उद्धवा ॥६१॥ अधिक अविवेक वाढे । जेणे अकर्म अगी घडे । अधर्माची जोडी जोडे । हे श्रद्धा आवडे तामसी ।। ६२ ॥ जेथ अपेयाचें पान । स्वेच्छा अभक्ष्यभक्षण । अगम्यादि घडे गमन । हे श्रद्धा संपूर्ण तामसी ॥ ६३ ॥ अधर्म तोचि मानी धर्म । हे तामसी श्रद्धेचें वर्म । आता निर्गुणश्रद्धा परम । उत्तमोत्तम ते ऐक ।। ६४ ।। सर्व भूर्ती भगवंत । ऐशिये श्रद्धे श्रद्धावंत । अनन्य भावे भूतां भजत । तो भजनभावार्य निर्गुण ।। ६५ ।। स्त्री पुत्र वित्त जीवित । मजलागीं कुरैवंडी करित । अनन्य भावें जे मज भजत । ते श्रद्धा निश्चित निर्गुण ॥६६॥ चारी पुरुषार्थ त्यागिती । उपेक्षनि चारी मुक्ती । ऐक्यभावे मज भजती । ते श्रद्धासपत्ति निर्गुण ॥६७ ॥ निष्काम नामसरण । निर्लोभ हरिकीर्तन । भावार्थे जेजे भजन । ते श्रद्धा निर्गुण उद्धवा ॥ ६८ ॥ त्रिगुणांचा त्रिविध आहारू । स्वयें सागे शाधिरू । निर्गुण आहाराचा प्रकारू । सखोल विचारू हरि सागे ।। ६९।। ___ पथ्य पूतमनायनमाहार्य सात्विक स्मृतम् । राजस चेन्द्रियरेष्ठ तामस चातिदाशुचि ॥ ८ ॥ पवित्र आणि अळुवार । सत्ववृद्धीसी हितकर । अप्रयासी प्राप्ति साचार । सात्विक आहार या नाव ।। ३७० ॥ अल्पाहार या नाव पथ्य । पवित्र हणिजे धर्मार्जित । तेही अप्रयासाने प्राप्त । तो जाण निश्चित सात्विकाहार ॥७१ ॥ गोड खरपूस आवट । तळीव घोळीव तिपट । चिरीव चोळीव तुरट । वळीव बळिवट आळिलें ॥ ७२ ॥ रसी रसांतरमिळणी 1 पहीं कालवणी शिखरिणी । कुडकुडी निपूस सणाणी । आहारभरणी राजस ।। ७३ ॥ नाना परींच्या आवडी । सडिवा सोलिवा परवडी । रस सुखाची अतिगोधी । तो आहार निवडी राजस ॥७४॥ नाना परीचे आयास । करूनि अतिप्रयास । आहार सेविती राजस । ऐक तामस भोजन ॥ ७५ ॥ सेविता दुर्गधि उन्मादक । परिपाकें करी मूर्ख । अशुचि आणि दुःखदायक । हा आहार देख तामस ॥७६ ॥ भगवं. ताचा भुक्तप्रसाद । साधुसज्जनाचे शेष शुद्ध । हा निर्गुण आहार प्रसिद्ध । 'च' कारें गोविंद बोलिला ॥ २७॥ ग्रासोपासी गोविद । येणे स्मरणे अन्न शुद्ध हा निर्गुण आहार प्रसिद्ध । 'च' कारें गोविद बोलिला || ७८॥ 'अन्न ब्रह्म अह च ब्रह्म । पक्कीकर तोही ब्रह्मा । ऐसा ज्याचा भोजनानुक्रम । तो आहार परम निर्गुणत्वे ।। ७९ ॥ त्रिगुणाचें निविध सुख । निर्गुण सुख अलोलिक । त्याही सुसाचा परिपाक । यदुनायक स्वयें सांगे ॥ ३८० ॥ १ मोगरा २ मुरय लक्षण ३ ओबाढून टाकून, थर्पण कन्ग ४ हलका, हलुवार, पचनास मुम्म ५ राव ६ सणक्षणीत, निराट ७ धान्य अथवा फाळगूळ राइन गोल्न केलेले अनाचे प्रशर ८ जिलामुनाची, निरायपूर्वक सरोसर १० मद उत्पन करणारी ११ मूस्छिन, वेहोप, शिंगटेला १२ सिट १३ मूर सोफात निगुणाचा टटेरा विकारान केला आहे, चमत्कार. १४ पत्तीला जेवणारा १५ अरिफ, विराम - --