________________
६३६ एकनाथी भागवत. मीपणाआतौता । गुरूवेगळा ठाव नाहीं रिता । मीपणाचे माथां गुरुरायो॥ ४६॥ माझें जे का मीपण । तें सद्गुरू झाला आपण । तेव्हां रूप एक नांवे भिन्न । एका जनार्दन एकत्वे ॥४७॥ अवघा जनार्दनचि देखा । तोचि उपनांवें झाला एका । तेणें नामें श्रीभागवत देखा । देशभाखा अर्थवी ॥४८॥ तेविसावे, अध्यायाचे अतीं । देवो वोलिला उद्धवाप्रती । द्वंद्वाभोगांची निजप्राप्ती । साहावी शांति धरोनि ॥४९॥ ज्यासी वाणली अढळ शांती । ते मज अजितातें जिंकिती । तेचि साचार । परमार्थी । स्वमुखें श्रीपति बोलिला ॥५०॥ ते ऐकोन कृष्णवचन । उद्धवाचे दचकलें मन । द्वंद्वसहिष्णुता अतिकठिण । कैसेनि आपण साहावी ॥५१॥ द्वंद्वसहिष्णुतासाधन । पुसतां उवैगेल श्रीकृष्ण । ऐशिया भिंडा उद्धव पूर्ण । धरोनि मौन राहिला ॥ ५२ ॥ तो उद्धवाचा अभिप्रावो । जाणोनियां देवाधिदेवो । द्वंद्वसहिष्णुताउपावो । समूळ पहावो सांगत ॥५३॥ अद्वयत्वे परिपूर्ण । प्रकृतीहूनि पुरुप भिन्न । हे आकळल्या निजज्ञान । द्वंद्ववंधन वाधीना ॥५४ ॥ द्वंद्वे जिणावया पूर्ण । प्रकृतिपुरुषविवंचन । उद्धवे न करितां प्रश्न । स्वयें श्रीकृष्ण सागत ॥ ५५ ॥ भक्तअंतरीचे जाणता । यालागीं अंतर्यामी तत्त्वतां । तो निजभक्ताचिया स्वार्था । पूर्ण परमार्था सागत ॥ ५६ ॥ निजभक्ताचे मनोगत । जाणोनिया श्रीकृष्णनाथ । करावया भक्तहित । कृपेनें सांगत कृपालू ॥ ५७ ॥ जगी धन्य भाग्य उद्धवाचें । कृष्ण दैवत तिहीं लोकींचें । कृपा पोरसोनियों साचें । प्रकृतिपुरुषांचें निज सांगे ॥ ५८ ॥ आशंकेचे निरूपण । उद्धवे न सागतांही जाण । ते जाणोनियां श्रीकृष्ण | कृपा निरूपण निरूपी ॥५९॥ कृष्ण हाणे ज्यासी तारीन । तो पहिलाचि तरला जाण । करावया जगाचे उद्धरण । कृ श्रीकृष्ण वोलत ॥ ६०॥ धेनु वत्साचेनि लोमें जेवीं घरापुरतें दुभे । तेवीं उद्धवाचेनि वालेभे । जग पद्मनामें उद्धरिले ॥ ६१ ॥ श्रीभगवानुवाच-अथ ते सप्रवक्ष्यामि साख्य पूर्यविनिश्चितम् । यद्विज्ञाय पुमान् सब जह्या करिपक भ्रमम् ॥१॥ जो योगियाचा योगेंद्र । जो ज्ञानियाचा ज्ञानेंद्र । जो भक्तचित्तचकोरचंद्र । जो यादवेंद्र यदुवंशीं ॥ १२॥जो प्रकृतिपुरुपाहूनि पर। तो स्वयें बोले शार्ङ्गधर । उद्धवा द्वसहन. प्रकार । अतिगुह्य विचार अवधारीं ॥ ६३ ॥ जे ऐकताच निरूपण । सुखदुःखातीत आपण हे सपणे पाये खण । तें गद्य ज्ञान अवधारी ।। ६४।। मी कपिलरूप अवतरुनी । प्रकृतिपुरुप "विवंचोनी । उपदेशिली निजजननी । ते जुनी कहाणी सागेन ॥६५॥ जे परिसतां सावधान । स्वयें होइजे ज्ञानसपन्न । पुरुपाहूनि प्रकृति भिन्न । सुखदुःख जाण तीपाशीं ॥ ६६ ॥ सुखदुखें मायिक पूर्ण । ऐसें ज्यासी कळले ज्ञान । तेव्हां भवभयभ्रम दारुण । तत्काळ जाण तो सांडी ॥ ६७ ॥ जेवीं मोतियाची. कंठमाळें । भ्रमें सर्प भासली डोळां । ते भ्रमाती घालित गळां । न वाधी कंटाळा सर्पभयाचा ॥ ६८ ॥ तेवीं शिवशक्तिविवचन । तुज मी सांगेन संपूर्ण । जें आकर्णितां सावधान । द्वंद्व सकारण हारपती ॥ ६९ ॥ ब्रह्मा सुखरूप एकलेपणीं । तेथ प्रकृतिपुरुष कैची दोनी । द्वंद्वसुखदुःखें भहवेच्या भात २ सोसावी ३ कटाळा करील ४ सोचाने ५ जिंकण्याला ६ प्रकृतिपुरुषसवधी विचार, पेरा पाहा आणून, पेहयुक्त होऊन ८ गाधीच प्रीतीन, भावीमुळे १० योगाचा खामी ११ कपिलमहा. अनि हे मान्यतामा प्रपतक दोत सांस्यहणजे प्रतिपुरुषांचा विचार १२ निवाडा करून १३ माता देवहूवी हिला पापप्गुनीने महानागा उपदेसा मेरा भागवत कप ३ अध्याय २५--३३ पहा १४ मोत्यांची कठी