________________
द एकनाथी भागवत. प्रभेसी आणिली शोभा । चैतन्यगाभा साकार ॥ ९६ ॥ ते भगवद्भाववैभव । भगवंताचें निजगौरव । भक्तीचे भाग जे नव । ते जाणा सर्व मूर्तिमंत ॥ ९७ ॥ नवखंड पृथ्वीचे अलंकार । नवनिधींचे निजसार । नवरत्नांचेही निजभांडार । ते हे साकार नवही जण ।। ९८॥ की ते नवही नारायण । स्वयें प्रगटले आपण | नवही नृसिह जाण । देदीप्यमान पे आले ॥ ९९ ॥ आव्हानिले तीन्ही अग्नी । उभे ठेले त्यांतें देखोनी । ते हे भागवती देखिले नयनीं। इतरांलागुनी दिसेना ॥ २०० ॥ येता देखोनि तेजोमूर्ती । ऋत्विज आचार्य उभे ठाकती। साउँमा धांचे विदेहनृपती । स्वानंदवृत्ती सन्मानी ॥१॥ सवेग घाली लोटांगण । मुगुट काढोनि आपण । मस्तकी बंदूनियां चरण । पूर्ण आदरें जाण आणिता जाला ॥२॥ विदेहस्तानभिप्रेत्य नारायणपरायणान् । प्रीत सपूजयाचक आसनस्थान्यथाहत ॥ २६ ॥ त्यांतें जाणोनियां भगवत्पर । विदेहा आल्हाट थोर । त्यांचे पूजेसी अत्यादर । स्वयं सादर पैं जाला ॥ ३ ॥ श्रद्धायुक्त चरणक्षालन । धूप दीप सुमन चदन । पूजा मधुपर्कविधान । केले सपूर्ण यथायोग्य ॥ ४ ॥ तान्रोचमानान्स्वरुवा ब्रह्मपुत्रोपमानव । पप्रच्छ परमप्रीत प्रश्रयावनतो नृप ॥ २७ ॥ निजांगीच्या निजप्रभा । अंगासी आणिली शोभा । काय ब्रह्मविद्येचा गाभा । शोभे नवप्रभा शोभायमान ॥ ५ ॥ निजहृदयींचे ब्रह्मज्ञान । परिपाके प्रकाशले पूर्ण । तेंचि निजागा मडण । इसर भूपण त्यां नाही ॥६॥ मुगुट कुडले ककण । मूर्खाअगी बाणली पूर्ण । ते शोभा लोपूनि मूर्खपण । बाहेर सपूर्ण प्रकाशे ॥७॥ तैसे नव्हती हे ज्ञानधन । ब्रह्मपूर्णत्वे विराजमान । तेंचि त्यासी निजांगामडण । इतर भूपण त्या नाही ॥८॥ ब्रह्मानुभवे पूर्णत्व पूर्ण । इंद्रियद्वारा विराजमान । ते त्यासी निजशातिभूपण । मुगुट कर्कण ते तुच्छ ॥९॥ मागां वाखाणिले सनकादिक । त्यासमान की हे अधिक । ऐसा विचारितां परिपाक । त्या या वेगळीक दिसेना ॥ २१०॥ त्याची याची एक गती । त्यांची यांची एक स्थिती । त्यांची याची एक शाती। भेदु निश्चिती असेना ॥ ११॥ त्याच्याऐसे हे सखे बंधू । त्यांच्याऐसा समान वोधू । त्याच्याऐसा हा अनुवादु । सर्वथा भेदु असेना ॥ १२ ॥ ते चौघे हे नव जण । अवघ्यां एकचि ब्रह्मज्ञान । त्याची यांची शांति समान । हे विदेहासी पूर्ण कळू सरले ॥ १३ ॥ ऐसे परिपूर्णत्व जाणोनी । राजा सुखावे स्थिति देखोनी। मग अतिविनीत होऊनी । मृदु मंजुळ वचनीं विनवीत ॥ १४ ॥ विदेह उवाच-मन्ये भगवत साक्षात्पादान्यो मधुद्विप । विष्णोर्भूतानि रोकाना पावनाय चरन्ति हि ॥२८॥ सार्वभौम चक्रवर्ती । देही असोनि विदेहस्थिती । तो जनक आर्पभाप्रती । अतिप्रीती विनवितु ॥ १५ ॥ त्यांच्या भेटीसवे उलथले सुख । विदेहासी देहेंविण हरिख । तेणे हरिसेंकरूनियां देख । प्रीतिपूर्वक विनवितु ॥ १६ ॥ तुमचे सामर्थ्य पाहता येथ । तुह्मी ईश्वररुप समस्त । देहभाचे तरी भगवद्भक्त । जैसे पार्षद हरीचे ॥ १७ ॥ देवो आपुला आपण भक्त । ऐसा जो का उपनिपदयूं । तो साच करूनि वेदार्थे । निजपरमार्थ अनुभवा ॥१८॥ शिवे होऊनि शिवु यजिजे । हे लक्षण तुझांसीच साजे । येरी हे बोलचि बोलिजे । परी क्षिणामि गाहपत्य व आहवनीय २ आलेल्या नवयोग्यानी ३ सामोरा ४ हदयात ब्रह्मतेज प्राढल्यामुळे त्याची मोहनिय प्रशतेजान तेजची दिरारी प्रणा त्याना याच अरमाराच कारण राहिल नाही ५पूर्णत्वपण ६ पडले त्य, ८ प्रतिपाद्य विषय ९ उगवले, फुटले १० हर्ष ११ सभासद १२ 'शिवो भूवा शिष यजेत्-स्मृति