पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/626

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६०८ , एकनाथी भागवत । नन में भगवास्तुष्ट सर्वदेवमयो हरि । येन गीतो दशामेता निर्वदश्वात्मनः हम ॥२८॥ _मी पूर्वी होतों अतिअभाग्य ! आता झालो अतिसभाग्य । मज तुष्टला श्रीरग। विवेकवैराग्य पावलो ॥३६॥ माझे सचित में का धन । तेंचि माझें मुख्य अज्ञान । ते हरीने हरोनि आपण । कृपा पूर्ण मज केली ॥ ३७॥ भक्तांचे अज्ञान हेरी । याचिलागी नावे तो 'हरी' । तेणे कृपा करून पुरी। विवेक अंतरी उपजविला ॥ ३८॥ वैराग्य विवेकावीण आंधळे । विवेक वैराग्यावीण पागळें । ते माझे हृदयीं जावळी फळें । एक वेळे उपजविलीं ॥ ३९ ॥ ऐशी हरीने कृपा करूनी । माझे धनेसी अज्ञान हरूनी । विवेक वैराग्य ये दोनी।माझे हृदयभुवनी प्रकाशिलीं ॥ ४४० ॥ परी कोणे काळे कोणे देशी। कोण समयविशेपी । हरि कृपा करितो कैगी। हे कोणासी कळेना ॥४१॥ भक्ताचे हरावया चित्त । हरि हरितो त्याचे वित्त । वित्तत्यागें करूनि सुचित्त । दे विवेकयुक्त वैराग्य ॥४२॥ ऐसे घेतैदेते विंदनि । ब्रह्मादिका अतयं जाण । यालागीं तो भगवंत पूर्ण । त्यासी साही गुण वशवः ॥ ४३॥ त्याचे अचिंत्यानंतरूप । परी मजलागी झाला सकृप । माझें धनेसी निरसूनि पाप । ज्ञानदीप उजळला ॥४४॥ हो कां कृपा उपजली भगवता । परी म्या वचिल्या यज्ञदेवता । त्या क्षोभल्या करिती घाता। हेही सर्वया घडेना ॥ ४५ ॥ करी चक्र धगधगित । ज्याचा पाठिराखा हरि समर्थ । विघ्नाचा वारा न रिघे तेथ । देव वंदीत तयासी ॥४६॥ देवीं वदूनि प्रह्लादासी । शात करविले नृसिहासी । तो पाठिराखा नरहरि ज्यासी । विश्न त्यापाशी रिघे केवी ॥ ४७ ॥ जेणे देवाचिया कोडी । क्षणे सोडविल्या वावडी । त्याचे भक्ताची लोव वाकडी । देवे वापुडी केवी, करिती ॥ ४८ ॥ जो सकळ देवाचा नियंता । ज्याचे चरण देव वंदिती मायां । तो भगवंत साद्य असता । विघ्न सर्वथा वाधीना ॥ ४५ ॥ ज्याचेनि घळे वाढले देव । देव जयाचे अवयव । तो हरि तष्टला स्वयमेव । तेथ विघ्नसभव कोणाचा ॥ ४५० ॥ सर्वदेवमय श्रीहरी । इंद्रचंद्ररूपे माझा हरी । ऐशिया मज दीनावरी । विघ्न ससारी माज असेना ॥५१॥ ऐशिये कृपेचे कारण। ये जन्मी नाही साधन । हे माझे पूर्वील जुने ऋण । देवापाशी जाण ठेविले होते ॥५२॥ मी पूर्वी कोण देशी । तीर्थक्षेत्री कोण वंशी । कोण आचरलो सत्कर्मासी । तेणे हृषीकेशी तुष्टला ॥ ५३ ॥ माते अतिदु सी देखोन । हरि तुष्टला कृपापूर्ण । त्याचे कृपेस्तव जाण । विवेकसपन्न मी झालो ॥५४॥ हो कां धनक्षय झाले दुःख । तेणे दुःसें पावलों निजसुख । भवाब्धि तरावया देख । वैराग्यविवेक दृढ तारूं ॥ ५५ ॥ हरिखें चोस नि ब्राह्मण । ह्मणे उरले आयुष्येनि जाण । वृथा जावो नेदी अर्ध क्षण । करीन निर्दळण सुखदुःखा॥५६॥ सोऽह कालरावशेषेण शोपयिष्येऽझमात्मन । अप्रमत्तोऽसिलस्वार्थे यदि सासिद्ध आत्मनि ॥ २९॥ । 'काइसा भवभयाचा पौड । घेईन कोटि जन्माचा सूड । नासल्या आयुष्याचा कैवाड । करीन निवाड येणे देहे ॥ ५७ ॥ देहासी आली वार्धक्यता । परी वृद्धत्व नव्हे माझिया चित्ता । तेणे चित्तें चितूनि भगवता। भवबंध आता छेदीन ॥ ५८ ॥ उरले आयुष्ये येथ। कळिकाळाचे पाडीन दात । गर्भदुःखाचे सणेने सत । मरणाचा घात मी करीन ॥५९॥ १परमसमाग्य • हरण करितो, निरसी एरी ३ जुळी ४ फसव, चातुर्य ५ स्वाधीन ६ हाती तेजस्ती गुदर्श नामः ५ रानुष्ट करनि ८ चदिसान्यातून ९स, यालाप १० पूर्वपुण्य, जुनी ठेव ११ आनदाने पूर्णपणे भिरून १२ पर्षी १३ भरपाई १४ पूर्णपणे, निश्चयाने १५ पाहीन . 2