पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/624

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. पुण्य ते नव्हे ॥८९॥ कुटुंवासी यथोचित । सुखी करूनि समस्त । याहूनि उरला जो अर्थ । तो श्रेयार्थ वेचावा ॥३९०॥ अतिथि आलिया देख । अन्न द्यावे आवश्यक । तो झालिया पराङ्मुख । पुण्य निःगेप हेरासे ॥ ९१॥ सकळ दानामाजी जाण । अतिश्रेष्ठ अन्नदान । दीनास देऊनि सन्मान । द्यावे सदन्न अतिश्रद्धा ॥ ९२ ॥ कुटुव सुसी करी आपण । स्वेच्छा दे दीनभोजन । परी कदर्थवी जो निजप्राण । तोही दारुण अधर्म ॥ ९३ ॥ जैसे कीजे दीनतर्पण । त्यांत आपणही एक दीन । तेथ न करूनि अधिकन्यून । करावे भोजन समभागें ॥ ९४ ॥ पंक्तीमाजी प्रपंचपण । तें अन्नदानी अतिविघ्न । यालागी करावे भोजन । समभागी आपण सकळासी ॥ ९५ ॥ धनाचा सध्ययो खरा । द्यावें अनाथग्रेतसस्कारा । अर्पावे दीनांच्या उद्धारा । धाडावे घरा अयाचिताच्या ॥ ९६ ॥ अंध पंगु मुके दीन । यासी सरक्षी जो आपण । त्याचेंचि सार्थक धन । शुद्ध पुण्य तयाचे ॥१७॥ साधुसज्जना विवू जी अंडी। तो विचंबू जो सधन तोडी । त्याच्या निजधर्माची गुडी। उभारे रोकडी वैकुंठी ॥ ९८ ॥ दुर्वळ जो का भगवद्भक्त । त्यासी संरक्षी जो धनवंत । येणे तुष्टला भगवंत । त्यातें उद्धरीत भक्ताआधीं ॥१९॥ सकळमगळा मंगळ पूर्ण । सकळ कल्याणाचे कल्याण । ते हे सद्गुरुश्रीचरण । तेथ निजधन जयाचे अर्षे ॥४०॥ तयांच्या निजधर्माचे निशाण । सत्यलोकी लागले जाण । वैकुंठी कैलासी सपूर्ण । भेरीनिशाण बोहाटिले ॥१॥ स्वधर्म जोडले निजधन । जो करी सद्गुरूसी अर्पण । तोचि कर्मी निप्कर्म जाण । परम पावन तो एक ॥ २॥ जो चढत्यावाढत्या भगवद्भक्ती । गुरूसी अपी निजसंपत्ती । त्याते अगीकारूनि लक्ष्मीपती । आपुली निजभक्ती त्यासी दे ॥ ३ ॥ ज्यासी अनन्य गुरुभक्ती । त्याच्या द्वारी चारी मुक्ती । दासीत्वें उभ्या असती । त्यापासोनि श्रीपति परती नव्हे ॥ ४ ॥ ज्याचे तनु मन धन । गुरुचरणी अर्षे पूर्ण । त्यासी भवभयाचे भान । कल्पाती जाण दिसेना ॥ ५॥ देवे जोडली जे संपत्ती । ते वेचोनि' ऐशा निगुती । अर्थे परमार्थप्राप्ती । सभाग्य लाहती निनिष्ठा ॥६॥ ऐसे न वेचोनियां धन । स्वयाति कुटुंव पीडी पूर्ण । जो पोटा न खाय आपण । तें यक्षधन सचित ॥७॥ एवं कदथूनि निजमाण । जें सचिले यक्षधन । ते अधःपातासी कारण । दुःख दारुण धनलोभ्या ॥८॥ ह्मणे मीही याच निष्ठा । यक्षवित्तं झालो करटा । हातींचा स्वार्थ गेला मोटा । वचलो कटकटा निजमोक्षा ॥ ९ ॥ साचोनिया यक्षवित्त । म्या माझ केले अनहित । ऐसा तो खेदयुक्त । कप्टें बोलत निजदुख ॥ ४१० ॥ व्यर्थयार्थेहया वित्त प्रमत्तस्य वयो बलम् । कुशला येन मिध्यन्ति जरठ कि नु साधये ॥ २५ ॥ निजभोगविवर्जित । शिणोनि काया वाचा चित्त । कटें मिळवावया वित्त । झाला उन्मत्त अविवेकी ॥ ११॥ करिता वित्ताचे आयासे । गेले तारुण्य बळ आयुष्य । शरीर क्षीण झाले निःशेष । तरी वित्ताचा शोप शमेना ॥१२॥ अर्थे अर्थ वाढविता । अनिवार वाढली चिंता । तेणे विसरलो निजस्वार्था । अर्थलोभता कदयूं ॥ १३ ॥ जेणे वित्त जीवितें १ परोपकारार्थ २ लास पावते ३ साण्यापिण्यावाचून कष्टवितो ४ मेद, पक्तिप्रपच, एकाला एक, दुसऱ्याला दुसरं वाटणे ५ अयाचित वृत्ती। राहणाऱ्याच्या ६ सकट ७ अडचण ८ मद्भक्त १ मेरी नगारा, काला १. येवि, वाजविले ११ चढोवीं १२ दूर १३ सचून १४ खताच्या निटी पावतात १५ समधपिशाचादिकांनी पटकामिरल द्रव्य १६ हाय हाय! १७ श्रम १८ तणा, तळमळ