Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/599

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय बाविसावा ५८१ गुणी क्रीडतां जीव तत्त्वतां अलिप्त ॥ ५७॥ स्फटिक काजळी दिसे काळा। परी तो काळेपणावेगळा । तेवीं तमोगुणे जीवू मैळा । दिसोनि निराळा तमेंसी ॥५८ ॥ स्फटिक आरक्ती आरककिळा । दिसोन आरक्ततेवेगळा । तेवीं रजोगुणी राजसलीळा । भोगूनि वेगळा जीवात्मा ।। ५९ ॥ स्फटिक श्वेतवर्णी दिसे श्वेत । परी तो श्वेतपणा अलिप्त । तेवीं सत्त्वीं दिसे ज्ञानवंत । गुणज्ञानातीत जीवात्मा ।। ५६० ॥ त्रिगुण गुणेंसी अलिप्तता । दाविली जीवशिवांची तत्त्वता । देही असोनि निःसगता । ऐक आतां सांगेन ॥ ६१॥ जेवीं घटामाजील जीवन । घटी चंद्रविय आणी जाण । तेवीं शुद्धासी जीवपण । देहाभिमान देही देसे ।। ६२॥ घटनिश्चळत्वें विव निश्चळ । घटचंचलत्वें ते चंचळ । तेवी देहाच्या अवस्था सकळ । मानी केवळ जीवात्मा ॥ ६३ ॥ घटी कालविल्या अर्जन । तरी ते काळें होय जीवन । परी चिंचप्रतिविंवा जाण । काळेपण लागेना ।। ६४ ॥ तेवी देहाची सुखदुखकथा । कां पापपुण्यादि जे वार्ता । नाहीं जीवशिवाच्या माथा । देह अहंता ते भोगी ॥६५॥ ये घटींचं जळ ते घटी भरित । चंद्रबिंब असे त्याहीआत । तेवीं या देहींचा त्या देहीं जात । जीवात्मा ह्मणत या हेतू ॥६६ ॥ चंद्र गगनीं अलिप्त असे । तो मिथ्या प्रतिविवें घटी भासे । तेवीं वस्तु वस्तुत्वे सावकाशे । जीबू हे पिसे देहात्मता ॥ ६७ ।। त्रिगुणगुणी गुणातीत । देही देहसगा अलिप्स । जीव शिव दोनी येथ । तुज म्या साधत दाखविले ॥ ६८ ॥ हे नेणोनियां समस्त । देहात्मवादें जाहले भात । स्वर्गनरकादि आर्त । योनी भोगवीत अभिमान ॥ ६९ ॥ द्विजदेह आरभूनि येथ । परमेष्ठिदेहपर्यंत । स्वर्गसुख देहें समस्त । भोगवी निश्चित पुण्याभिमान ।। ५७० ॥ याहनिया अधोमुख येथ। द्विजवाहूनि खालते जात । नाना दुःखयोनी भोगवित । जाण निश्चित पापाभिमान ॥ ७१ ॥ येथ पापपुण्यकर्माचरण । तें पाढविताहे जन्ममरण । यात विरळा सभाग्य जाण । जन्ममरणच्छेदक ॥ ७२ ॥ ज्यासी, निष्काम पुण्याचिया कोडी। जिहीं स्वधर्म जोडिला जोडी । ज्यासी भूतदया गाढी । ज्याची आवडी द्विजभजनीं ॥७३॥ जे अहिंसेसि अधिवास । ज्यांचे अद्वतपर मानस । जे सारासारराजहस । जन्ममरणाचा त्रास घेतला जिही ।। ७४ । जे उपनिषदर्थचातक । जे जीवजनकाचे शोधक । जे निजात्मतस्वसाधक । जे विश्वासुक भावार्थी ॥ ७५ ॥ ज्यासी सतचरणी सद्भावो । जे गुरुवचनी विकले पहा हो । त्यासी देहीं विदेहभायो । मत्कृ पहा वो पावती ॥ ७६ ॥ तेही निजबोधे देहाची वेडी । तोडूनि जन्ममरणाची 'कोडी । उभयूनि सायुज्याची गुडी । परापरथडी पावले ॥७७॥ त्यासी ससाराचे आवर्त । सर्वथा गेले न लगत। जेवीं बुडण्याचा सकेत । मृगजळाआत असेना ॥ ७८ ॥ ऐसे प्राप्त पुरुप येथ । ससारी नाहीं गा वहत । हिंडता अवघ्या जगांत । एखादा कदाचित देखिजे ॥ ७९ ॥ असो देखिल्याही त्यातें। कोण आहे ओळखते । उद्धवा जाण निश्चित । आत्मा येथे दिसेना ॥५८० ॥ जरी १जीब २ मलिन ३ कोट मागजे प्रभा ४ जो गुणे ५ जीवाची ६ मुस्कता ७ कातळ ८ अपमामुळे देह भोगतो ९ वेड १० फेरे, भोवरै ११ ग्रह्मदेवापर्यत १२ सार झणजे ब्रह्म, असार झणजे माया, याचा विवेक करणारे राजहस १३ भीति १४ जसा चातक उत्सुकतेन मेघजल ग्रहण करितो, त्याप्रमाणे उपनिषत्सिद्धात उत्कटतेन ग्रहण कर गारे १५ चपन १६ रोग, किवा कोट्यवधि जन्म, किवा गुतागुती १७ पताका, ध्वज १८ पलटी १९ बेत, समा. शक्यता २० मुफ, मोक्षाला पावलेले