Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/598

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८० एकनाथी भागवत. नाहीं खोकल्याहाती । श्वास कास उठती अनिवार ॥ ३२ ॥ शरीरी थरकंप उठी । तरी देहाभिमान दृढ पोटीं । अवध्यांतें ह्मणे धाकुटी । सांगे जुनाट गोष्टी मोठमोठ्या ॥ ३३ ॥ अधोवाताचे वावधान । अनिवार सुटे जाण । जीवे जितां विटेवण । हे जरा जाण आठवी अवस्था ॥ ३४ ॥ जेवीं सुईमागे दोरा जाण । तेवीं जरेसवें असे मरण । जरा शरीर पाडी क्षीण । तंव बाजे निशाण मृत्यूचें ॥ ३५ ॥ देहींच्या तुटल्या नाडी । वाचा हों लागे बोबडी । तरी देहाची धरी गोडी । अधिक आवडी स्त्रीपुत्रांची ॥ ३६ ॥ मजमागे हे अनाथें । कोण सांभाळील यातें । पोटासी धरोनि त्यातें । रडे बहुतें आक्रोशें ॥३७॥ द्रव्यलोभ अतिकठिण । अंती न वेची आपण । दूरी करूनि इतर जन । सांगे उणखूण ठेव्याची ॥ ३८ ॥ नवल वासनाविंदान । विसरोन देहाचे स्मरण । सर्वस्वें जे धरिजे आठवण । तेंचि आपण दृढ होय ॥ ३९॥ या देहाची निःशेप आठवण । ते नाठवणे सवेचि जाण । चेतनासहित जाय प्राण । या नांव मरण देहाचें ॥ ५४०॥ एवं गर्भादि मरणाता । या देहीच्या नव अवस्था । येथ आत्म्याची अलिप्तता । स्वभावतां देहासी ॥४१॥ देह अवस्था विकारवंता । आत्मा अलिप्त अविकारता । ह्मणसी देहविकारा जडता । यासी विकारता घडे केवीं ॥ ४२ ॥ सूर्य थापटूनि जन । कदा नुठवी आपण । तो प्रकाशतांचि जाण । सहजें जन चेवती ॥ ४३ ॥ त्या जनांची कर्मकर्तव्यता । सूर्याअगीं न लगे सर्वथा । तेवीं प्रकाशोनि विकारता । अलिप्त तत्त्वता निजात्मा ॥४४॥ झालिया सूर्यकिरण प्राप्त । जेवीं अग्नि नवे सूर्यकात । तेणे याग का दाघ होत । त्या कर्मातीत सूर्य जैसा ॥४५॥ तेवीं चित्प्रकाशे मन । शुभाशुभ कर्म करी जाण । त्या मनोविकारा चिद्भान । अलिप्त जाण निजात्मा ॥ ४६ ॥ येथ मनःकृत विकार पूर्ण । मनः कृत कमाकर्म जाण । मनाकृत जन्ममरण । स्वर्गनरकगमन मनाकृत ॥४७॥ मनःकृत लक्ष्यालक्ष्य । मनःकृत बंधमोक्ष । तचेि निरूपण प्रत्यक्ष । श्रीकृष्ण अधोक्षज सांगत ॥४८ ।। एता मनोरथमयी न्यस्योचायचाम्ननू । गुणसहादुपादत्ते छचिरकश्चिजहानि च ॥ १७ ॥ ससारविकाराचे भान । अभिमानयुक्त करी मन । स्वर्गनरक गमनागमन । देहाभिमान भोगवी ॥ ४९ ॥ आत्मा याहूनि सहजें भिन्न । चिन्मात्रैक चिद्धन । तेथ आतळों न शके मन । शुद्धी अभिमान असेना ॥ ५५० ॥ मन अभिमान प्रसवे माया । अभिमाने गुण आणिले आया।गुणी मायिक केली काया। विकारसामग्रियासमवेत ॥५शा जैशी देहापाशी छाया। तैशी स्वरूपी मिथ्या माया । जेथ जन्ममरणेसी काया । रिघावया ठावो नाही ॥ ५२ ।। आत्मा शुद्ध काया मलिन । काया जड आत्मा चिद्धन । अज अव्यय आत्मा परिपूर्ण । जन्ममरण देहासी ।। ५३ ॥ तिनी गुण तिनी अवस्था । कार्य कर्म अहंकर्ता । हैं देहाभिमानाचे माथा । आत्मा सर्वथा अलिप्त ॥ ५४ ॥ यापरी विकाराहून । आत्मा चिद्रूपं सहज भिन्न । ह्मणशी जीवास देहाभिमान । तेंही कथन अवधारीं ॥ ५५ ॥ जीव अलिप्त मायागुणी । ऐक सागेन ते काहाणी । स्फटिक ठेविजे जैशा वर्णी । तद्रूपपणी तो भासे ॥ ५६ ।। हो का तद्पपणेही दिसता । स्फटिक अलिप्त निजशुद्धता । तेवीं सत्यादि १ सोकला २ बाय ३ मेरी, नगारा ४ निषेक, गम, जन्म, बाल्य, कौमार, यौवन, तारुण्य, जरा न मृस्य, या एका दहाच्या नऊ अवस्था आहेत ५ दाह ६ चैतन्याच्या प्रकासाने ७ चैतन्यरूपी सूर्य ८ केवळ ज्ञानरूप ९ प्रवेश फाप्पाला १० गोट, मया