पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/594

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. ॥४३॥ वाढवूनियां संभ्रम । अंतकाळी आवडे सप्रेम । जेथे ध्यान ठसावे मनोरम । तेचि जन्म पुरुपासी ॥ ४४ ॥ मग तेणे ध्यानानुभवे । जैसा कांहीं आकारू संभवे । तेथ देहाभिमान पावे । 'हे मी आघवे' ह्मणोनी ॥ ४५ ॥ येथ मन आणि अभिमान । स्वरूप एक कार्य भिन्न । हे चित्तचतुष्टयलक्षण । जाणती सज्ञान एकात्मता ॥४६॥ दैवयोगें त्या देहाचें । चरवे वोखटें घडे साचें । ते अभिमान घेऊनि नाचे । जन्म पुरुषाचे या नाव ॥४७॥ परी हे देह नव्हे आन । हेही स्मरेना तें मन । पूर्वील जो देहाभिमान । तोचि येथ जाण आरोपी ॥४८॥ येचि अर्थीचा दृष्टांत । स्वयें सांगताहे श्रीकृष्णनाथ। जेवीं स्वप्न आणि मनोरथ । विसरवित निजदेहा ॥ ४९ ॥ स्वगृहीं दरिद्री निद्रित । तो स्वमी होय अमरनाथ । मग उर्वशीप्रमुख अप्सरांत । असे मिरवत ऐरावी ॥४५० ॥ ते दरिद्रदेह माझे गेले । हे अमरदेह प्राप्त झाले । ऐसें स्वप्नीं नाही आठवलें । तैसे जन्म झाले जनासी ॥ ५१ ॥ मजूर राउळीचे धृत नेता । तो तुरगी चढे मनोरथा । मन नाचूं लागे उल्हासता । स्वकल्पिता कल्पना ॥ ५२ ॥ सवळ वारूंचे उद्घाण । ह्मणूनि उडूं जाता आपण । पडोनि घृतकुंभ होय भग्न । पुसती जन काय झाले ॥ ५३॥ वळ उडाला माझा घोडा । परी स्मरेना तो फुटला घडा । वंदी पडला रोकडा । नेणे वापुडा मनोरथें ॥५४॥ येथवरी तीव्र में विस्मरण । त्या नाव देहाचे मरण । अतिउद्यत जे मनाचे ध्यान । तेंचि जन्म प्राण्यासी ॥५५॥ एवं आत्म्यासी जन्ममरण । तें केवळ भ्रमाचे लक्षण । तेचि अर्यांचे निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सागत ॥५६॥ । स्वम मनोरथ चेस्थ प्राक्तन न सरत्यसो । तर पूर्वमिवात्मानमपूर्व चानुपश्यति ॥ ४० ॥ स्वम देखत्या पुरुषासी । विसरोनि निजदेहासी । स्वामींच्या देहंगेहासी । साभिमानेंसी वाढवी ॥ ५७ ॥ जागृतिदेहो राहिला तेथें । स्वप्नदेहो पावलों येथें । एवं पूर्व अपूर्व दोहीतें । न सरे चित्तें पुरुष जैसा ॥ ५८ ॥ जागृति आणि देखिलें स्वप्न । या दोहीं देहासी देखता भिन्न । तेवी जन्म आणि मरण । जीवासी जाण असेना ॥ ५९॥ एवं देहासी जन्म नाश । आत्मा नित्यमुक्त, अविनाश । स्वममनोरथविलास । तैसा बहुवस संसार ॥ ४६० ॥ देहासी जन्म स्थिति मरण । यासी मनचि गा कारण । मनःकल्पित संसार जाण । तेंचि श्रीकृष्ण सागत ॥ ६१॥ इन्द्रियायन सृष्टयेद वैविध्य भाति वस्तुनि । बहिरन्तर्भिदाहेतुर्जनोऽसजनकृद्यथा ॥४॥ । भने कल्पिली सकळ सृष्टी । मन कृत इंद्रियकामाठी । मने वाढविली त्रिपुटी । कर्मकसवटी विभागें ॥ १२ ॥ अधिदैव अध्यात्म अधिभूत । हे त्रैविध्य मनाकृत । वस्तु अखंडचि तेथ। त्रिधा भासत कल्पना ॥६॥ जैसे भाडे कुंभार करी । तेथ नभ दिसे तंदाकारी । गगन सर्वथा अविकारी । ते दिसे विकारी भाडयोगें ॥ ६४ ॥ तेवी आत्मा अविकोरी नित्य शुद्ध । तेथ मनःकल्पित त्रिविध । नानापरींच्या त्रिपुटी विविध । वाढविला भेद तो ऐक ।। ६५॥ कार्य कर्म आणि कर्ता । ध्येय ध्यान आणि ध्याता । ज्ञेय ज्ञान आणि ज्ञाता । या मन कल्पिता त्रिविध ॥६६॥ अहं कोहं सोहं भेद । त्वंपद तत्पद १ सटाटोप, ससारपसारा २ इद ३ देवळातले ४ घोच्या ५ तुपाचे गाडगे ६ शरीरगृहादिकाला ७ इद्रियाचा व्यापार ८ कर्माचा निर्णय, कमासवधी निश्चय ९ तीन प्रकारची १० कुमाच्या पोकळीएवढे ११ गाडग्याच्या 'योगा १२ विकाररहित १३ भी, मी कोण, य तो मी, असा भेद