पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/582

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. इति नाना प्रसरयानं तत्त्वानामृपिभि कृतम् । सव न्याय्यं युक्तिमत्वाद्विदुषां किमशोभनम् ॥ २५॥ येथ सर्वज्ञ ज्ञाते होती । ते नाना मतें तत्त्वयुक्ती । विवंचोनियां उपपत्ती । विभागू जाणती यथार्थ ॥ २५ ॥ निजतत्त्व जाणावया जाण । करितां तत्त्वविवंचन । सर्वथा न लगे दूपण । तत्त्वे अधिकन्यून बोलतां ॥ २६ ॥ वस्तुतां विकारांच्या ठायीं । ज्ञात्यासी बोलावया विशेष नाहीं । विकार ते प्रकृतीच्या ठायीं । आत्मा शुद्ध पाहीं अविकारी ॥ २७ ॥ प्रकृतीहूनि आत्मा भिन्न । यालागीं तो अविकार जाण । विकारी प्रकृतीमाजी पूर्ण । हे मुख्य लक्षण तत्त्वांचे ॥ २८॥ प्रकृतीहूनि वेगळेपण । पुरुषांचे जाणांवया आपण यालागी उद्धवा जाण । तत्त्वविवंचन साधावे ॥ २९ ॥ हे ऐकोनि कृष्णवचन । उद्धव चमत्कारला जाण । प्रकृतिपुरुषांचे भिन्नपण । देवासी आपण पुसों पां ॥ २३० ।। उद्धव उवाच-प्रकृति पुरपश्चोभौ यद्यप्यारमविलक्षणो । अन्योन्यापानयारकृष्ण दृश्यते न भिदा ' तयो । प्रकृती रक्ष्यते घारमा प्रकृतिश्च तथामिनि ॥२६॥ प्रकृति पुरुप भिन्नभिन्न । येचि अर्थी उद्धवे जाण । साडेतीन श्लोकी अगाध प्रश्न। देवासी आपण पुसत ॥ ३१॥ प्रकृतीहूनि पुरुष भिन्न । हे ऐकोनि देवाचे वचन । प्रकृ. तिपुरुपांवेगळा श्रीकृष्ण । हा द्रष्टा सपूर्ण दोहींचा ॥ ३२॥ ह्मणे ऐक श्रीकृष्णा श्रेष्ठा । हे प्रकृतिपुरुपाची चेष्टा । तूं वेगळेपणे देसणा द्रष्टा । सुरवरिष्ठा श्रीपती ॥ ३३ ॥ प्रकृति पुरुष दोनी भिन्न । एक जड एक चेतन । हें मजही कळतसे जाण । परी वेगळेपण लक्षेना ॥ ३४ ॥ जैसा तप्तलोहाचा गोळ । दिसे अग्नीचि केवळ । तेवीं प्रकृतिपुरुषांचा मेळ । दिसे सबळ एकत्वे ॥ ३५ ॥ जेवीं वीज धरोनिया पोटेंसी । निकैणू कोंडा वाढे कणेसी । तेवीं प्रकृतिजाण पुरुषसी । अभिन्नतेसी जडलीसे ॥ ३६॥ का नारळ चोख धरोनि पोटीं । निरस कठिण वाढे नरोटी । तेवी पुरुपयोगें प्रकृति लाठी । झाली सृष्टी अनिवार ॥ ३७ ॥ कणावेगळा कोंडा न वाढे । तेवीं पुरुपावेगळी प्रकृति नातुडे । हे प्रकृतिपुरुपाचें विरडें । तुजवेगळे निवाडे निवडेना ॥ ३८॥ जेवी का शिपीचे अगी। जडली रुपेपणाची झंगी । तेवीं पुरुषाच्या सयोगी । प्रकृति जगी भासत ॥३९॥ तीक्ष्ण रविक. रसबंधी । भासे मृगजळाची महानदी । तेवी पुरुषाच्या सबंधीं । प्रकृति त्रिशुद्धी आभासे ॥ २४० ॥ जेवीं का नभी नीलिमा । वेगळी न दिसे साडूनि व्योमा । तेवीं प्रकृति पुरुषोतमा । वेगळीक आह्मा दिसेना ॥४१॥ मुख्य देहाचे जे देहपण । तेंचि प्रकृतीचे वाधकत्व जाण । या देहाहोनियां भिन्न । पुरुपाचे भान दिसेना ॥४२॥ अहंप्रत्यये आत्मा ह्मणती । तेही देहाकार स्फुरे स्फूर्ती । देहावेगळी आत्मप्रतीती । न दिसे निश्चिती गोविदा ॥ ४३ ॥ डोळा सांडूनि दृष्टि उरे । वातीवेगळा दीप थारे।। ते देहावेगळा आत्मा स्फुरे । साँचोकारें गोविंदा ॥४४ ॥ जिह्ववीण रसस्वाद । श्रोत्रवीण ऐकवें शब्दू । ते देहावेगळा आत्मबोधू । होय विशदू गोविदा ॥ ४५ ॥ काटेवीण फणस आतुडे । कां सोपटेवीण ऊस वाढे । तें देहावेगळा आत्मा जोडे । वा.को. गोविदा ॥ ४६ ।। तुह्मीच सागीतली निजात्मखूण | नरदेह ब्रह्मप्राप्तीचे कारण शेखी देहावेगळे आत्मदर्शन केवीं १ तत्त्वविचार २ साझी ३ अमीने लाल झालेल्या लोखताचा ४ कणाविरहित ५ एकरवाने ६ मोठी ७ गाठ, को सिलाई, चकाकी. निवेपणा १. आकाशाला.११ देहाव्यतिरिक. १३ तेवता राहतो १३ खरोखरः ।