Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/577

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय बाविसावा. नरकी निरय भोगिती । तेथही न सोडी विषयासक्ती । विपयाऐसा विश्वासघाती । आन त्रिजगती असेना ॥ ५९ ॥ ते हे पंच विषय प्रमाण । पांचचि परी अतिदारुण । ब्रह्मादिक इही नाडले जाण। इतरांचा कोण पडिपाडू॥१६०॥ विपयाचे जे गोडपण । तें विखाहूनि दारुण । विप एकदा आणी मरण । पुन पुनः मरण विपयाचेनी ॥६शा पुढती जन्म पुढती मरण । हे विषयास्तव घडे जाण । ससाराचे सबळपण । विपयाधीन उद्धवा ॥६॥ जेथ विषयाचा विषयत्यागू । तेथें उन्मळे भवरोगू । आदेणा मी श्रीरगू । त्यासी विषयभोगू नावडे ॥ ६३ ॥ ते हे पंच विपय गा जाण । तुज म्या केले निरूपण । आतां त्रिगुणाचे लक्षण । ऐक सावधान सागतों ॥ ६४ ॥ उत्पत्तिस्थितिनिर्दळण । त्रिगुणांस्तव घडे जाण । यालागी स्वयें श्रीकृष्ण । तीन्ही गुण अगीकारी ॥६५॥ अंगीकारून तीन्ही गुण । अठावीस तत्त्वें केली पूर्ण । हे कृष्णसमत लक्षण । उद्धवा जाण निश्चित ॥ ६६ ॥ त्रिगुणेषीण प्रकृती । सृष्टिसर्जनीं नाहीं शकी । गुणद्वारा उत्पत्तिस्थिती । सहार अती स्वकार्य ।। ६७ ।। तेचि अर्थाचे निरूपण । स्वयें सागताहे श्रीकृष्ण । कार्यकारणलक्षण । यथार्थ जाण विभाग ।।६८॥ सर्गादौ प्रकृतिहास्य कार्यकारणरूपिणी । सत्वादिमिगुंगेधत्ते पुरपोऽस्यक ईक्षते ॥ १७॥ प्रकृतीपासाव विकारमेळा । निगुणाचिया गुणलीळा । सात कारणे कार्य सोळा। एक घेगळा विभाग ॥ ६९ ।। महदहंकार महाभूते । सातही कारणे निश्चिते । अकरा इंद्रिय विपययुक्तं । इये जाणावी येथे कार्य सोळा ।। १७० ॥ यापरी निजप्रकृती । रजोगुणातें धरोनि हाती । कार्यकारणाचिया युक्ती । करी उत्पत्ति सृष्टीची ॥७१॥ बजिलिये सृष्टीसी जाण । सत्वगुणे करी पालन । तमोगुणे निर्दळण । प्रकृति आपण स्वयं करी ॥२॥ पुरुष न करिता ईक्षण । उत्पत्ति स्थिति निर्दळण । प्रकृतीचेनि नव्हे जाण । तेही उपलक्षण अवधारी ।। ७३ ॥ हात पाय न लाविता जाण । केवळ कूर्मीचे अवलोकन । करी पिलियाचे पालन । तैसे ईक्षण पुरुपाचें ॥७४|| का सूर्याचिया निजकारणी जेवीं अग्नीतें नवे मणी । तेणे स्वधर्मकर्मे ब्राह्मणी । कीजे यज्ञाचरणी महायागू ॥ ७५ ॥ तैसे हैं जाण चिह्न । येणे होय कार्य कारण । चाले स्वधर्मआचरण ! यापरी जाण उद्धचा ॥ ७६ ॥ ऐसे चालता प्रकृतिपर । ब्राह्मण करिती स्वाचार । तेणे वृद्धि कर्माचार । परापर उद्धया ॥ ७७ ॥ तेवीं पुरुषाचे ईक्षण । प्रकृति लाहोनि आपण । उत्पत्ति स्थिति निर्दळण । कराचया पूर्ण सामर्थ्य पावे ।। ७८ ।। छायामंडपाचे विचित्र सैन्य । दिसावया दीपचि कारण। तेची प्रकृतिकार्यासी जाण । केवळ ईक्षण पुरुपाचे ॥ ७९ ॥ जगाचें आदिकारण । प्रकृति होय गा आपण । प्रकृति प्रकाशी पुरुष जाण । तो महाकारण या हेतू ॥ १८० ॥ प्रकृति व्यक्त पुरुप अव्यक्त । हे विकारी तो विकाररहित । हे गुणमयी गुणभरित । तो गुणातीत निजागें ।। ८१ ।। प्रकृति स्वभावे चंचळ । पुरुष अव्ययत्वे अचळ । प्रकृति बद्धत्व शव । पुरुप केवळ बंधातीत ॥२॥ प्रकृति स्वभावे सदा शून्य । पुस्प केनळ चैतन्य. मोठेपणा, प्रतिष्ठा २ खेसाररूपी रोग उमलून जातो (उलथून पडतो, नाश पावतो) ३ भयस्वर्ग आदन दिटेला चाकर, गुलाम ५जग उत्पन्न करण्याविषयी ६ गायैपासू ७ सकरा इदिय य पाच विषय मिळून सोळा हाय प महत्तत्व, महपार प पचमहाभूते ही सात कारणे मिलन प्रकृति यनते ८ सदार अपलोका १. कासवाचे १५ पिला. १२ सूर्यकांत १३ पक्ष्यावर दियाच्या साहायेची चित्रं दासनिम्याकरिता तयार टेन्या मंडपाताल १४मायोपाधिक. - -