पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/573

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय बाविसावा. ५५९ हा अनुप्रवेश वोळख । एकामाजी एक उपजती ॥७३॥ तत्त्वांपासूनि तत्वे होती । कारणरूपें कार्याची स्थिती । अती जेथील तेथें प्रवेशती । हे तत्त्वोपर्पत्ती उद्धवा ॥७४ ॥ पूर्वस्थित में कारण । त्यापासोनि उपजे ते कार्य जाण । हे कार्यकारणांचे लक्षण । तत्त्वविचक्षण चोलती ॥ ७५ ॥ येथ वक्त्याचें जैसे मनोगत । तैशी तत्त्वसख्या होत । कार्य कारण एकचि गणित । तत्त्वसख्या तेथ थोडीच ।। ७६ ।। एकचि कार्य आणि कारण । गणिता आणिती भिन्न भिन्न । तेथ तत्त्वसख्या अधिक जाण । होय गणन उद्धवा ॥७७॥ एवं कार्यकारणे भिन्नभिनें । तत्त्वसख्या थोडी बहुत होणे ही तत्त्ववत्याची लक्षणे । तुज सुलक्षणे सागीतली ॥ ७० ॥ येचि विपयींची उपपत्ती । स्वयें सागताहे श्रीपती । कार्यकारणनिजयुक्ती । उद्भवाप्रती निवाडे ॥ ७९ ॥ एकरिसन्नपि दृश्यन्ते प्रविष्टानीतराणि च । पूर्वसिन्वा परलिन्वा तच्चे सवानि सर्वश ॥ ८॥ आकाशापासूनि वायु झाला । तो गगनावेगळा नाही गेला । वायूपासूनि अग्नि झाला । तेथ प्रवेश आला दोहींचा ।।८०॥ अग्नीपासूनि झाला जळरसू । त्यामाजी तिहींचा रहिवासू । जळापासून पृथ्वीचा प्रकाशू । तीमाजी प्रवेश पहूंचा ॥८१॥ तैसे कार्य आणि कारण । परस्परें अभिन्न जाण । जेवीं लेणे आणि सुवर्ण । वेगळेपण एकत्वे ॥ ८२॥ जेवी तंतूं आणि पेंट । दोनी दिसती एकवट । तेवीं कार्य कारण सगट । दिसे स्पष्ट अभिन्न ॥८॥ साकरेंची नारळे केळी । परी ती सांकरत्वा नाहीं मुकली । तेवीं कारणाची कार्ये झाली। असता सचली कारणत्वे ।। ८४ ॥ जेवों का पृथ्वीचा मृत्पिड । मृत्पिडी अनेक भाड। होती गाडगी उदड । मृत्तिका असंड सामाजीं ॥ ८५॥ तेवीं कारणी कार्यविशेषू । कार्यासी कारणत्वे प्रकाशू हा परस्परानुप्रवेश । अनन्य विलासू अखंडत्वे ॥८६ ।। एक कार्य आणि कारण । होय भिन्न आणि अभिन्न । तेणे तत्वसख्यालक्षण । घडे जाण न्यूनाधिक्यं ।। ८७ ।। पोपमतोऽभीपा प्रससानमभीप्यताम् । यथा विविक्त यदन गृहीमो युक्तिसम्भवात् ॥ ९ ॥ म्यां सागीतली तैशी जाण । तत्त्वसख्या अधिकन्यून । व्हावया हेचि कारण । वक्त्याची ज्ञानविवक्षा ।। ८८ ॥ जैसें ज्यासी असे ज्ञान । जैसा ईप्सितमाभिमान । तैसतैसे तत्वव्याख्यान । ऋपीश्वर जाण बोलती ॥८९॥ जो बोले ज्या मतयुक्ती । ते ते घडे त्या मतसमती मी जाणे सर्वज श्रीपती । यालागी त्या यती मीही मानीं ॥९॥ में बोलिले ऋपिजन । सव्वीस तत्त्वें विवंचून । उद्धवा तुज मी सागेन । सावधान अवधारी ।। ९१॥ अनाविद्यायुक्तस्य पुरुपस्यात्मवेदनम् । म्वतो न सम्भवादन्यस्तयज्ञो शानदो भवेद ॥ १० ॥ प्रकृतिपुरुपमहत्तत्त्वे येथें । अहंकार आणि महाभूतें । इद्रिय विषयसमेते । ये तत्त्व १ एकामध्ये एकाचे शिरणे २ तत्वगणनेची युक्ति ३ चोळसती ४ इच्छा ५ मृत्तिका ही घटाचे कारण व घट हा मृत्तिकेचे कार्य आहे, झणून मृत्तिका पटाला नेहमी व्यापून राहते आकाशतरव वायुतत्वाचे कारण असल्यामुळे त्याचा वायुतत्वात नेहमी प्रवेश ह्मणजे अन्वय बाहे तत्वाचा कार्यकारणहमाने परस्परील प्रवेश बाहेमणून वक्त्याच्या मनोगताप्रमाणे तत्त्वगणना कमीअधिक केलेली आढळते ६ पाणी ५ दागिना ८ सूत १ पन्न १. सासरपणा १तन्ही १२ गाडगी १३ कारणत्वे १४ कार्यकारणवि १५ अधिकतमी १६ इट मताया