पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/574

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५६० एकनाथी भागवत. निश्चिते पंचवीस ॥ ९२ ॥ येथ पुरुप होऊनि भिन्न । जीव वेगळा करूनि जाण । तत्त्वसंख्यालक्षण । केली सपूर्ण सब्बीस ॥ ९३ ॥ जीवाच्या भिन्नत्वाचे कारण । अनादि अवियेस्तव जाण । घेऊनि ठेला देहाभिमान । कर्मबंधन दृढ झाले ॥ ९४ ॥ अहंकर्तेपणाचा खटाटोप । तेणें अगी आदळे पुण्यपाप । विसरला निजरूप । विषयलोलुप्य वाढवितां ॥ ९५ ॥ लागले वद्धतेचे बंधन । न करवे कर्मपाशच्छेदन । त्याच्या उद्धारालागी जाण । ज्ञानदाता सर्वज्ञ ईश्वर ॥ ९६ ॥ गुरुद्वारा पाविजे ज्ञान । तेथें ईश्वराचा आभार कोण । येथ ईश्वरकृपेवीण । सद्गुरु जाण भेटेना ॥ ९७ ॥ झालिया सद्गुरुमाप्ती । ईश्वरकृपेवीण न घडे भक्ती । सद्गुरु तोचि ईश्वरमूर्ती । वेदशास्त्रार्थी समत ॥९८॥ गुरुईश्वरां भिन्नपण । ऐसे देखे तो नागवला आपण । एवं ईश्वरानुग्रहें जाण । ज्ञानसंपन्न होय जीवू ॥ ९९ ॥ गुरूंनी सांगितली ज्ञानस्थिती । ते ईश्वरकृपेवीण चित्तीं । ठसावेना साधकांप्रती । जाण निश्चिती उद्धवा ॥ १०० ॥ जीवे नियम्य ईश्वर नियंती । जीव अज्ञान ईश्वर ज्ञानदाता । जीव परिच्छिन्न एकदेशता । ईश्वर सर्वथा सर्वज्ञ ॥१॥ जीव हीन दीन अज्ञान । ईश्वर समर्थ सर्वज्ञ । जीवास दृढ कर्मबंधन । ईश्वर तो जाण निष्कर्म ॥२॥ एवं ईश्वरकृपें जाण । जीवासी प्राप्त होय ज्ञान । यालागी ईश्वराहून । जीव भिन्न या हेतू ॥३॥ ह्मणशी करितां कर्माचरण । जीवासी प्राप्त होईल ज्ञान । हे सर्वथा न घडे जाण । जडत्वपण कोसी ॥४॥ कर्मा जडत्व जाण । त्यासी बद्धत्व अज्ञान । त्या कर्मासी अत्यंत वद्धपण । हे सज्ञान जाणती ॥ ५ ॥ कर्म स्वरूपें जड अचेतन । त्यासी चेतविता ईश्वर जाण । ते न करिता ईश्वरार्पण । ज्ञानदाता कोण कर्मासी ॥ ६॥ कर्मासी जडत्वें नाहीं सत्ता । कर्मक्रियेचा ईश्वर ज्ञाता । ईश्वरचि कर्मफळदाता । कर्मचेतविता ईश्वरू ॥७॥ जीवासी ज्ञाने सायुज्यता । का स्वर्गभोगफळदाता । अथवा इहलोकी वर्तविता । जीवासी तत्त्वतां ईश्वरू॥ ८॥ यापरी अवश्य जाण । जीव ईश्वर करिता भिन्न । तत्त्वे सबीस सपूर्ण । वोलिले ब्राह्मण या हेतु ॥९॥ पंचवीस तत्त्वाची कथा । ते जीवेश्वरांची ऐक्यता । तेही सांगेन मी आता । त्यांच्या मता समत ॥ ११० ॥ "पुरपेश्वरयोरन न वैरक्षण्यमण्यपि। तदन्यकल्पनाऽपार्था ज्ञान च प्रकृतेर्गुण ॥ ११ ॥ जीवेश्वराची ऐक्यता । सहजचि असे स्वभावता । तेथ अणुमात्र भेदवार्ता । न रिगे सर्वथा निश्चित ॥ ११॥ स्वभावे पाहता दर्पण । एकाचे देखिजे दुजेपण । 'परी द्विधा नव्हेचि आपण 'यापरी जाण जीवशिव ॥ १२ ॥ अज्ञानप्रतिविवित जीव । त्याचा 'द्रष्टा तो सदाशिव । तरी ऐक्यतेचे जे वैभव । तो निजस्वभाव मोडेना ॥ १३ ॥ जेवीं दर्पणामाजी आपण । तेवीं जीवरूपें शिवूचि जाण । दोनी चेतनत्वे समान । तेही लक्षण अवधारी ॥१४॥ जैशी चेष्टा कीजे आपण तेचि प्रतिनिधी दिसे जाण । तेवीं ईश्वरसत्ता सचेतन । गमनागमन जीवासी ॥ १५ ॥ जेणे स्वरूपें असे आपण । तद्रूप प्रतिविधीं १ ईश्वराहून २ कमरूप पाशांचा उच्छेद ३ पूर्ण ४ येथे जीव प ईश्वर याचा भेद स्पष्ट सागितला आहे ५ नियमानी वद्ध झालेला ६ नियमन करणारा ७ एकदेशी, मर्यादित ८ सर्वगत ९ की जाण अलिप्त १० कर्मरहित ११ ज्ञानाने मोक्ष देणारा किंवा वर्गफळ देणाराही ईश्वरच १२ पुढ जीव । ईश्वर यांचा समानचतन्यामुळे अमेद सांगितला माहे १३ आरसा १४ दोन प्रकार,