पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/564

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५५० एकनाथी भागवत. सहस्रशाखी विस्तार । वाढली अपार वैखरी ॥ १९ ॥ स्वरवर्णादि उच्चारीं । वेदाधिष्ठान वैखरी । ते उपजली जेणेकरीं । तेही परी सांगेन ॥ ४२० ॥ ओंकारायलितस्पर्शस्वरोप्मान्तस्थभापिताम् ॥ ३९ ॥ विचित्रभाषावितता छन्दोभिश्चतुरत्तरै । अनन्तपारा घृहती सृजस्याक्षिपते स्वयम् ॥ १० ॥ मात्रात्रयमिळणी लोक । ओंकार वोलती आवश्यक । हा ओंकार अलोलिक । अतिसूक्ष्म देख देहस्थ ॥ २१ ॥ त्याचि ओंकारासी प्राणसंगती । आधारादि चक्री ऊर्ध्वगती । तेथ वाचांची होय अभिव्यक्ती । परा पश्यंती मध्यमा ॥ २२ ॥ परावाचेच्या अभ्यंतरी । जन्मे पश्यंती ज्येष्ठ कुमारी । मध्यमा जन्मे तिच्या उदरीं । एवं परस्परी जन्मती ॥२३॥ तैशाचि येरीतें येरी । नोसडोनि क्षणभरी । चालती उपराउपरी। चक्रींच्या चक्रांतरी समवेत ॥ २४ ॥ आधारचक्री परा वाचा । स्वाधिष्ठानी जन्म पश्यंतीचा । मणिपूरीहनि विशुद्धीच्या । ठायीं मध्यमेचा रिगुनिगू ॥ २५ ॥ तेथोनियां मुसद्वारी। वाचा प्रकाशे वैखरी । ते स्वरवर्णउच्चारी । नानामंत्री गर्जत ॥ २६ ॥ तेचि खर आणि वर्ण । सांगेन स्पर्शव्यक्तिलक्षण । अतस्थ ऊँग्मे कोण कोण । विभागलक्षण अवधारी ॥ २७ ॥ केवळ अ-कचटतप देख । हे ककारादि पंच पंचके । स्पर्शवर्णाचे रूपक । अक्षरें निष्टंक पंचवीस ॥ २८ ॥ सवर्णे गर्जता उच्चार । ते अकारादि सोळाही स्वर । यरलव यांचा विचार । जाण साचार अतस्थ ॥ २९ ॥ शपसह हे वर्ण चारी । ऊमे बोलिजे शास्त्रकारी । विसर्गादि अनुस्वारी । अंअम्वरी विभागू ॥४३०॥ येथ वावन्नावी मातृका। केवळ क्षकारू गा देखा । यांत सानुसानिक निरनुनासिक । जाणती लोक शास्त्रज्ञ ॥३॥ एवं स्वरवर्णविधिउच्चारी । लौकिकी वैदिकी भापावरी । वेदशास्त्रार्थप्रकारी । बाढली वैखरी शब्दचातुर्य ॥ ३२ ॥ बोलेचि गा वोलाप्रती । चाळूनि नाना उपपत्ती । वोले योलोनि गृहस्थीं। युक्तिप्रयुक्ती साधूनी ॥ ३३ ॥ ऐशिया नानाशढकुसरी । अत्यंत विस्तारिली वैखरी । तीचि चौचौ अक्षरी । वाढवूनि धरी नाना छदें ॥३४॥ वाढतां चतुरक्षरभेदें । उत्तरोत्तर नाना छंदें । वाढविली स्वयें वेदें । निजाज्ञाबोधे नेमूनी ॥ ३५ ॥ अतएव अनंत अपार । अर्थता शब्दला अतिदुस्तर । माझ्या शब्दज्ञानाचा पार । सुरनर नेणती ॥ ३६॥ ऐशी वैखरीची अनंतशती । यालागी हाणिजे ते वृहती । इच्या विस्ताराची गती । स्वये नेणती शिव स्रष्टा ॥३७॥ हिरण्यगर्भत्वे स्वयं जाण । जीव शिव अतर्यामिलक्षण । वेदाज्ञा माझी प्रकाशी आपण । जिचे नामाभिधान वैखरी ॥ ३८॥ जो मी वेदात्मा श्रीहरी । तो वेदू या रीती विस्तारी । स्वयें विस्तारोनि सहारी । मर्यादे वरी स्वकाळें ॥ ३९॥ मागां बोलिली छंदें जाण । त्या छंदांचे निजलक्षण । स्वये सागताहे श्रीकृष्ण । जो वेदाचे कारण निजस्वरूप ॥ ४४० ॥ मायग्युष्णिगनुष्टुप् च बृहती पक्तिरेच छ । त्रिष्टुन्जगत्यतिच्छन्दो सत्ययतिजगद्विराट् ॥ ५ ॥ सकळ छंदाचे अधिष्ठान । मुख्य गायत्री छंद जाण । त्या गायत्री छंदाचे लक्षण । १ अ, उ, म, या तीन मात्रा मिळून. २ उत्पत्ति ३ य, र, ल, ४श, प, स,ह ५पासून मपर्यतचे पच पचक पणजे २५ अक्षरें ६अ, आ वैगरे सोळा स्वर. ७ती पाणी चैदिक व लौकिक अशा भापानी विस्तारली जाते ८ अनेक पदाच्या मेदानें चार चार वर्ण उत्तरोत्तर ज्यात अधिक अशा छदानी