Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/562

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४८ एकनाथी भागवत. वेदविभागांची वार्ता । न येचि कोणाचिया हाता । जाण सर्वथा उद्धवा ॥ ७७ ॥ तो मी वेदस्थापक श्रीहरी । लोक राखावया मर्यादेवरी । स्वयें सत्यवतीच्या उदरीं । झाले अवतारधारी श्रीव्यास ॥७८॥ वेदविभागी राजहंसू । यालागी नामें वेदव्यासू । तेणे म्यां केला श्रुतिविलासू । वेदविशेपू चतुर्धा ॥ ७९ ॥ वेद अर्थत्वे अतिदुर्घट । परी वाच कत्वे झाला प्रकट । त्या चारी वाचा अतिश्रेष्ठ । ऐक स्पष्ट सांगेन ।। ३८० ॥ नादाचे प्रथम स्फुरण । घोषवंत सूक्ष्म प्राण । ती नांव परा वाचा जाण । प्रथम लक्षण ॐकार ॥ ८१॥ तोचि नादयुक्त प्राण । अतःकरी होय स्फुरण । ते पश्यंती वाचा जाण' विवेकलक्षण तीमाजी ॥ ८२ ॥ नाभीपासोनी नाभिस्वरी । जे घुमघुमी कंठवरी । ते मध्यमा वाचा खरी । स्वयें श्रीहरि सांगत ॥ ८३ ॥ अकार उकार मकार । स्वरवर्णयुक्त उच्चार । जेथ प्रकट होय ओंकार । ते वाचा साचार वैखरी॥८४॥ ते वैखरीच्या ठायीं शाखोपशाखी जो कांहीं । वेद अनंतरूप पाहीं । त्यासही नाही मर्यादा ॥ ८५ ॥ यापरी वेद अमर्याद । जरी चतुर्धा केला विशद । तरी जनासी अतिदुर्बोध । यालागी उपवेद विभागिले ॥८६॥ ऐसेनिही जनासी न कळे वेद । यालागीं वेदावरी पद । श्रीव्यासे केले विशद । तरी वेदार्थ शुद्ध कळेना ।। ८७॥ येचि अर्थी ऋपीश्वरी बहुत । सुमंतु जैमिनि भाष्य भारत । पैल सूत्रादि जे समस्त । शिणतां वेदार्थ न कळेचि ॥ ८८ ॥ एवं याच्यता आणि लयता । स्थूलसूक्ष्मत्वे वेदार्थज्ञाता । मजवांचूनि तत्त्वता । आणिक सर्वथा असेना ॥ ८९॥ मयोपवृहित भूमा ब्राह्मणाऽनन्तशक्तिना। भूतेषु घोपरूपेण विसे पूर्णय लक्ष्यते ॥ ३७॥ जो मी अंतर्यामी आपण । 'भूमा' माणिजे अपरिच्छिन्न । सबाह्य व्यापकत्वे सपूर्ण। ब्रह्म परिपर्ण जो का मी॥३९॥ तेणे ग्या वेद अधिनित । या नांव बोलिजे 'वहित'। अधिष्ठाता विकारी होत । जेवीं अभ्रांत चंद्रमा ॥ ९१ ।। का अग्नि काष्ठी अधिष्ठिता। त्यासी तत्काळ ये साकारता । मग प्रवळत्व आणि शातता । या विकारावस्था अग्नीसी ॥ ९२ ॥ यापरी विकारी नव्हे जाण । मी अतर्यामी नारायण । ब्रह्मस्वरूपं परिपूर्ण । विकारनिर्दळण स्वयें कर्ता ॥ ९३ ॥ मीचि विकाराचा कर्ता । करूनि मीचि अकर्ता। त्या मज न ये विकारिता । ब्रह्मस्वरूपता स्वभावे ॥ ९४ ॥ ब्रह्म केवळ निर्धर्म । ते केवी करी विकारी कर्म । ऐसा काही कल्पिसी भ्रम । तेही सुगम सागेन ॥ ९५ ॥ माझी योगमाया अनंतशक्ती । जे शंभुस्वयभूसी न ये व्यक्ती । तिचेनि योगें मी चिन्मूर्ती । उत्पत्तिस्थितिसहर्ता ॥९६ ॥ एवं योगमायास्वभावतां । मी सकळ करूनि अकर्ता । त्या मज देशता काळतां । विकारिता स्पर्शेना ॥ ९७ ॥ जरी सत्य असती भेदता । तरी मजही येती विकारिता । माझे निजस्वरूपी पाहता । भेदाची वार्ता असेना ॥९८॥ जेवीं भ्रम सपेत्व १ तत्त्वतां २ वेदार्थाचा प्रश ३ चार प्रकारचा वेद ह्मणजे शब्दब्रह्म त्याचे सूक्ष्म व स्थूल अस दान प्रकार आहेत सूक्ष्माचे तीन मेद असून त्याचे खरूप समजणे फार कठिण आहे ते असें -पहिला सूक्ष्म प्राणमय (याला परा वाणी मणतात), दुसरा सनाद प्राणमय (याला पश्यती झणतात ) तिसरा स्वरवर्णयुचा इद्रियमय (याला मध्यमा वाणी हाणतात) ४ चेंबीपासून ५ मनुष्याची बोलण्याची वाणी 'तरीय वाचो मनुष्या वदन्ति' अशी श्रुति आह ६ लक्षणता व्यापक शब्दब्रह्म सक्ष्मरूपाने सव प्राण्याच्या अतरी नादरूपाने बसत असते ८ पुष्ट झालल ९ शर व महादेव यालाही व्यक नाहीं