Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ एकनाथी भागवत. काचे दांत । देवकीचे गतगर्भ आणित । ईश्वरा ईश्वरू श्रीकृष्णनाथ । जाणे सर्वार्थनिजसिद्धी ॥ ८९ ॥ निद्रा न मोडितां तिळभरी । मथुरा आणिली द्वारकेभीतरी । श्रीकृष्ण कायएक न करी । तोही ममता न धरी कुळाची ॥ ३९० ॥ निजकुळा क्षयो जन्ही आला। तन्ही अन्यथा न करी ब्राह्मणवोला । ब्राह्मणे पापरा जरी हाणीतला । तो हृदयी धरिला पदाकू ॥ ९१॥ तेचि श्रीवत्मलांछन । सकळ भूपणां भूपण । हृदयीं मिरवी श्रीकृष्ण । यालागी पूर्ण ब्रह्मण्यदेवो ॥ ९२ ॥ श्रीकृष्ण गिरी बंदी ब्राह्मण । अन्यथा न करी ब्राह्मणवचन । यालागी ब्रह्मण्यदेवो पूर्ण वेदवंदिजन वर्णिती ॥ ९३ ॥ ब्राह्मणरूप स्वयें श्रीहरी । यालागी ब्राह्मणांचा कैवारी । कुळक्षयो जाहला जरी । तरी द्विजांवरी क्षोभेना ॥ ९४ ॥ ऐकोनि ब्राह्मणांचा शापू । न धरी मोहाचा खटाटोपू । ह्मणे सिद्धि गेला कृतसंकल्पू । कुलक्षयानुरूपू सतोपें ॥ ९५ ॥ यापरी श्रीगोविदुः । काळरूपी मानी आनंदु । कुळक्षयाचा क्षितिबाधू । अल्पही सबंधू धरीना ॥ ९६ ॥ पूर्ण संतोप श्रीकृष्णनाथा । पुढील अध्यार्थी ज्ञानकथा । अतिरसाळ स्वानंदता। अवधान श्रोतां मज द्यावे ॥९७॥ जेथे नारद आणि वसुदेवा । संवाद होईल सुहावा । जनक आणी आर्षभदेवां । प्रश्नोत्तरी जीवा स्वानंदु दाटे ॥ ९८ ॥ हे रसाळ ब्रह्मज्ञानमातु । चाखवीन निजपरमाथु । एका जनार्दना विनवितु । श्रोते कृपा करितु अर्थावबोधे ॥ ३९९ ॥ इति श्रीमद्भागवत महापुराणे एकादशस्कंधे परमहंससहितायां एकाकारटीकाया विप्रशापो नाम प्रथमोऽध्यायः॥१॥ अध्याय दुसरा. श्रीगणेशाय नमः ॥ ॥जय जय देवाधिदेवा । भोगिसी गुरुत्वे सुहाँवा । विश्वी विश्वात्मा ये सद्भावा । एकपणे जेव्हा विलोकिसी ॥१॥ ते विश्ची जो विश्ववासी । त्यात विश्वासी ह्मणसी । तेणे विश्वासे प्रसन्न होसी । ते पायापासी प्रवेशु ॥२॥ त्या चरणारविदकृपादृष्टी । अहं सोहं सुटल्या गाठी । एकसरे तुझ्या पोटी । उठगांठी प्रवेशलों॥३॥ यालागीं तूं निजात्ममाये । या हेतू जंब पाहो जायें । तंव वापपण तुजमाजी आहे । अभिनव काय सांगावे ॥ ४ ॥ येथ मातापिता दोनी । वेगळी असती जनीं । ते दोनी एक करोनी । एकाजनार्दनी निजतान्हें ॥ ५॥ आता उभयस्नेहें स्नेहाळा । वाढविसी मज बाळा । परी नित्य नवा सोहळा । सभ्रम आगळा निजवोधाचा ॥६॥ शिव शक्ति गणेश। विश्व विष्णु चंडाशु । ऐसा अलंकार चहुबसु । निजविलासु लेचविशी॥७॥यापरी मज निजवाळा । लेणी लेवविशी स्वलीळा । आणि लेडलेपणाचा सोहळा । पाहाशी वेळोवेळा कृपादृष्टी ॥ ८॥ वाळका लेपविजे लेणे । तयाचे सुख ते काय जाणे । तो सोहळा मातेनें भोगणे । तेनी जनार्दन भोगिजे सुख ॥९॥ आपुल्या चिद्रलांच्या गाठी । आवडी घालिशी माझ्या कठीं । यालागी मज पाठोपाठी । निजात्मदृष्टि सवे धांवे ॥१०॥ समर्थ १राय २ फोपना ३ दु मटेश ४ गोह ५ मुमलोपारयान नाम ६ ब्रह्ममुख ७विश्वाचा नात्मा नजरेने जेव्हा जवलोकिसी ९ विभयापक १० एकदम ११ आपल्या भक्ताचर आई १२ वैभर १३ अधिक र १५ सरकार १६ मा, गाठली १० अमृत्य चिद्रनाच रक्षण करण्याकरिता माझ्या मागोमाग तू धावतेस, मास्या पाठोपाठीं । निजात्मदही स्वये धाव