Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/539

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एफविसावा अध्याय एकविसावा. श्रीगणेशाय नमः ॥ १ ॐ नमो सद्गुरू बैकुंठनाथा । स्वानंदवैकुंठी सदा वसता । तुझें ऐश्वर्य स्वभावता । न कळे अनंता अव्यया ॥१॥ तुझ्या निजबोधाचा गरुड । कर जोडूनि उमा दृढ । त्याच्या पाखाचा झडाड । उन्मळी सुदृढ भववृक्षा ॥२॥ तुझें स्वानुभकचन । लखलखित तेजाकार । द्वैतदळणी सतेजधार । अतिदुर्धर महामारी ॥३॥ कैसा पाचजन्य अगाध ! निःशब्दी उठवी महाशब्द। वेदानुवाडे गर्जे शुद्ध तोचि प्रसिद्ध शंख तुझा ॥४॥झळफळित सर्वदा निजतेजे मिरवे सदा । करी मानाभिमानांचा चंदा । ते तुझी गदा गंभीर ॥ ५॥ अतिमनोहर केवळ । देखता उपजती सुखकल्लोळ । परमानंद आमोद वहः । ते लीलाकमळ झेलिसी॥६॥जीव शिव समसमानी जय विजय नांवे देउनी । तेचि द्वारपाळ दोनी ! आज्ञापूनी स्थापिले ॥ ७॥ तुझी निजशक्ति साजिरी। रमारूपें अतिसुंदरी । अखंड चरणसेवा करी । अत्यादरी सादर ॥ ८॥ तुझे लोकांचे निवासी जाण । अवघे तुजचिसमान । तेथ नाहीं मानापमान । देहाभिमान असेना ॥९॥ तेथ काळाचा रिर्गमू नाही । कर्माचे न चले काही । जन्ममरणाचे भय नाही । ऐशिया ठार्थी त स्वामी ॥२०॥ जेथ कामक्रोधांचा घात । क्षधेतषेचा बोसांड प्रात । निजान नित्यतृप्त । निजभक्त तुझेनि ॥ ११॥ तुझेनि कृपाकटाक्षे । अलक्ष न लक्षिता लक्षे। तुझे चरणसेवापक्षे । नित्य निरपेक्ष नादविसी ॥१२॥ साम्यतेचे सिंहासन । ऐक्यतेची गादी जाण । त्यावरी तुझे सहजासन । परिपूर्ण स्वभावे ।। १३ ।। तन्मयतेचे निजच्छन । सतोपाचे आंतपत्र । ज्ञानविज्ञानयुग्म चामर ! सहजे निरतर ढळताती ॥ १४॥ तेथे चारी वेद तुझे भाट । कीर्ति वर्णिती उद्भट । अठरा मोगध अतिश्रेष्ठ । वर्णिती चोखट वंशावळी ॥ १५ ॥ तेय साही जैणा वेवाद । नानाकुसरी बोलती शब्द । युक्तिमयुक्ती देती वाध । दाविती विनोद जाणिना ॥ १६ ॥ एक भावार्थी तुजलागुनी । स्तुति करिती न बोलूनी । तेणे स्तवनें सतोपोनी । निजासनी वसविसी ॥ १७॥ ऐसा सद्गुर महाविष्णू । जो चिप सम सहिष्णू । जो भ्राजमाने भ्राजिष्णू । जनी जनार्दनू तो एक ॥ १८ ॥ जनी जनार्दनूचि एकला । तेथ एकपणे एका मीनला । तेणे एकपणाचा ग्रास केला। ऐसा झाला महाबोध ॥ १९ ॥ त्या महावोधाचे चोधाजेन । हातवीण लेववी जनार्दन । तेणे सर्वागी निघाले नयन । देखणेपण सर्वत्र ॥ २० ॥ वरी सर्वत्र देखता जाण । देखणेनि दिसे जनार्दन । ऐशी पूर्ण कृपा करून । दुजेपण साडविले ॥२१॥ ऐसा तुष्टोनि भगवंत । माझेनि हाते श्रीभागवत । अर्थविलें जी यथार्थ । शेखी प्राकृत्त देशभापा ।। २२ ॥ श्रीभागवती सस्कृत | उपाय असता बहुत । काय नेणो आवडले येथ। करवी प्राकृत प्रवोधैं ॥ २३ ॥ म्या करणे का न करणे । हेही हिरूनि नेलें जनार्दने । १ स्वरूपानद हर मुठ तेथे राहणारा २ भेदभावाचा नाश करण्यात ३ तीक्ष्ण, जयर मार देणारं ४ आनद. ५ पुष्करः ६ प्रवेश ७ निजन ८ नेथे लक्ष पाँचत नाही अस मान ९ छर. १० शब्दज्ञान ११ स्तुतिपाठक १२ गायक, पुराणें "अठराही पुराणे हरिसी गाती"-ज्ञानेश्वर १३ सहा शास्त्रांना १४ अतिचातुयान १५ नियलोणी १६ ज्ञानखरूपाने १५ सोसणारा १८ देदीप्यमान १९ ज्ञानाजन २० हातावाचून २१ डोळे "पहियाच्या औरणीं । विवेक करी रावणी । साचचि करचरणा । होती डोळे"-ज्ञानेश्वरी १४-२०६ १२ उपर केलें हरण काम