पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/540

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५३० एकनाथी भागवत गुण ना धर्म । जेथ माया पावे उपरम । तें परब्रह्म उद्धवा ॥४१॥ माझं स्थान चैकुंठ जाण । तेथील प्राप्ति सायुज्य सगुण । पूर्ण सायुज्यता जाण । ब्रह्म परिपूर्ण सदोदित ॥ ४२ ॥ पावावया पूर्ण परब्रह्म । साधकांसी कोणे मार्गी क्षेम । वेदोक्त मद्भक्ती सुगम । उत्तमोत्तम हा मार्ग ॥ ४३ ॥ आणिके मार्गी जातां जाण । कामलोभादि उठे विघ्न । कां बुडवी ज्ञानाभिमान । ये नांगवण प्रत्यवायाची ॥ ४४ ॥ तैसे नाही भक्तिपंथीं । सवे नवविध सागाती । चढता पाउली अतिविश्रांती । भजनयुक्ति मद्भावें ॥ ४५ ॥ येथील मुख्यत्वे साधन । गेलियाही जीवप्राण । कदा न देखे दोपगुण । तै ब्रह्म परिपूर्ण पाविजे ॥४६॥ जेथ नाहीं भवभयभ्रांती । जेथ नाही दिवसराती। जेथ नाही जीवशिवस्थिती। ते ब्रह्म पावती मद्भक्त ॥४७॥ जेथ नाही रूपनाम । जेथ नाहीं काळकर्म । जेथ नाही मरणजन्म । ते परब्रह्म पावती ॥४८॥ जेथ नाही ध्येयध्यान । जेथ नाही जेयज्ञान । जेथ नाही मीतूंपण । तें ब्रह्म पूर्ण पावती ॥ ४९ ॥ ज्यासी नाहीं मातापिता । जें नव्हे देवोदेवता । जे बहु ना एकुलता । तें ब्रह्म तत्त्वता पावती॥४५०॥जेथ नाही वर्णाश्रम। जेथ नाही क्रियाकर्म । जेथ नाही मायाभ्रम । ते परब्रह्म पावती ॥५१॥ जे गुणागुणी अतीत । जे लक्ष्यलक्षणारहित । जें स्वानदें सदोदित । ते ब्रह्म प्राप्त मद्भक्ता ॥५२॥ पूर्णकृपेचा हेलावा । न सटेचि देवा । तो हा एकादशीचा विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥ ५३॥ जेय ठावो नाहीं देहभावा । जेथ समिरस्य जीवशिवा । तो हा एकादशीचा विसांवा । तुज म्या उद्धवा दीधला ॥ ५४ ॥ जेय उगाणा होय अहंभावा । शून्य पडे मायेच्या नांवा । तो हा एकादशीच विसांवा । तुज म्या उद्धवा दीधला ॥ ५५ ॥ जेथ देवभक्तांचा कालोवां । एकत्र होय आघवा । तो हा एकादशीचा विसांवा । तुज म्या उद्धवा दीधला ॥ ५६ ॥ कष्टी स्वानंदें स्वयें जोडावा । त्या स्वानंदाचा आइता ठेवा । तो हा एकादशी विसांवा । तुज म्या उद्धवा दीधला ॥ ५७ ॥ करोनि भेदाचा नागोवा । होय अभेदाचा रिगावा । तो हा एकादशीचा विसांवा । तुज म्यां उद्धवा दीधला ।। ५८॥ काढोनि भावार्याचा भावो । सोलीव सोलिवाचा सोलावो । गाळुनी गाळिवांचा भक्तिभावो । उद्धवासि देवो देतसे ॥ ५९ ॥ यापरी श्रीकृष्णनाथु । होऊनिया स्वानदभरितू । विसाव्या अध्यायींची मात् । 'हरिखें सांगतू उद्धवा ॥ ४६० ॥ आता विसाव्याचा विसावा । स्वानंदसुखाचा हेलावा । तो मी सांगेन एकविसावा । ऐक उद्धवा सादर ॥ ६१ ॥ वेदी शुद्धाशुद्धलक्षण । हे पुढिले अध्यायी निरूपण । एका विनवी जनार्दन । श्रोता अवधान मज द्यावे ॥४६२॥ ॥ इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंघे भगवदुद्धवसवादे एकाकारटीकाया वेदत्रयीविभागयोगो नाम विंशतितमोऽध्यायः ॥ २०॥ ॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ अध्याय ॥ २०॥ ॥श्लोक ॥ ३७॥ ॥ 11 ऑव्या ॥४६२ ॥ ॥एकूण || ४९९ ॥ ॥ ॥ १ कोण २ वेदोक क्मं न केल्याचा जो दोप त्याची फसणक ३ नऊ प्रकाराचे सोबती ४ एक.५भरत ६साठवत नाही. ७ विसावा अध्याय, (पक्षी) विधाति जीव आणि, ईश्वराचे ऐक्य फेड, नागवण, नाश १० ऐक्य. ११ अनायासाने प्राप्त झालेला १० नाश १३ प्रवेश १४ कथाभाग १५ हपनि १६ आदालन