पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/538

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५३० एकनाथी भागवत गुण ना धर्म । जेथ माया पावे उपरम । तें परब्रह्म उद्धवा ॥४१॥ माझे स्थान वैकुंठ जाणं । तेथील प्राप्ति सायुज्य सगुण । पूर्ण सायुज्यता जाण । ब्रह्म परिपूर्ण सदोदित ॥ ४२ ॥ पावावया पूर्ण परब्रह्म । साधकांसी कोणे मार्गी क्षेम । वेदोक्त मद्भक्ती सुगम । उत्तमोत्तम हा मार्ग ॥४३ ॥ आणिके मार्गी जातां जाण । कामलोभादि उठे विघ्न । कां वुडवी ज्ञानाभिमान । ये नागवण प्रत्यवायाची ॥४४॥ तैसे नाहीं भक्तिपथी । सवे नवविध सांगाती । चढता पाउली अतिविश्राती । भजनयुक्ति मद्भावे ॥ ४५ ॥ येथील मुख्यत्वे साधन । गेलियाही जीवप्राण । कदा न देखे दोपगुण । तै ब्रह्म परिपूर्ण पाविजे ॥४६॥ जेथ नाहीं भवभयभ्रांती । जेथ नाही दिवसराती। जेथ नाही जीवशिवस्थिती। ते ब्रह्म पावती मद्भक्त ॥४७॥ जेथ नाही रूपनाम । जेथ नाहीं काळकर्म । जेथ नाहीं मरणजन्म । तें परब्रह्म पावती ॥४८॥ जेथ नाहीं ध्येयध्यान । जेथ नाही ज्ञेयज्ञान । जेथ नाहीं मीतूंपण । ते ब्रह्म पूर्ण पावती ॥४९॥ ज्यासी नाहीं मातापिता । जे नव्हे देवोदेवता । जे बहु ना एकुलता । ते ब्रह्म तत्त्वता पावती॥४५०॥जेथ नाहीं वर्णाश्रम। जेथ नाही क्रियाकर्म । जेथ नाही मायाभ्रम । तें परब्रहा पावती ॥ ५१ ॥ जे गुणागुणी अतीत । जे लक्ष्यलक्षणारहित । जे स्वान सदोदित । ते ब्रह्म प्राप्त मद्भक्ता ॥५२॥ पूर्णकृपेचा हेलावा । न सटेचि देवा । तो हा एकादशीचा विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥ ५३॥ जेथ ठावो नाहीं देहभावा । जेथ सामरस्य जीवशिवा । तो हा एकादशींचा विसांवा । तुज म्या उद्धवा दीधला ॥ ५४ ॥ जेथ उगाणा होय अहंभावा । शून्य पडे मायेच्या नावा । तो हा एकादशीच विसांवा । तुज म्या उद्धवा दीधला ॥ ५५ ॥ जेथ देवभक्तांचा कालोवां । एकत्र होय आघवा । तो हा एकादशींचा विसांवा। तुज म्यां उद्धवा दीधला ॥ ५६ ॥ कष्टी स्वानंदें स्वयें जोडावा । त्या स्वानंदाचा आइता ठेवा । तो हा एकादशी विसाँवा । तुज म्या उद्धवा दीधला ॥ ५७ ।। करोनि भेदाचा नागोवा । होय अभेदाचा रिगावा । तो हा एकादशीचा विसावा । तुज म्या उद्धवा दीधला ॥ ५८ ॥ काढोनि । भावार्थाचा भावो । सोलीव सोलियांचा सोलावो । गाळुनी गाळिवाचा भक्तिभावो । उद्धवासि देवोदेतसे ॥ ५९ ॥ यापरी श्रीकृष्णनाथु । होऊनियां स्वानंदभरितू । विसाव्या अध्यायींची मातूं । हरिखें सागतू उद्धवा ॥ ४६० ॥ आता विसाव्याचा विसावा । स्वानंदसुखाचा हेलावा । तो मी सागेन एकविसावा । ऐक उद्धवा सादर ॥ ६१॥ वेदी शुद्धाशुद्धलक्षण । हे पुढिले अध्यायी निरूपण । एका विनवी जनादैन । श्रोता अवधान मज द्यावे ॥४६२॥ ॥ इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे भगवद्द्धवसवादे एकाकारटीकाया वेदनयीविभागयोगो नाम विशतितमोऽध्यायः ॥ २०॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ अध्याय ॥ २०॥ ॥ श्लोक ॥ ३७॥ ॥ ॥ ऑव्या ॥४६२॥ ॥एकूण ॥ ४९९॥ ॥ ॥ ॥ १कोण, २ वेदोक कम न केल्याचा जो दोप त्याची फसणक ३ नऊप्रकाराचे सोवती ४ एक ५भरत ६साठवत नाहीं ७ विसावा अध्याय, (पक्षी) विश्राति ८ जीव आणि इंश्वराचे ऐक्य ९ फेड, नागवण, नाश १० ऐक्य. ११ अनायासार्ने प्राप्त झाटेला १२ नाश, १३ प्रवदा १४ क्याभाग. १५ हपान १६ आदालन