________________
अध्याय विसावा ५२९ नमय्येकान्तभकाना गुणदोषोद्भवा गुणा । साधना सममित्ताना वुद्धे परमुपेयुपाम् ॥ ३६॥ जो न देखे विषयभेदू । ज्यासी समत्वाचा निजयोधू । तोचि बोलिजे शुद्ध साधू । परमानंदू मद्भजने ॥ १८॥ मी एक परमात्मा सर्व भूती । न देखे द्वैताची प्रतीती। ऐसी ज्यास भजनस्थिती । ' एकातभक्ती' या नाव ॥ १९ ॥ सदा समभावे एकाग्र । माझ्या भजनी अतितत्पर । ते प्रकृतीचे,परपार पावले साचार मंद्रूपी ।। ४२० ॥ ऐसे मदावे भक परिपूर्ण । ते न देखती दोषगुण । उद्धया न्यां है निजखूण । पूर्वी तुज जाण सागीतली ॥ २१ ॥ साकरेची साल फेडणें । की कापुरकोंडा काढणे । रत्नदीपी काजळी फेडणे । तरी गुणदोष देखणे मद्धता ॥ २२ ॥ ज्याचा ध्यावा अवगुण । मुख्य अगुणी मी आपण । ज्याचा ध्यावा उत्तम गुण । तेही जाण मद्रूप ॥२३॥ यापरी भक्तजगजेठी। मद् देखे सृष्टी । त्यासी गुणदोषांची गोष्टी । न पडे दृष्टी सर्वधा ॥ २४॥ गुणदोष न देखावे जाण । हेचि साधनी मुख्य साधन । येचि अर्थीचे निरूपण आदरें श्रीकृष्ण सागत ॥२५॥ एपमेतान्मयादिष्टाननुतिष्ठन्ति मे पथ । क्षेम विन्दन्ति मत्स्थान यद्ब्रह्म परम वितु ॥ ३७॥ इति श्रीभागवत महापुराणे एकादशस्कन्धे विशतितमोऽध्याय ॥२०॥ उद्धवा यापरी जाण । म्या वेदेवाः आपण । उपदेशिले गा जन । भक्तिज्ञानकर्मयोग ॥ २६ ॥ कमचि कम छेदिजेती । ऐशी कर्मयोगाची गती । स्वधर्मक, माझी प्राप्ती। ते म्या तुजप्रती सांगीतली ॥ २७॥ नित्यानित्यविवचन । करूनि अनित्यनिर्दळण । हे ज्ञानयोगाचे लक्षण । तुज म्या संपूर्ण सांगीतले ॥२८॥ तैशीच करिता माझी भकी। सकळ फळे पाया लागती। भक्कासी अनायास माझी प्राप्ती । हेही तुजप्रती सागीतले ॥२९॥ अधिकारभेदेसी साग । त्रिकाड त्रिविध घेदमार्ग । माझे प्राप्तीलागी चाग । विशद विभाग म्या केला ॥ ४३० ।। म्या सांगीतल्याऐसे जाण । जो वेदमार्ग करी अनुष्ठान । तो माझी प्राप्ती पावे सपूर्ण । सगुण निर्गुण यथारुचि ॥ ३१॥ सगुणसाक्षात्कार जो येथ । तें पंच. रात्रागममत । चैकुंठचि मुख्य हाणत । ते मत निश्चित तयाचें ॥३२॥ सप्तावरणांबाहेरी। मायावरणाभीतरी । वैकुंठ रचिले श्रीहरी । हें वोलिजेले धीरी वेदातीं ॥ ३३ ॥ तेथ आग माचे मनोगत । माया ते भगवल्लीला ह्मणत । स्वलीला कुठ रची भगवत । क्षयो तेथ असेना ॥३४॥जेय लीलाविग्रही मेघश्याम स्वयें बसे पपोत्तम । तेथ नाहीं गुण काळ कर्म । मायादि चम रिघेना ॥ ३५ ॥ एप जन्मक्षयातीत । वैकुठ अक्षयी निज नित्य । तेथ पावले ते नित्यमुक्त । हें 'आगममत' उद्धवा ॥ ३६ ॥ मरें आराध्यदैवते प्रसन्ने । हे वेदाथियाचे बोलणे । तें म्या तुजप्रती अनुसधाने । वोलिलों जाणे उद्धवा ॥ ३७॥ भावार्थभक्तीचे लक्षण । ते प्रसन्नतेची खूण । हे पूर्वी केले निरूपण । निरुत जाण उद्धचा ॥ ३८ ॥ ये अर्थी वेदाती हाणत । अत्यंतप्रळयींचा जो आघात । तो चकुंठकैलासादि समस्त । आकारवत निर्दाळी ॥ ३९ ॥ ते काळींचे उर्वरित । केवळ जे गुणातीत । ते पूर्ण ब्रह्म सदोदित । जाण निश्चित उद्धवा ॥४४० ॥ जेथ काळ ना कर्म । जेय १ आमव २ निजकये ३ त्वचा ४ वापराचा कोंडा काढणे ५ सृष्टीमाजी ६ भकयेष्ठ ५ पदवीजे ८ निरसायी, नष्ट करावी १ कमें, वासना व ज्ञान रूप दीन काहानी मरडेला १. वेदाचें नाश छीलने देह धारण करणारा १३ भापली इटदेवता मनानी प्रराम करण, १४ उपर १५ अपशिष्ट