Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/536

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५२८ एकमाधी भागवत. चनें । जें साधे अनेकी साधनें । तें मद्भजने पाविजे ॥ ९४ ॥ हे न साधितां साधन साकडें । नुल्लपितां गिरिकपाटकडे । ही सकळ फळे येती दारापुढें । जै माझी आतुडे निजभक्ती ।। ९५ ॥ उद्धवा तूं ह्मणसी जाण । ऐशी ते तुझी भक्ति कोण । ब्रह्मभावे जें गुरुभजन । ते भक्तीचा पूर्ण हा प्रतापू ।। ९६ ॥ सद्गुरुभजनापरती । साधकासी नाही प्राप्ती । मी भगवंत करी गुरुभक्ती । इतराचा किती पवाडू ॥ ९७॥ मीही सद्गुरूचेनि धर्मे । पावलों एवढिये महिमे । त्या सद्गुरूचे गरिमे । कोणे उपमे उपमावे ॥ ९८ ॥ जे गुरुब्रह्म अभेदभक्त । अचवटें अणुमात्र वांछित । तयां वैकुंठादि समस्त । मी त्यांसी देत स्वर्गापवर्ग ॥ ९९ ॥ हेंही बोलतां अत्यंत थोडें । मी त्यांच्या भजनसुरवाडें । भुललों गा वाडेकोडें । त्यांमागेपुढे सदा तिष्ठं ॥ ४०० ॥ मद्भक्त नैराश्ये अतिगाढे । ते मागतील हे कदा न घडे । तेही लक्षण तुजपुढें । अतिनिवाडे सांगेन ॥१॥ न किश्चित्साधयो धीरा भक्ता होकान्तिनो मम । वान्छन्त्यपि मया दत्त कैवरयमपुनर्भवम् ।। ३४ ॥' ज्यासी नघेणेपणाचा प्रबोधू । साचार झाला अतिविशदू । ऐसा निरपेक्ष जो शुद्ध । तो सत्य साधू मज मान्य ॥२॥ ज्याच्या ठार्टी निरपेक्षता । धैर्य त्याचे चरण वंदी माथां । ज्याच्या ठायीं अधीरता । तेथ निरपेक्षता असेना ॥३॥ कोटिजन्में वोधू जोडे । ते हे निरपेक्षता आतुडे । निरपेक्षतेवरुते चढे । ऐसे नाही फुडें साधन ॥४॥ ऐशिये निरपेक्षताप्राप्ती । माझ्या भजनी अतिप्रीती । तो लामे माझी चौथी भक्ती । जीसी एकांती ह्मणे वेदू ॥५॥ ऐक एकांतभक्तीची मातू । देवाभक्तास होय एकांतू । भक्त रिघे देवाआंतू । देव भक्तांतू सवाद्य ॥ ६ ॥ ऐसे अभेदे माझें भजन । या नाव एकातभक्ति जाण । मजवेगळे काही भिन्न । न देखे आन जगामाजीं ॥ ७॥ त्यासी चहूं पुरुषार्थसी मुक्ती । मी स्वयें देताहें श्रीपती । ते दुरोनि दृष्टी न पाहती। मा धरिती हाती हे कदान घडे ॥ ८॥ ते स्वमुखे काही मागती । हे न घडे कदा कल्पांती । सांडूनि माझी एका. तभक्ती । कैवल्य न घेती ते निजभक्त ॥९॥ तो मोक्षही घ्यावया कोण भावो। त्याचाही मथित अभिप्रायो। स्वयें सागे देवाधिदेवो । अगम्य पहावो श्रुतिशास्त्रां ॥४१०॥ नरपेक्ष्य पर माहुनि श्रेयसमनरपकम् । तस्मानिराशिपो भक्तिनिरपेक्षस्य मे भवेत् ॥ ३५ ॥ ' जो निरपेक्ष निर्विशेष । तो मज पूज्य महापुरुप । मोक्ष त्याचे दृष्टी भूस । धन्य नैराश्य तिहीं लोकीं ॥११॥ ऐक निरपेक्षतेचा उत्कर्ष । तेथ चारी पुरुपार्थ फळकट । वैकुठकैला. सादि श्रेष्ठ । ते पायवाट निरपेक्षा ॥ १२ ॥ निरपेक्षापाशी जाण । 'वोळंगें येती सुरगण । तेथ ऋद्धिसिद्धींचा पाड कोण । वोळगे अगण कळिकाळ ॥१३॥ स्वयं महादेव आपण । सर्वस्वे करी निवलोण । श्रियेसहित मी आपण । अकित जाण तयाचा ॥ १४ ॥ निरपेक्ष जो माझा भक्त । तो मजसमान समर्थ । हेही बोलणे अहाचे येथ । तो मीचि निश्चित चिद्रूपें ॥ १५॥ मी परमात्मा परमानंद । भक्त भजने शुद्ध स्वानंद । दोघे अभेद स्वानंदकद । सच्चिदानंद निजरूपें ॥ १६ ॥ ऐसे मनाचे भक्त सपन्न । ते न देखती दोपगुण । तेचिबिखींचे निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ १७ ॥ १ इतुके न सोसितां साधन संकटे. २ पाड, प्रताप ३ मोठेपणास ४ स्वग व मोक्ष. ५ निश्चयारमक, सष्ट पणे ६ ज्ञान ७ मिळे ८ तारपर्यरूपाने ५ तुच्छ १० चालत ११ गोवाळणी १२ औपचारिक, वरवर.