पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/510

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत पोळखिजे तो कैसा ।। ३७० ॥ हे माझे प्रश्न जी समस्त । यांचा सागावा विशदार्थ ।जो लौकिकाहूनि विपरीतं । उपयुक्त परमार्था ॥ ७१ ॥ लौकिकाहूनि विपरीतार्थ । त्यातें बोलती गा विपरीत । या अवधियांचा मथितार्थ । परमार्थयुक्त प्रश्न सागा ।। ७२ ॥ ज्ञानें सज्ञान सतमूर्ती । त्यांचा स्वामी तूं निश्चिती । यालागी तूतें गा सत्पती । सज्ञान ह्मणती शास्त्रार्थे ॥ ७३ ॥ माझ्या प्रश्नांची प्रश्नोत्ती । परमार्थप्राप्तीलागी श्रीपती । मज सांगावे यथार्थस्थिती । देवासी विनंती उद्धवे केली ॥ ७४ ॥ ऐकोनि भक्ताची विनवण । कृपा द्रवला नारायण । परमार्थरूप त्याचे प्रश्न । स्वयें श्रीकृष्ण सांगेल ॥ ७५ ॥ प्रथम ती श्लोकींचे यम नियम । विशद सांगेल पुरुषोत्तम । इतर प्रश्न अतिउत्तम । सांगेल मेघश्याम अध्यायाती ॥७६ ॥ श्रीभगवानुवाघ-अहिंसा सत्यमस्तेयमसनो हीरमञ्चय । आस्तिक्य ब्रह्मचर्य च मोन स्थैर्य क्षमाऽभयम् ॥ ३३ ॥ प्रथम श्लोकींचा उभारा । यमाची लक्षणे वारा । पुशिल्या प्रश्नानुसारी । प्रतिउत्तरा हरि बोले ॥ ७७ ॥ पुढा प्रश्न आहेत फार । यालागी यमनियमाचे उत्तर । आवरूनि संक्षेपाकार । स्वयें श्रीधर सागत ॥ ७८ । अहिंसा कायावाचामने । परपीडात्याग करणे । सत्य तें यथार्थ बोलणे । अचौर्यलक्षणे ती ऐक ॥ ७९ ॥ हाते चोरी नाही करणे । परी परद्रव्याकारणे । मनीं अभिलाप नाहीं धरणे । अस्तेयलक्षण त्या नांव ॥३८०॥ असता देहगेहसगती । ज्याचे पोटी नाही आसक्ती । जेवी यात्रेमाजी लोक येती। परी सगासक्ती त्यां नाहीं ॥ ८१॥ स्फटिक ठेविला ज्या रगावरी । त्यासारिखा दिसे वाहेरी । आपण निर्विकार अंतरीं । तेवीं जो शरीरी असंगत्वे ॥ ८२ ॥ निंद्य कर्माकारणे । पोटांतूनि कंटाळणे । लौकिकी निद्य कर्मा लाजणे । ही हाणणें या नाव ॥ ८३ ॥ इहलोकी सग्रहो करूं नेणे । जाणे दैवाधीन देहाचे जिणे । स्वर्गसुखभोगाकारणे । नाही सग्रहण पुण्यातें ॥८४॥ पुण्य स्वर्गभोगप्राप्ती । पुण्यक्ष पुनरावृत्ती । जेणे क्षयो पावे पुण्यसपत्ती । तें न सचिती निजभक्त ॥ ८५ ॥ या नाव गा असचयो । ऐक आस्तिक्याचा निर्वाहो । सर्वत्र माझा ब्रह्मभावो । कोठेही अभावो घेऊ नेणे ॥ ८६ ॥ ब्रह्मचर्य एसे येथ । जैसे आश्रमप्रयुक्त । बोलिले शास्त्री यथोचित । तेचि निश्चित करावें ॥ ८७॥ मौनी न वोलावे इतुकें जाण । मिथ्यालाप असंभापण । नित्य करावे वेदपठण | गायत्रीस्मरण का हरिनाम ॥ ८८॥ स्थिर वृत्ति आत्मारामी । का असावी निजधर्मी । भावार्य सतसमागर्मी । स्थिरता उपकमी या नांच ॥ ८९ ॥ स्वदेह दंडिले का चंदिले । परी क्षमा सम दोही काळे । देहाचा भोगू तो देवमेळे । येणे विवेकमेट क्षमावंत ॥ ३९० ॥ या नाव क्षमा झणिजे । अभय ते ऐसे जाणिजे जे जे पारिखें देसिजे । ते ते होइजे आपणचि ॥ ९१ ॥ आत्मा एक पचभूते एक । दुजें पाहता नाहीं देख । निमाले भयाचे महादुःख । अभय नि.शेख या नाव ॥ ९२॥ निमाल्या दुजयाच्या गोठी । बोसदासी भय न मिळे सृष्टी। अभयाची स्वानंद १ मिन या शब्दाचे व्यायहारिक अथ नकोत पण केवल परमाद्धि वाढविणारे अर्थ सागा २ सत्पति हाणज माना, युफ ते सत य त्याचा स्वामी ३ प्रधाच्या अनकमान ४ अस्तेय-चोरी न करणे, ५ अनाच्छादन भारम्भाधीन आहे असे जाणतो ६पारपि जननमय पावणे ७ गायनोमनाचा जप ८ प्रारब्धानुसार