पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/502

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. प्रकाशे । परी जन्ममरणादि दोपें । अलिप्त वसे अविनाशी ॥८॥ जे तिनी गुणां आश्रयभूत । जिचेनि गुणकम वर्तत । ती वस्तु त्रिगुणातीत । तेचि सांगत श्रीकृष्ण ॥ ८९ ।। आदारन्ते च मध्ये च सृज्याज्य यदन्वियात । पुनस्त प्रतिसकामे यरिछप्येत तदेव मत् ॥ १६ ॥ गुणा आदि मध्यम अवसानी । सृष्टि उत्पत्ति स्थिति निधनी । जे असे अविनाशपर्णी । ते मी मानीं सतत्वे ।। १९० ॥ तेंचि सतत्व गा ऐसे । ज्याचेनि आधारे जग वसे । जे जगा सबाह्य भरले असे । जग प्रकाशे ज्याचेनी ॥ ९१ ॥ हे जगचि होय जाये । परी ते सचलेचि राहे । ऐशी जे निजैवस्तु आहे । ते तूं पाहें संतत्वे ॥ ९२ ॥ जैसे घट मठ होती जाती । आकाश राहे सहजगती । तेवी ब्रह्माडा लयोत्पत्ती वस्तुची स्थिति सचली ॥१३॥ जेवी अलंकारापूर्वी सोने । अलंकारी सोनेपणे । अलंकारनाशी नाश नेणे । जेवीं कां सोने निजस्थिती ।। ९४ ॥ तेवी आकळोनि चराचर । वस्तु असे अखंडाकार । होता जातां आकारविकार । वस्तु अणुमात्र विकारेना ।। ९५ ॥ ऐशी जे वस्तु अखंडपणे । तिच्या ठायीं चार प्रमाणे । इही प्रमाणीं वस्तु जाणणें । प्रपंच देखणें मिथ्यात्वे ॥ ९६ ॥ श्रुति प्रत्यक्षमेतिधमनुमान चतुष्टयम् । प्रमाणे वनवस्थानाद्विकरूपास विरज्यते ॥ १७ ॥ एक अद्वैत ब्रह्म पाहीं । दुसरे आणिक काही नाहीं । प्रपंच मिथ्या वस्तूचे ठायीं । हे प्रमाण पाहीं वेदवाक्यं ।। ९७ ॥ प्रत्यक्ष देखिजे आपण । देहादिकांचे नश्वरपण । हे दुसरें परम प्रमाण । जे क्षणिकत्व जाण प्रपंचा ॥ ९८ ॥ मार्कडेयो आणि भुशुडी । इंहीं प्रपंचाची राखोडी । देखिली गा रोकडी । वेळां कोटिकोटि कल्पाती ॥९९ ॥ महाजन । प्रसिद्ध हे श्रवण । प्रपंचासी क्षणिकपण । हे तिसरे गा प्रमाण । उद्धवा जाण ऐतिह्यं ॥ २०० ॥ शास्त्रप्रसिद्धी अनुमान । मिथ्या प्रपंचाचे भान । दिसे मृगजळासमान । वस्तुता जाण असेना ॥१॥ दोर दोरपणे साचार । चमे भासे नानाकार । काष्ठ सर्प की मोत्याचा हार । ना हे जळधार जळाची ॥२॥ तेवी वस्तु एक चिद्धन । तेथ भ्रमें मतवाद गहन । हे शून्य किवा सगुण । कर्मधर्माचरण ते मिथ्या ॥ ३ ॥ यापरी करिता अनुमान । मिथ्या प्रवृत्तिप्रपंचज्ञान । हे वेदातमत प्रमाण । सत्य जाण उद्धवा ॥४॥ तत्वेगळा पट कहीं। योजेना आणिकिये ठायीं । तेवीं ब्रह्मावेगळा पाहीं। प्रपंच नाहीं सत्यत्वे ॥ ५ ॥ चहूं प्रमाणी प्रपंचस्थिती । मिथ्या साधिली निश्चिती । ते प्रपंची विषयासक्ती । साडूनि विरक्ती धरावी ॥ ६॥ येचिविखींचे निरूपण । स्वयें सांगताहे नारायण । उभय लोकी विपयध्यान । तें मिथ्या जाण अमंगळ ॥७॥ कर्मणा परिणामित्वादापिरिच्यादमङ्गलम् । विपश्चिनश्वर पश्येददृष्टमपि दृष्टयत् ॥ १८ ॥ करूनि कर्माचे साधन । पाविजे लोक तो नश्वर जाण । आदिकरूनी ब्रह्मसदन । नन्धरत्वे जाण अमंगळ ॥ ८॥ 0 ते लोकींचें सुख गहन । ते विखें राधिलें जैसे अन्न । खाता गोड परिपाके मरण । तेवीं अधःपतन स्वर्गस्था ॥९॥ जैसा देखिला हा लोक येथ । तैसाचि स्वर्गभोग तेथ । जे दोन्ही जाण अतवंत । नाश प्राप्त दोहींसी ॥ २१० ॥ - १ गुणकार्य २ सत्यत्वाने, शाश्वतभावाने सन् हागजे ब्रह्म यायें है उत्कृष्ट निरूपण आहे ३ संचली वस्तु. ४ 'मेह नानास्ति किचन', 'एकमेवाद्वितीय ग्रह्म' इत्यादि श्रुतिवचनें. ५ थोर लोकाना माहित असे ६ दतस्था ७ मतभद ८ सुनाइन निराळा प्रपचाचे भस्तित्व १० मायिक ११ शिजविल १२ परिणामी