________________
एकनाथी भागवत. आश्रमा प्रकाशकु । त्रिलोकी कृष्ण गृहस्थ एकु । तोचि ब्रह्मचारी नैष्ठिकु । अतिनेटकु सन्यासी ॥ ९८ ॥ कृष्णदेही नाही देवबळ । लीलाविग्रही चित्कल्लोळ । त्याची सर्व करें पावनशीळ । उद्धरी सकळ श्रवणे कथने ॥ ९९ ॥ कृष्णकर्माचें करी जो स्मरण । तें कर्म तोडी कर्मबंधन । ऐसे उदार कर्माचरण । आचरलाश्रीकृष्ण दीनोद्धरणा ॥३००॥ श्रीकृष्ण असेल सकाम । ह्मणाल यालागी आचरे कर्म । ज्याचें नाम निर्दळी सर्व काम । तो स्वयें सकाम घड़े केवीं ॥१॥ श्रीकृष्णाचा स्मरतां काम । स्वये संन्यासी होती निष्काम । सकामाचा निर्दळे काम । ऐसे उदार कर्म आचरला ॥ २॥ तेणे अवाप्तसकळकामें । ऐशी आचरला अगाध कर्मे । मानव तारावया मनोधर्मं । कीर्ति मेघश्यामें विस्तारिली ॥ ३॥ कैसे कर्म सुमंगळु । कानी पडतांचि अळुमाळु । नासोनियां कर्ममळू । जाती तत्काळू श्रवणा-' दरें ॥ ४ ॥ श्रवणे उपजे सद्भावो । सद्भावे प्रकटे देवो । तेणे निर्दळे अहंभावो । ऐशी उदार पाहायो हरिकीर्ति ॥५॥श्रीकृष्णकीर्तीचे स्मरण । कां करितांश्रवणपठन । मागे उद्धरले वहुसाल जन । पुढे भविष्यमाण उद्धरती ॥६॥जरी केलिया होतील पुण्यराशी । तरी अवधान होय हरिकथेसी । येन्हवी ऐकता येरांसी । लागे अनायासी अतिनिद्रा ॥७॥ जे हरिकथेसी सादर । त्यांच्या पुण्या नाही पार । कृष्णे सुगमोपाव केला थोर । दीनोद्धार हरिकीर्तनें ॥८॥ कृष्णकीर्तने गर्जता गोठी । लाजल्या प्रायश्चित्तांचिया कोटी । उतरल्या तीर्थाचिया उठी। नामासाठी निजमोक्षु ॥ ९ ॥ ऐसा निजकीर्तिउदारू । पूर्णब्रह्म सारगधरू । लीलाविग्रही सर्वेवरू । पूर्णावतारू यदुवंशी ॥ ३१० ॥ उतरला धराभार येथ । सत्य न मनी श्रीकृष्णनाथ । यादव उरले अतिअद्भुत । तेही समस्त निर्दळावे ॥ ११ ॥ ये अवतारी हृषीकेशी । ह्मणे हेच कृत्य उरले आह्मासी । निर्दळोनि निजवंशासी । निजधामासी निघावें ॥१२॥ तो यादवामाजी माधव । कालात्मा देवाधिदेव । जाणोनि भविष्याचा भाव । काय अपूर्व करिता झाला ॥ १३ ॥ नारदादि मुनिगण । त्यासि पाचारूनि आपण । करू सांगे शीघ्र गमन । स्वयें श्रीकृष्ण साक्षेपें ॥ १४ ॥ ज्यापासूनि सत दूरी गेले । तेथे अनर्थाचें केलें चाले । हे यादवनिधनालागी वहिले । लाघव केले श्रीकृष्णे ॥ १५॥ भक्त सत साधु ज्यापासीं । तेथें रिघु नाही अनर्थासी । जाणे हे स्वयें हपीकेशी । येरा कोणासी कळेना ॥१६॥ जेथे सताचा समुदायो । तेथे जन्ममरणाचाही अभावो । हा श्रीकृष्णचि जाणे भावो । तो करी उपावो ब्रह्मगापार्थ ॥१७॥जेथूनि सत गेले दूरी । तेथें सद्येचि अनर्थवाजे शिरी। हें जाणोंनियां श्रीहरी । द्वारकेचाहेरी ऋपि घाली ॥ १८ ॥ ऋषि जात होते आश्रमासी । त्यांत लाघवी हपीकेशी। तीर्थमि समस्तासी।पिडारकासी स्वयें धाडी ॥१९॥ पिंडारका मनिगण। श्रीकृष्णे धाटिले कोण कोण ।ज्याचे करिताचि स्मरण । कळिकाळ आपण भये कापे॥३२०॥ विश्वामित्रोऽमित क्ण्वो दुर्वामा भृगुरगिरा । कश्यपो वामदेवोऽनिर्यसिष्टो नारदादय ॥ १२ ॥ जे तपस्तेजें देदीप्यमान । जे पूर्णज्ञाने ज्ञानघन । ज्यांतें सदा बंदी श्रीकृष्ण ते ऋषीश्वर जाण निघाले ॥ २१॥ जे गायत्रीमत्रासाठी । करूं शके प्रतिसृष्टी । जो विश्वमित्र महाटी। तोही उठाउँठी निघाला ॥ २२॥ जेथ न बंधी उपणशीत । ते आश्रमी वसे अतित । भययधन ३ पिपयमोगरा ४ थोडेर्स ५ गोटा ६ शाम नांवाचे धनुष्य धरणारा ७ लीलेन देह भरपारा धीघर मागी १० रोक ११ प्रथम १२ तत्काळ १३ स्वाश्रमासी १४ एकाएकी १५ चारत नाही