________________
एकनाथी भागवत शास्त्रार्थे ॥ १२ ॥ जे ऐकतां निरूपण । परमानंद उथळे जाण । एका विनवी जनार्दन । श्रोतां अवधान मज द्यावे ॥१३॥ सत्राचे अठरावे अध्यायांप्रती । स्वधर्मकम ब्रह्मप्राप्ती। वर्णाश्रमस्थितिगती। उद्धवाप्रती सागीतली ॥ १४ ॥ एकुणिसाचे अध्यायीं जाण । जेणे ज्ञाने साधिले निजज्ञान । त्या ज्ञानाचें त्यागलक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥१५॥ कर्म कर्तव्यता कारण । जीवन्मुक्तासी नाही जाण । उद्धवाचे यमादि प्रश्न । हेही श्रीकृष्ण सांगेल ॥ १६॥ गानयुक्त पांडित्यज्ञान । प्रपंचाचें सिथ्या निरूपण । तें आनुमानिक पुस्तकज्ञान । सत्यपण त्या नाहीं ॥ १७ ॥ पूर्व आहे माझं गमन । हे पूर्वील शुद्ध स्मरण । परी दिग्भ्रम चढल्या जाण । पश्चिमे आपण पूर्व मानी ।।१८।। तैसे शाब्दिक शास्त्रज्ञान । बोले आन करी आन । तेणे नव्हे समाधान । सर्वथा जाण साधका ॥ १९ ॥ जेवी का दिग्भ्रम मोडे । ते पूर्वेचा चाले पूर्वेकडे । तेवी अपरोक्षज्ञान जै जोडे। ते साधकु पडे स्वानंदी ॥ २० ॥ जे जे एके वेदांतश्रवण । ते "अंगें होत जाण आपण । हैं अपरोक्षाचे लक्षण । सत्यत्वे जाण अतिशुद्ध ॥ २१ ॥ ऐसे नव्हता अपरोक्षज्ञान । साडूं नये श्रवणमनन । अवश्य करावे साधन । प्रत्यगावृत्ती जाण अत्यादरें ॥ २२ ॥ झालिया अपरोक्षज्ञान । प्रपंचाचें मिथ्या भान । विपयासी पडले गन्य । कल्पना जाण निमाली ॥ २३ ॥ तेणेचि पुरुचे आपण । त्यागावे ज्ञानसाधन । हेचि निरूपणी निरूपण। देव सपूर्ण सागत ॥ २४ ॥ श्रीभगवानुवाच~यो विद्याश्रुतसपर आत्मवानानुमानिक । मायामानमिद ज्ञारवा ज्ञान च मयि सन्यसेत् ॥१॥ वेदशास्त्रार्थों परिनिष्ठित । श्रवणमननअभ्यासयुक्त । ज्यासी ब्रह्मविद्या प्राप्त । सुनिश्चित्त स्वानुभवे ॥ २५ ॥ तोचि अनुभव ऐसा । दोराअगी सर्पू जैसा । न मारितां नाशे आपैसा । भवभ्रम तैसा त्या नाही ॥ २६ ॥ जेवी का नटाची रोवो राणी । दोघे खेळती लटिकेपणीं । तेवी प्रकृतिपुरुषभवणी । मिव्यापणीं जो जाणे ॥२७॥ जैशी भितीमाजी नानाकार । चिने लिहिली विचित्र ते भितीचि एक साचार । तेवी ऐक्य चराचर जो देखे ॥२८॥ स्वमींची नाना कम जाण । त्यांचे जागृती नव्हे वधन । तेवी मिथ्या निजकर्माचरण । "जीवित्वेसी जाण जो देखे ॥२९॥ऐशी साचार ज्याची स्थिती । त्या नाव शुद्ध आत्मप्राप्ती । निजानुभव त्याते ह्मणती । हे जाण निश्चिती उद्धवा ॥ ३०॥ आणिक एक तेयींची खूण । विषयावीण स्वानंद पूर्ण । हे अनुभवाचे मुख्य लक्षण । सत्य जाण सात्वता ॥३१॥ ऐसा अनुभव नसता देख । केवळ ज्ञान जे शान्दिक । त्यातें हणिजे आनुमानिक । जाण निष्टंक निजभक्ता ॥ ३२ ॥ ज्याच्या अनुभवाभीतरी । नाही अनुमानासी उरी । जो अपरोक्षसाक्षात्कारी । निरतरी नादत ॥ ३३ ॥ ऐसा जो पुरुष जाण । तेणे ज्ञानाचे साधन । आणि प्रतिरूप जे ज्ञान । तेही आपण त्यागावे ॥३४॥ तें न त्यागिता लव १ उचर, उसळे २ प्रियमन ३ पूर्वजाय धरूनि ४ दिदांची भ्राती ५ भलतेच ६ प्रत्यक्ष अनुभव ७ वेदातश्रवण आपल्या अनुभवाशी पटवून घेतो ८ जाय ९ प्रतिपत्ति, प्रत्यावृत्ति १० अतमुखसाधन ११ष्णिात, मुरलेला १२ राजा १३ प्रकृति व पुरुष ही उमारणी १४ मी जीव, मी जअमुक कर्म करीत आह तें सरें सोट असें जो प्रत्यक्ष पाहतो १५ आत्मप्रतीति १६ निरुपाधिक आनद १७ सात्वतकुलाताल, भत्ता १८ शाप ज्ञाा ते अनुमानाचे ज्ञान व निजज्ञान-अपरोक्षशान १९ करपनेच । । ।