________________
अध्याय एकुणिसावा ४८५ लाहें । सहजचि त्याग होये । जेवीं सूर्योदयीं पाहे । सचंद्र तेज जाये तारागणाचे॥३५॥ जेवी हनुमंत देखोनि येता। नवचंडी पळे तत्त्वतां । मा राहारया येरां भूता। उरी सर्वथा उरेना ॥ ३६॥ तेवी माझे साक्षात्कारी । त्यासी पद्धता नाही खरी । मा ज्ञान तिचे निवृत्तीवरी । कैशापरी राहेल ।। ३७ । माझिया अनुभवाच्या ठायीं । बंधमोक्ष मिथ्या पाही । तेय साधनज्ञानाचा काहीं । उपेगू नाही उद्धया ॥ ३८ ॥ परमात्मस्वरूपाच्या ठायीं । हे अवघे मायिक पाही । तेये जानध्यान जे काहीं । न त्यागिता पाही त्यागिले ॥ ३९ ॥ त्यागोनिया ज्ञानध्यान । ज्ञानियासी माझी प्रीति गहन । तेचि प्रीतीचे लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सागत ॥ ४०॥ शानिनस्वहमेरेष्ट म्याओं हेतुश्च समत । स्वर्गवेवापवर्गश्च नान्योऽी महते प्रिय ॥२॥ जो मी अद्वयानंदस्थिती । त्या माझी ज्ञानिया प्रीती । ते प्रीतीची उपपत्ती । ऐक निश्चिती उद्धवा ॥४१॥ ज्ञानियासी अतिर्वल्लभ । जो मी परमात्मा स्वयंभ । जानियाचा परम लाभ । मी पद्मनाभ निजधन ।। ४२ ॥ ज्ञानियासी जो स्वर्ग चाग । तो मजवेगळा नाही मार्ग । ज्ञानियाचा जो मोक्षभाग। तो मी श्रीरंग निजात्मा ॥ ४३ ॥ ज्ञानियाचे स्वधर्मसाधन । ते मी परमात्मा नारायण । मजवेगळे काही आन । ज्ञात्यासी जाण असेना ॥४४॥ज्ञात्यासी स्वर्गमोक्षसुख । मजवेगळे उरले नाही देस। मी चिदात्मा निजव्यापक । भाव निष्टंक पावले ॥ ४५ ॥ ज्ञात्याचा अर्थ स्वार्थ परमार्थ । मी पुरुषोत्तम गा समस्त । आद्य अव्यय अनत । माझं निजसुख प्राप्त ते जाहले ।। ४६ ॥ ऐशी ज्ञानियासी माझी प्रीती । तेही तसेच मज प्रिय होती। तेचि स्वयं श्रीपती। उद्धवाप्रती सागत ॥ १७॥ जानविज्ञानसमिछा पद श्रेष्ठ विदर्मम । ज्ञानी प्रियतमोऽतो मे ज्ञानेनासौ निति माम् ॥ ३॥ ज्ञानविज्ञाननिजसपत्ती । जाहलियावीण माझी प्राप्ती । कोणासी नव्हे स्वरूपस्थिती । मत्पदी गति ज्ञानविज्ञान ॥४८॥ करिता गुरुशास्त्रशुद्धश्रवण । तेणे जाहलेते हणिजे ज्ञान । त्याचा अनुभव तेचि विज्ञान । ऐक लक्षण त्याचेही ।। ४९ ॥ स्वयें स्वयंपाक केला जाण । न जाणे कटु मधुर लवण । जंब चाखिला नाही आपण । ते दशा सज्ञान 'ज्ञान' ह्मणती ॥५०॥ केलिया रसाचे रसास्वादन स्वयें गोडी सेवी आपण । ऐशी दशा ते 'विज्ञान' । उद्धवा जाण निश्चिती ॥५१॥ एवं विज्ञानज्ञाननिजसपत्ती माझ्या उत्तमैपदाची पदमाप्ती । माझे वास्तवस्वरूप जे जाणती । त्याची मज प्रीती अनन्यत्वे ॥ ५२ ॥ चे शास्त्रे युक्तिवळे । माझे स्वरूप कासेनि न कळे । ते ज्यासी वस्तुता आकळे । मज त्यावेगळे प्रिय नाही ॥ ५३ ।। तेचि अतिप्रीतीचे लक्षण । त्याच्या पाउलापाउली जाण । सर्वांग वोडवी मी आपण । करीं निचलोण सर्वस्वे ।। ५४ ॥ त्यासी जे चेले जे लागे । ते मी न मागता पुरवी वेगें। त्यासी विरुद्ध ये जेणे मागें। ते मी निजागें निवारी ॥ ५५ ॥ त्यासी झी ससारवारा लागे । यालागी मीच मी पुढेमागे। सभवता राह सर्वांगे। अतिप्रीतिपागे पागलो ।। ५६ ।। जेणे ज्ञाने ज्ञानी प्रिय होती । त्या ज्ञानाची पवित्र कीर्ती । देवो सागे उद्धवामती । यथार्थस्थिती निजवोधे ।। ५७ ।। १ अहिरावणाची देवी • पद्धता नाहीशी करणारं ज्ञान ३ वधमोक्ष ४ अतिप्रिय ५ स्वत सिद्ध ६ मोक्षसग ७ दुसरे ८ नि सशय ९ अथमा १० आत्मप्रतीति, आत्मातुमय ११ लक्षण १२ परमदापदाची १३ ऐक्यान १४ पक्षानेही करत नाही, १५ पुढे वाकवितों १६ कदाचित १७ वश शारों