पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/492

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८२ एकनाथी भागवत. तेथे सांडणे फळाभिलाख । तेंचि मदर्पण चोख । न करितां देख संकल्पू ॥ ६८ ॥ हो का परिच्याचि रांजणी । निघती मुक्ताफळाच्या श्रेणी । तरी कां ताम्रपर्णी । समुद्रेमिळणी शोधावी ॥ ६९ ॥ आपुलेच घरीची झाडे । फळती कल्पतरूचेनि पाडें । तरी अमरावतीचे चाडे । वृथा वेडे कां शिणती ।। ३७० ॥ हो कां सद्गुरूचे तीर्थ घेता । पाविजे परम पवि. त्रता । तरी धांवावया नाना तीयां । विशेषता ते कायी ।। ७१ ॥ कां ईश्वरत्वे पिता पूजिता । निजमोक्ष लाभे आईता । तरी भजावे देवा देवतां । कोण्या अर्थी सज्ञानी ॥ ७२ ॥ तेवी स्वकर्मचि करितां । लाभे आपली निष्कर्मता । ते स्वधर्मी काम कल्पितां । जीव निजस्वार्था नाडले ॥ ७३ ॥ निर्विकल्पं स्वधर्माचरण । त्या नांव माझें शुद्ध भजन । तेणे भजने होऊनि प्रसन्न । विवेकवैराग्यज्ञान भक्तांसी मी दें ॥७४ ॥ तेणेचि ज्ञाने होय शुद्ध मती । चित्तशुद्धीमाजी परम भक्ती । भक्तीने माझी परम प्राप्ती । भक्त पावती उद्धवा ॥ ७५ ॥ यालागी नैराश्य में स्वधर्मकर्म । तेचि माझं भजन परम । तेणें भजने भक्तोत्तम । स्वयें पुरुषोत्तम होऊनि ठोकती ॥ ७६ ॥ यापरी स्वधर्मस्थिती । लाभे आपुली निजमुक्ती । तेचि म्या तुजप्रती । यथानिगुती सागीतली ॥ ७७ ॥ एततेऽभिहित साधो भवान्पृच्छति यच्च माम् । यथा म्वधर्मसयुक्तो भको मा समियात्परम् ॥ १८॥ इनि श्रीभागवत महापुराणे एकादशन्धे अष्टादशोऽध्याय ॥ १८ ॥ उद्धवा पुसिले त्वा मजप्रती । स्वधर्म केवीं घडे मुक्ती । भक्तीने पाविजे निजमुक्ती । ते म्या तुजप्रती सांगीतले ॥७८ ॥ हाता आलिया स्वधर्म । तत्काळ निरसे स्वकर्म । उडोनि जाय भवनम । प्राप्ती परम स्वधर्म ॥ ७९ ॥ माझिया प्राप्तिलागी स्वकर्म । नैराश्ये आचरावा स्वधर्म । हें ज्यासी कळे वर्म । तया पुरुपोत्तम सदा वश्य ॥ ३८० ।। स्वधर्माऐसा स्पर्शमणी । सापडल्या निर्विकल्पपणी । तो लावितां दृश्यस्थानी । चिन्मात्रसुवणी तें उठी ।। ८१॥ स्वधर्माऐमा दिनमणी । नैराश्य उगवलिया स्वभुवनीं । तो अज्ञाननिशा निरसुनी । स्वप्रकाशपर्णी सदा वर्ते ॥ ८२ ॥ स्वधर्माऐसे निजअमृत । जे निर्विकल्पें सेबू जाणत । त्यासी जन्ममरणाचा आवर्त । मी श्रीअनंत लागो नेदीं ॥ ८३ ॥ जे का स्वधर्मी विमुख । त्यासी माझी प्राप्ती नाही देख । जन्मकोटी परम दुःख । सकामें मूर्ख भोगिती ॥ ८४ ॥ त्या स्वधर्माची अतयं गोष्टी । न कळे नैष्कम्य निजदृष्टी । याचिलागी जन्मकोटी । अतिसकटी जीव भोगी ॥ ८५ ॥ स्वधर्मं करिता स्वकर्म । जै नैकर्म्यतेचे कळे वर्म । ते विभाडूनि मरणजन्म । परब्रह्म पावती ॥८६॥ एवं स्वधर्म यापरी । तारक होय ससारी । स्वधर्माचे नावेवरी । तरले भवसागरी निजभक्त ॥ ८७ ॥ ससार तरले हा बोलु कुडौ । स्वधर्म करितां माझिया चाडा । होय भवसागरी कोरडा । मी सापडे पुढा निजात्मा ॥८८ ॥ ऐशी स्वधर्माची थोरी । निष्कामतेच्या निजकुसरी । देवो सागे आवडीभरी । नानापरी प्रबोधे ।। ८९॥ भक्तिप्राधान्य भागवत । १ फळाची इच्छा २ पची ३ या नावाची नदी ४ सागरास जेथे मिळते त्या जागी ५ सहज, श्रमावाचून ६ फलाशा सोहन ७ राहतात ८ स्वाधीन ९ सूर्य १. भोवरा, फरा ११ हाणून, नाशन १२ सोटा "येय एकान लीरा उरले । जे सर्वभाव मज भजले । तया ऐलीच यही सरल । मायाजळ ॥" ज्ञानेश्वरी अध्याय ७-९७ १३ प्रेमान. १४ भक्तीचा ज्यात मोठेपणा सागितला आहे अमे