पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/470

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६० एकनाथी भागवत. ॥४३॥ सर्वांचे आपत्तीचे निवारण । राजेनि' करावें आपण । त्या राजधर्माचे लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ४४ ॥ सवी समुद्धरेदाजा पितेव व्यसनारप्रजा । आत्मानमात्मना धीरो यथा गजपतिर्गजान् ॥ ४५ ॥ सर्वाचे आपत्तींत रक्षण । राये करावे आपण । दीन दुर्वळ ब्राह्मण । अयाचित जन शोधूनी ॥ ४५ ॥ व्यसन प्राप्त निजात्मजा । पिता संरक्षणी निघे पैजा । तेवी आपत्ती. पासोनि प्रजा- । सरक्षणी राजा सादर ॥ ४६॥ करूनि प्रजांचें सरक्षण । आपुल्या आपतीसी आपण । स्वयें करावे निवारण । हा स्वधर्म जाण रायाचा ॥४७॥ चिखली रुतल्या भद्रजाती । स्वयें निघे आत्मशक्ती । गजी गर्जशावे नेणों किती। काढिती रुतीचाहेरी ॥४८॥ तेवी राजा जो भूपति । तेणे प्रजा रक्षाव्या आपत्ती । आपुलेही आपत्तीची निवृत्ती । निजात्मशक्ती जो करी ॥ ४९ ॥ ऐशिया स्वधर्मस्थिती । सादरें वर्ते जो भूपती । त्याच्या स्वधर्माची फलप्राप्ती । स्वयें श्रीपति सांगत ॥ ४५० ॥ एवविधो नरपतिर्विमानेनाकंवर्चसा । विध्येहाशुभ कृरस्रमिन्द्रेण सह मोदते ॥ ४६॥ । यापरी जो का नृपती । इहलोकींच्या राज्यप्राप्ती । अधर्म नाशोनि स्वधर्मस्थिती । स्वर्गमाप्ती तो पावे ॥५१॥ राज्याचे अंती नरक । ऐसें बोलती ज्ञाते लोक । ते निरयगैती नाशोनि देख । स्वधर्म परलोक पावले ॥५२॥ ते स्वर्गलोकी गा जाण । अर्कप्रकाशासम विमान । तेथ आरूढोनि आपण । इंद्रासमान सुख भोगिती ॥५३ ॥ गृहस्थाश्रम अंतिविपम । तेथें आचरतां स्वधर्म । वोर्डवती जे का दुर्गम । ते आपद्धर्म अवधारी ॥५४॥ सीदन् विप्रो वणिग्वृत्या पण्यरेवापद तरेत् । बङ्गेन वापदाका तो न त्या कथचन ॥ ५७ ॥ स्वधर्म पीडिता ब्राह्मणासी । तेणे करावे वणिग्वृत्तीसी । का दुरावले क्षात्रधर्मासीं । ते हिसादि दोषी अतिदुष्ट ॥ ५५ ॥ ब्राह्मणासी हिसाकर्म। तो जाण पा परम अधर्म । लागल्या अनुपपत्ती परम दुर्गम । ते क्षात्रधर्म करावा ॥ ५६ ॥ करितां वाणिज्यकर्मास.। । तिळ सर्पप कापस । कालवणादि रस तैजस । याच्या महादोप विक्रयीं ।। ५७ ॥ या सोडोनि सदोपा समस्तां । लागावे वाणिज्यपंथा। तांबूलपणे श्वेतवस्त्रता । हें विकितां निर्दुष्ट ॥ ५८ ॥ ऐशिया वाणिज्यस्थिती । ज्याची टळेना अनुपपत्ती । तेणे खड्ग घेऊनि हाती । क्षात्रवृत्ती करावी ॥ ५९॥ तेथें चोरावी ना अगें । रणीं न सरावे मागें । स्वामिकार्याचेनि योगें । देहत्यागें उठावे ॥४६० ॥ ऐशिया शुद्ध क्षात्रवृत्ती । ब्राह्मणे कंठावी अनुपपत्ती । परी नीचसेवा प्राणातीं । श्ववृत्ती न करावी ॥ ६१ ॥ क्षत्रियासी स्वधर्मे अनुपपत्ती । लागल्या वर्ता कोणे स्थिती । ते विशद करूनि श्रीपती । उद्धवाप्रती सागत ॥ ६२॥ वैश्यवृत्या तु राजन्यो जीयेन्मृगययाऽऽपदि । चरेद्धा विप्ररूपेण न श्ववृत्या कथचन ॥४८॥ । . क्षत्रियासी लागल्या अनुपपत्ती । पूर्वोक्त करावी वणिग्वृत्ती । का पारधी करावी १राजाने, धनिकानं २ सकट ३ मापल्या पुनाला ४ दृढनिश्चयाने ५मत्त हस्ती ६ या हत्तीच्या इत्तिणी व छावे ७ अति ८ नरकप्राप्ति. ९ सूर्यप्रकाशासाररी देदीप्यमान १० फार कठिण ११ प्राप्त होतात १२ व्यापाराला, वाणि च्याय १३ गौतमाच्या मते वणिग्वृत्तीपेक्षा क्षात्रवृत्ति अधिक श्रेयस्कर आहे, परंतु क्षनियति हिसाप्रचुर असल्यामुळे भगवतानी अगोदर पणिग्वृत्ति स्वीकारण्यास सागितले आहे, व तिनही अनुपपत्ति झाल्यास मगजे सकट क्विा भरिट न गेल्पास मग क्षात्रवृत्ति घेण्यास मागितले भाहे १४ मोहरी १५ कापूस १६ तूप, तेल, वगैरे १७ त्या साडोनि १८ भापत्ति पूर होत नाही १९ भापकाळ, सकटकाळ २० कुत्र्यासारखे वर्तन अति नीचाची सेवा, फिया नीच भशी सेवा मृगया, शिकार.