पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/469

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सतरावा. ४५९ अनंत । जो पूर्णवैराग्ययुक्त । तपादि साधनी सतत । सदा शिणत ब्राह्मण जे ॥ २२ ॥ त्यासी देहपाताच्या अती । माझ्या अनंत सुखाची प्राप्ती । तेथ स्वर्गसुखादि सपत्ती । मावळती तत्काळ ॥ २३ ॥ ज्या सुखाचे सुसस्थिती । स्फुरेना ससारस्फूर्ती । जेथूनि नाही पुनरावृत्ती । ते सुखप्राप्ती त्या ब्राह्मणां ॥ २४ ॥ कृपादि साधनयुक्ती । ब्राह्मणा ब्रह्मसु. खप्राप्ती । त्याचि सुखाची सुखसपत्ती । शिलोंछवृत्ती साधका ॥२५॥ शिरोवृत्या परितुएचित्तो धर्म महान्त निरज जुषाण । मर्पितारमा गृह ण्य तिष्टमानिप्रसक्त समुपैति शान्तिम् ॥ १३ ॥ शिल अथवा उंछवृत्ती । करूनि संतुष्ट चित्तवृत्ती । विषयवैरोग्ये मत्माप्ती । पूजिती अतिथी माये ॥ २६ ॥ अतिथी आलिया देख । प्राणातीही नव्हे पराङ्मुख । नाठवे निर्ज तहानभूक । समयीं आवश्यक दे अन्न ॥ २७ ॥ तेथ अत्यादरेंसी जाण । देउनि अत्यंत सन्मान । यथानुशतया देता अन्न । मी जनार्दन सतुष्टें ॥२८॥ साडूनियां अभिमान ! सर्व जीवांसी सर्वदा लीन | या नांच महद्धर्म जाण । शुद्ध लक्षण हे धर्माचें ॥ २९॥ ऐसे में स्वधर्माचरण । तें कासी अतिभूपण । ये धर्मी न रिघे दूपण | अतिशुद्धाचरण या नांव ॥ ४३० ॥ मजमार्जी रंगली चित्तवृत्ती । यालागी विसरला गृहासक्ती । त्यासी गृहाश्रमी माझी प्राप्ती । सुखसपत्ती निजबोधू ।। ३१ ।। निर्धनासी ऐशिया रीतीं । गृहाश्रमी माझी माती । आतां संधनाचे प्राधीची स्थिती । ऐक तुजप्रती सागेन ।। ३२ ॥ सधन होय जे सज्ञान । से न करितां अतिसाधन । माझी प्राप्ति अतिसुगम जाण । ऐक लक्षण तयाचें ॥३३॥ . सगुद्धान्ति ये विप्र सीदन्त मस्परायणम् । ताउखरिष्ये नचिरादापयो मौरिवार्णवात् ॥ १४ ॥ आधीच पूज्य ब्राह्मण । त्याहीवरी माझा भक्त जाण । माझे निजभजने अतिसपन्न । मद्भावे पूर्ण परिपक्क ।। ३४॥ मागणे नाही सर्वथा । हा नेम माझिया निजभक्ता । त्यासी पीडिजे क्षुधादि व्यथा ते निवारिता जो होय ॥ ३५॥ देऊनि अन्न धन जीवन। वस्त्र आदिकरूनि लवण । ऐसे वेचूनियां निजधन । भक्तस रक्षण जो करी ॥ ३६॥ नाही देणे निर्भसिता । देउनि आभार न ठेवी माथा । सन्माने अतिनम्रता । जो मद्भक्ता सरक्षी ॥ ३७॥ जेवीं पोटांतले केळवळेंसी 1 माता गोड ते दे बाळकासी । तेवीं साडोनि निजस्वार्थासी । माझ्या भकासी जो रक्षी ।। ३८ ।। तैं मागे साडूनि निजभक्ता । त्यासी मी याही आपुले माथा । मग वैकुंठाही वरुता। लाहीपरता पायीं ॥ ३९ ॥ ज्यासी म्याँ वाहिले निजमाधा । त्यासी कोण्या अर्थाची दुर्लभता । जो सरक्षी माझ्या निजभक्ता। त्यासी उद्धरिता मी उद्धवा ॥४४०॥माझे भक्ताची साकडी । जो कोणी निजागें दवडी। त्यासी भवार्णवपरथडी। तत्काळ रोकडी मी, पाचवीं ।। ४१ ।। जेवीं का जळसागरी । नाव धनवंतात तारी। तेवी भकरक्षका ससारीं । मी उद्धरी उद्धवा ॥ ४२ ॥ यापरी धनवंत जन | जो करी भकसरक्षण । देवकीवसुदेवाची आण । त्याचे उद्धरण मी करी . १ऐसें २ भरणकाळी ३ लय पावतात ४ जन्मरणाचे फेरे ५ विषयांविषयी उदासीन झाल्यामुळे माझ्या प्राप्तीसाठी अनिधीना मद्प भावून त्याचा सतोप करितात ६ आपली ५ सामयानुसार ८ रमली, सासरू झाली आरमशान १० द्रव्यवताच्या ११ उदक १२ उपफार १३ ममतेने, १४ साहीपलीय हे १५ सक्दै १६ रासाररूप समुदाया परपार