________________
एकनाथी भागवत इज्याध्ययनदानानि सर्वपो च द्विजन्मनाम् । मतिमहोऽध्यापन च ब्रामणस्यैव याजनम् ॥ ४०॥ ." ब्राह्मणाचें पट्कर्म जाण । यजन याजन अध्ययन । अध्यापन प्रतिग्रहो दान । नेमस्त जाण ही सहा ॥१॥ हो कां द्विजन्में तिन्ही वर्ण । त्यांत क्षत्रिय वैश्य दोघे जण । त्यांस ती कर्मी अधिकारपण । यजन दान अध्ययन ॥ २॥ जे उत्तमजन्मे ब्राह्मण । त्यांसी पट्कर्मी अधिकार जाण । तीनी परमार्थासी पूर्ण । जीविकावर्तन ती कमीं ॥ ३॥ कोणे कर्म जीविकेसी । कोणे पाविजे परमार्थासी । त्या ब्राह्मणकर्मविभागासी । ऐक तुजपाशी सांगेन ॥ ४ ॥ यजन ते यज्ञाचरण । अध्ययन तें वेदपठण । दान में देणे आपण । हे त्रिकर्म जाण परमार्था ॥५॥ गुरुत्व घेऊनि आपणें । याजन ते याग करवणें । अध्यापन वेद पढवणे । स्वयें दान घेणे तो प्रतिग्रहो ॥ ६॥ जाहलिया सच्छिष्यसंपत्ती । इये तिहीं कम जीविकावृत्ती । गुरुत्वे गुरुपूजाप्राप्ती । तेणे जीविकास्थिति ब्राह्मणा ॥७॥ क्षत्रियवैश्यद्विजन्म्यांसी । गुरुत्व बोलिले नाहीं यांसी । ही तीन्ही कर्मे त्यांसी । निषेधतेसी यालागीं ॥८॥ आतां ब्राह्मणाचे लक्षण । स्वयें सागताहे श्रीकृष्ण । मुख्य मुख्यतम साधारण । त्रिविध जाण उद्धवा ॥९॥ प्रनिग्रह म यमानस्तपस्तेजोयशोनुदम् । अ याभ्यामेव जीवेत शिलवा दोपदक तयोः॥ ५१ ॥ स्वधर्मनिष्ठ ब्राह्मणापाशीं । तपतेजधैर्ययशोराशी । प्रतिग्रहो इतुकियांसी । मूलनाशासी कारण ॥ ४१० ॥ जो स्वधर्मनिष्ठ ब्राह्मण । करी प्रतिग्रहो अगीकरण । तो जाण पां साधारण । हे एक लक्षण द्विजाचे ॥ ११ ॥ जो प्रतिग्रहा पराङ्मुख ब्राह्मण । तेणें याजन अध्यापन जाण । स्वधर्मकरूनि द्रव्यार्जन । जीविकावर्तन करावे ॥ १२॥ धरोनि द्रव्याशा मानसीं । न करवावे यागांत कर्मासी।का सागोनि वेदाक्षरासी । द्रव्य त्यापाशी इच्छं नये ॥ १३ ॥ करूनि वेदाक्षरदान । जो शिष्याचेही न घे धन । ऐसा वैराग्य परिपूर्ण । तो शुद्ध ब्राह्मण सर्वथा ॥ १४ ॥ ऐक त्याचे जीविकावर्तन । शिल का उछवृत्ती जाण । ऐक त्याचेही लक्षण । सकारण सांगेन ॥ १५ ॥ शेत सवगूनि नेल्या जाण । ते शेती प्राप्त कणिसे का कण । ते शिलवृत्ति सपूणे । ऐक लक्षण उंछवृत्ती ॥ १६ ॥ स्वामी नसतां सांपडले जाण । ऐसे हाटवाटी पडिले कण । ते वेचूनि घेणे, आपण । जीविकावतन यावरी ॥ १७॥ या नाव उछवृत्ती । ब्राह्मणाची अतिशुद्ध स्थिती । तोही प्रकार उद्धवान पति सागत ॥ १८ ॥ , ग्रामणस्य हि देहोऽय क्षुद्रकामाय नेप्यते । कृच्छ्राय सपसे चेह प्रेत्यानतसुखाय च ॥ ४२ ॥ वर्णामाजी उत्तम वर्ण । त्या ब्राह्मणाचा देहो जाण । क्षुद्रकामार्थ निर्माण | देवे आपण नाही केला ॥ १९ ॥ पशुपक्ष्यादि योनीच्या ठायीं । कामावांचूनि आन नाहीं । तेचि ब्राह्मणाचे देहीं । तें विशेष कोण उत्तमत्वे ॥ ४२० ॥ ब्राह्मणाचे देही जाण । करावे स्वधर्म अनुष्ठान । माझेनि उद्देशे संपूर्ण । तपसाधन' कृच्छ्रादिके ॥ २१ ।। मी. हृदयी धरोनि १ वेद शिक्षण २ दान घेणं ३ तीन कर्माचा अधिकार ४ तीन फम परमार्थप्राप्ति करून देतात पती उदरनिर्वाहाची साधी होतात यजन, अध्ययन व दान देणे ही तीन फी पहिल्या वगोतला आहत ५ निपिस सागितली आहेत ६ उद्धवा ७ कणशायर्जन शिलम" ह्मणजे शेतातून धन्याने टाकलेली धा याची फणमें वेंचून आणणे ही वृत्ति शिल'पत्ति होय ८ "उछ कणश आदानम् " याजाराच्या जागेवर पडलेलें धान्य टिपून आणणे या वृत्तीला 'उछ' पृत्ति गणतात ९ कापून नेल्यावर. १० मालक ११ भाजारात १३ दललया इम्छेकरता. 1 - H