Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/454

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. वर्णानामाश्रमाणा घ जन्मभूम्यनुसारिणी । आसन्मकृतयो नृणा नीचैर्मीचोत्तमोत्तमै ॥ १५ ॥ जैसें जन्म जैसे स्थान । त्या वर्णाश्रमांमाजी तैसे गुण । उत्तमी उत्तमत्व जाण । नीचों नीचपण सहजचि ॥ ८१ ॥ सत्वप्राधान्ये ब्राह्मण । सत्वरजे क्षत्रिय जाण । रजतमें वैश्यवर्ण । शूद्र ते जाण तमोनिष्ठ ॥ ८२ ॥ तेचि ब्राह्मणादि चारी वर्ण । त्यांचे प्रकृतींचें लक्षण । वेगळे वेगळेचि पैं जाण । स्वयें नारायण सागत ॥ ८३ ॥ शमो दमस्तप शौच सन्तोप क्षान्तिरार्जवम् । मद्भक्तिश्व दया सत्य नामकृतयस्विमा ॥१६॥ उद्धवासी झणे श्रीकृष्ण । ब्राह्मणप्रकृति दशलक्षण । तुज मी सागेन निरूपण । तें सावधान अवधारी ॥८४॥ मनादि ज्ञानेंद्रियवृत्ती । वाह्य दृष्टी परिचारस्थिती। ते आवरूनि विवेकयुक्ती । आत्मप्रतीती धरावी ॥ ८५॥ तेचि वृत्तीचे धरणे ऐसे । कृष्णसर्पाचे मुख धरणे जैसे । तो वेढे उकली आपैसे । तंव धारणा सौरसे नेहटावी ॥८६॥ तेवी वैराग्यप्रतापवशें । गुरुवचनाचेनि विश्वासे । अंतरवृत्तीतें नेहावे ऐसे । जंव ये आत्मसमरसें निजात्मता ॥८७॥ मुख्य करूनि गुरुवचन । तदर्थी बुद्धि निमन । तत्प्रवणे होय मन । शम तो जाण या नाव ॥ ८८॥ ब्राह्मणप्रकृतीमाजी जाण । हे स्वाभाविक निजलक्षण । या नाव गा शमगुण । ऐक निरूपण दमाचें ॥ ८९ ॥ विषयप्रवृत्ति प्रचंड । कर्मेंद्रियाचे वळ वंड । विधीने त्यांचे ठेचूनि तोंड । सैरा वितंड विचरों नेदी ॥ ९० ॥ वेदविधीचेनि हाते । देहनिर्वाहापुरतें । खाणे जेवणे इद्रियातें । तो जाण येथें दमगुण ॥ ९१॥ तेथ शम तो जाण मुख्य राजा। दमादि इतर त्याच्या प्रजा । ते दोनी सांगीतले वोजा । ऐक तिजा तपोनेमू ॥ ९२ ॥ शमें ज्ञानेद्रियउपशमू । तोचि कर्मेंद्रिया मुख्य दमू । याहीवरी वेदोक्त कर्मू । ते ज्ञान परमू गौरवाचें ॥९३॥ शरीरशोपणा नाव तप । ते प्रारब्धभोगानुरूप । हृदयीं हरि चितणे सद्रूप । हे मुख्य तप तपामाजी ।। ९४ ॥ जो वर्ततां स्वधर्मस्थिती । हरीतें विसवेनां निजवृत्ती। जो आत्मनिश्चयो चित्तीं। अहोराती"विवंचित ॥१५॥ जेवीं लोभिया वाहे धन । का तरुणालागी तरुणी जाण । तैसें निजात्मविवंचन । जयाचें मन सदा करी ॥९६॥ त्या नाव गा तपोनिष्ठ । हे तपामाजी तप वरिष्ठ । ब्राह्मणप्रकृतीमाजी श्रेष्ठ । तप ते उद्भट या नाव ॥१७॥ ऐक शौचाचा विचार । तो आहे. द्विकार । अतरी ज्ञान निर्धार । वाह्य आचार वेदोक्त ।। ९८॥ वाह्य मळाचे क्षाळण । मृजलादि वेदविधान । आतर मळाचे निर्दळण । आत्मज्ञान निजनिष्ठा ॥ ९९ ॥ शुद्ध 'शौचे निर्मळपण । मुख्यत्वे उद्धवा हेंचि जाण । आता सतोपाचे लक्षण । ऐक सपूर्ण सागेन ॥१०॥ पुत्र जन्मल्या होय सुख । तो गेलिया सवेचि दु.ख । धन जोडलिया होय हरिख । सवेचि शोक तन्नाशी ॥१॥ ज्या सुखाची होतां भेटी । नि.शेष मावळे दुःखकोटी । या नाव सत्य सुखसृष्टी । इतर चावटी ते मिथ्या ॥२॥ निरुपचार अंतरगती । मद्भावे जे सुख १ ब्राह्मणवर्ण मुरा या उत्तमस्थानापासून निघाला ह्मणून उत्तम, क्षत्रिय, वैश्य,शद हे कमी कमी समजावे तसेंच सन्यास व ब्रह्मचर्य ही मस्तक व हृदय यापासून निघाली ह्मणून उत्तम, त्याच्या खाली वानप्रस्थ व चवथा गृहस्थाश्रम २ रक्षण. ३ लक्ष्यपूर्वक पहावी, सावधपणाने राखावी ४ आवरावें ५ ला ठाया तत्पर ६ यथायोग्य तिसरा ८ शरीरास कट देण्याच्या क्रियेला ९ विसरत नाही १० विचारीत ११ आत्मविचार १२ उज्ज्वल १३ दोन प्रकारचा १४ माती, पाणी इत्यादि १५ राम, दम तप व शौच याची लक्षणे ज्ञानोबारायानी अशीच दिली आहेत ते झणतात -बुद्धि पिपयापासून अपशम पाचविणे हा शम, विधिदडान पायेद्रियाना अधर्माकड़न परतविणे हा दम, 'ईश्वरनिर्णय चित्ती बाद सदा है तप य 'मन भावशुद्धी भरलें । आंग क्रिया अलकारिल दोन प्रकारचे शीच १६ वाचाळपणा. "