Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/449

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सोळावा. पाचे गर्भवास । म्यांचि सोसिले सावकाश । उणें आपुल्या निजभक्तांस । मी हपीकेश येवों नेदीं ॥ १६ ॥ भक्ताचे पायीची माती । मी हृदयीं वाहे श्रीपती । वानरे वनचरें भावार्थी ।म्यां आपुले पाती वसविली ॥१७॥ यालागी उद्धवा पुढतपुढती । मी सागे करावी माजी भक्ती । माझे भजनी माझी प्राप्ती । अवलीळा पावती मद्भावे॥१८॥ मन्दावे करितां माझी भक्ती । मी अनंत आतुडे त्यांच्या हाती । शेखी कामारा होय भक्काप्रती । भक्तीची प्रीती मज ऐशी ॥ १९ ॥ माझिये भक्तीपरतें । सुगम साधन नाही येथे । हे जाणोनि म्यां तूतें । भजनपंथें लाविले ॥ ३२० ॥ लाविल्या लागे सद्भक्ती । ते ससार वापुढे ते किती । हेळेसून चारी मुक्की । निजसुख भोगिती मद्भक्त ॥ २१॥ मद्भक्तांचे महिमान । अतिशयें अगम्य गहन । ऐसे बोलूनियां श्रीकृष्ण । उडवासी जाण कुरवाळी ॥२२॥ तेणे श्रीकृष्णकराग्रस्पर्श | उद्धवासी झालें कैसे । व्याले धेनूचेनि वोरसे । वत्स जैसें उल्हासे ॥ २३ ॥ जेवीं का लागता चंद्रकर । सवाद्य निवों लागे चकोर । मेघ देखोनि मयूर । नृत्यतत्पर स्वानंदें ॥ २४ ॥ यापरी उद्धव जाण । स्वानः झाला परिपूर्ण । विसरला देव. भक्तपण 1 कपणही कृष्णपण विसरला ॥ २५ ॥ यापरी भक्तिसखाआत । दोघेही ऐक्ये झाले उन्मत्त । परमानंदाचा तेथ । धेंडी नाचत स्वानंदें ॥२६॥ या भक्तिसुखाची गोडी। भाग्येवीण न कळे फुडी । उद्धवभजनाचे कुळवाडी । जोडला 'जोडी श्रीकृष्ण ।। २७ ।। एका जनार्दना शरण । भजनसुखाची ऊणखूण । तो एक जाणे सपूर्ण । भक्तजीवनजिव्हाळा ॥ २८ ॥ जो निजभक्ताचा जिव्हाळा । तो गोकुळी होऊनि गोळा । कीडोनि त्यांचिया खेळामेळा । गोपीगोपाळा उद्धरिले ॥ २९ ॥ स्वये खेळोनि त्याचिया खेळा। उद्धरिले वाळगोपाळा । हे नवल नव्हे त्याची कळा । उदार लीळा ते ऐका ॥३३०॥ पर्वत पापाण तृण तरुचर । भृग मत्स्य मृग मगर । व्याघ्र वनचर विखार । पारावत मयूर आदिकरून ॥ ३१ ॥ येणेसी समवेत । गोकुळीचे जीव समस्त । स्वयं उद्धरी श्रीकृष्णनाथ । कृपालू समर्थ स्वलीला ॥ ३२ ॥ का पितृवचनपुढारों । सीतेचिया वियोगद्वारा। रिसी आणि वानरा । उद्धरी निशाचरा रघुनाथ ॥ ३३ ॥"सेवेने तारिले रीसमानर । युद्ध तारिले निशाचर । है नवल काहीं नव्हे थोर । ऐक उदार लीला स्याची ॥ ३४ ॥ अयोध्येपासून लकेपर्यत । मार्गी वृक्षवेली पापाण पर्वत । तृणादि जीव समस्त । उद्धरी रघुनाथ स्वलीला ॥ ३५ ॥ एवं नानावतारी जनार्दन । यापरी उद्धरी सकळ जन । तेणे एका एक केला पावन । हे नवल कोण मानावे ॥ ३६॥ परी नवल एक केलें मोटे मज मूर्खाचे मुसावाटे । श्रीभागवतबोल केले मन्हाटे । है आश्चर्य वाटे माझेंचि मज ॥ ३७॥ यालागी एका जनार्दना शरण । ज्याची कृपा ऐगी परिपूर्ण । त्याचे स्मरोनि श्रीचरण । केला सपूर्ण सोळावा ॥ ३३८ ॥ ॥ इति श्रीभागरते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्योद्धवसवादे एकाकारटीकाया विभूतियोगो नाम पोडशोऽध्यायः ॥ १६ ॥ ॥ श्रीकृष्णार्प. णमस्तु ।। ॥श्रीविठ्ठलार्पणमस्तु ।। ॥ श्लोकसख्या ॥ ४४ ॥ ॥ ऑव्या ॥ ३३८ ॥ ॥ - १ पतीला २ अनायासें, सहज ३ सापडतो ४ क्मकरी ५अव्हेरून, झिडकारून ६ कृष्णाव्या हखस्सी ७ स्नेहपा खो दलमात नवरेमुलीस कडेवर घेऊन नाचणारा मनुष्य, धेश्यासारखा ९पुरवी १० व्यापारात ११ नफा, फायदा १२ गवळी १३ वृक्ष १४ पारवे १५ निमित्तान १६ अखलास १५थवर्ण १८तरले १९ वृक्ष भाति वेली