पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/450

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. अध्याय सतरावा. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ ॐ नमो श्रीगुरु महामेरु । सूक्ष्मस्वरूपें तूं गिरिवरू । चैतन्यस्वभावे अतियोरू । तूं आधारू सर्वाचा ॥१॥ तुझ्या निजबोधाची शिखरें । वैकुंठकलासादि अतिथोरें । तेथें ब्रह्माविष्णुमहारुद्रे । तुझेनि आधारें नांदिजे ॥२॥ तुझिया आधारस्थिती । नांदती त्रैलोक्ये लोकपंक्ती । सकळ भूताची उत्पत्ति स्थिती । निदान अर्ती तुजमाजी ॥ ३॥ सुरासुर लहानथोर । एक सौम्य एक क्रूर । इयें भूत धरूनी निर्विकार । स्वरूप साचार पै तुझें ॥४॥ तेथ विवेकाचे आगर । सच्चिदानंदाचे रत्नाकर । तेथील लाधल्या कांकर । नीच ते थोर वेव्हारे होती ॥ ५ ॥ ज्याच्या औषधींचा चमत्कार । सेवितां करी अजरामर । जेथ चिंद्गेचे निर्झर । निरतर प्रवाहती ॥६॥जो सुरनरांचा विश्वाम । जो सकळ आश्रमाचा आश्रम । जो क्रियाकर्माचें नैष्कर्म्य । जो निजधाम जीवाचें ॥ ७ ॥ जो भजनाची कुळवाडी । जो भक्तजीवनाची कडी । आवडीची जो निजआवडी । जो गोडियेची गोडी निजात्मता ॥ ८॥ ऐसा सद्गुरु महामेरू । जो कठिणत्वेवीण आधारू । ज्याचेनि अगें संसारू । होय सुखकरू साधका ॥ ९॥ त्या साधकांचे समाधान । शिष्याचा स्वानंदघन । आर्त चातकां निजजीवन । स्वामी जनार्दन तुष्टला ॥१०॥ तयाचा जो चरणप्रसादू । श्रीभागवती एकादशस्कंधू । पूर्वार्धाचा विनोदू। भापाप्रबंधू वाखाणिला ॥ ११॥ तेथे उद्धवें पुशिल्या विभूती । त्या पोडशाध्यायीं श्रीपती। सागीतल्या यथानिगुती । भजनस्थितीलागोनी ॥ १२ ॥ त्या विभूतीमाजी निजवर्म । भक्ताचे में भजनकर्म । ते मी केवळ आत्माराम । ऐसे पुरुपोत्तम बोलिला ॥१३॥ तेथ आशंकेची व्युत्पत्ती । करितां कर्माची कर्मगती । कर्मठ जाहले नेणों किती । तरी कम मुक्ती घडे केवीं ॥ १४ ॥ कम करितां वाकोडें । कौ कर्मठता न चढे । कर्मामाजी मोक्ष आतुडे । हेचि रोकडे पुसों पां ॥ १५॥ स्वयं बोलिला श्रीपती । सात्विकांची जे कर्मस्थिती । तें कर्मचि माझी विभूती । हे सोळाव्याअंती निरूपिले ॥ १६ ॥ स्वयें आचरिता स्वकर्म । तें कर्मचि होय ब्रह्म । हेंचि कर्मक्रियेचे वर्म । देवासी सुगम पुसों पां ॥ १७ ॥ ऐसा पोटींचा आवाका । तेचि पुसावया आशंका । वर्णाश्रमाची स्वधर्मपीठिका । देवासी देखा पुसत ॥ १८॥ उद्धव उवाच-यस्त्वयाऽभिहित पूर्व धर्मस्वद्भक्तिलक्षण । वर्णाश्रमाचारचता सर्वेषा द्विपदामपि ॥ १ ॥ उद्धव ह्मणे गा भक्तपती । ऐकता तुझ्या निजविभूती । मज ऐसे गमले चित्तीं । स्वधमैसी भक्ती घडे कैसी ॥ १९ ॥ तुवां कल्पादि या.कोडें । स्वधर्मक, भक्ति जोडे । हें वर्णाश्रमनिजनिवाडें । निरूपण चोखडें निरूपिले ॥२०॥ सर्वा मानवा परम गती। स्वधर्म घडे भगवद्भक्ती । यानिरूपणाची निगुती । तुवा निश्चिती निरूपिली ॥ २१ ॥ १ मेरुपर्वताचे वर्णन पुराणातून माहे मेरुपर्वताचे भाधाराों खर्ग, मृत्यु माणि पाताल नादतात प्रगण भेल्ला प्रदक्षिणा घालतात, परतु मोठमोठारे हिमाचल, सह्यादि, विध्याद्रि, हे पक्त दिसतात तसा मेरू दिसत नाही याचे कारण श्रीनाथ सागतात की मेरूच खरूप सक्षम आहे • आमज्ञानाची ३ नाश, शेवट ४ शेत ५ रत्नाची जान सी लियामाकर स्यात्' इलमर , ६ सड़े ७ व्यवहारी व्यापारी, ८ जरामरणरहित ९ज्ञानगगेचे क्षरे १. विभातिस्थाा ११ स्वानद वर्षणारा मेघ १२ धीर १३ बाटल