Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/448

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. धाच यच्छ मनो यच्छ प्राणान् यच्छेन्द्रियाणि च । आत्मानमारमना यच्छ न भूय. करपसेऽध्वने ॥ १२ ॥ माझं स्वरूप नित्य निर्विकार । मनबुद्धिवाचा न कळे पार । तेथ वापुडी इंद्रिये किंकर । प्राण निर्धार ते नेणे ॥ ९५ ॥ यालागी शमदमांच्या अनुक्रमी । मनबुद्धिये वाचा नेमी । प्राण नेमूनि प्राणधौं । आत्मारामी पावसी ॥९६॥ मनबुद्ध्यादि इंद्रियनेम । करावयाचें न कळे वर्म । ह्मणसी तरी तो अनुक्रम । ऐक सुगम सागेन ॥ ९७ ॥ वाचा नेमावी माझेनि नामें मन नेमावे ध्यानसनमें । प्राण नेमावा प्राणायामें । इंद्रियें दमें नेमावीं ॥ ९८ ॥ बुद्धि नेमावी आत्मविवेकें । जीव नेमावा परमात्मसुखें । इतकेन तूं आवश्यकें। होसी कौतुके मद्रूप ॥ ९९ ॥ मद्रूप झालियापाठी । मग ससार न पडे दिठी । खुंटल्या जन्ममरणांचिया गोठी । गमनागमन आटाआटी निमाली ॥ ३०० ॥ म्यां सागीतल्या - नेमपरिपार्टी । हा नेम करणे नाहीं ज्याच्या पोटीं । तो भोगी दुःखांचिया कोटी । ऐक ते गोठी सांगेन ॥१॥ यो वे वाङ्मनसी सम्यगसयच्छन् धिया यति । तस्य नत तपो ज्ञान सवत्यामघटाम्बुजत् ॥ १३ ॥ म्यां सांगीतल्या नेमाचे निगुती । मनबुद्धिइंद्रियपंक्ती । जो नेमीना साक्षेपस्थिती । त्याची साधने होती नश्वर ॥२॥ त्याचें व्रत तप दान । योग याग शब्दज्ञान । काचे भांड्यांतील जीवन । तैशी जाण नासती ॥ ३ ॥ जेवी राखेमाजी केला होम । का अशोचे आचरला कर्म । कुपात्री दानधर्म । तैसा सभ्रम साधना ॥४॥ उखरी पेरिलें वीज । का गोळक आवंतिला द्विज । डोहळ्याचे सोहळे भोगी वाझ । तैशी वोज साधनां ॥५॥ यापरी गा निश्चिती । विध्युक्त नेम नाही चित्ती । त्याची साधनें वृथा जाती। हातोहाती उद्धवा ॥ ६॥ यालागीं मनादि इंद्रियवृत्ती । नेमाव्या यथानिगुती । हेंचि उद्धवाप्रती । स्वयें श्रीपति सांगत ॥ ७ ॥ तस्मान्मनो वच प्राणान् नियरछेन्मत्परायण । मभक्तियुक्तया बुद्ध्या तत परिसमाप्यते ॥ १५ ॥ इति श्रीमद्भागवत महापुराणे एकादशस्कन्धे पोडशोऽध्याय ॥ १६ ॥ । । मन बुद्धि इंद्रियें प्राण । अवश्य नेमाची गा जाण । वृत्ति करोनि सावधान । माझें भजन जो करी ॥ ८॥ भावे करितां माझी भक्ती । विषयवासना जळोनि जाती । निर्विकल्प उपजे शाती । माझे भक्तिपंथी चालता ॥ ९॥ चालता माझे भक्तिपंथी । सकळ साधने जळोनि जाती । भावे प्रकटें मी श्रीपती । करी ससारनिवृत्ती निजभक्तां ॥३१॥ हो का माझिया निजभक्तां । संसारबाधेची व्यथा । ते लाज मज भगवता । गांजू निजभका थी नेदी ॥ ११ ॥ प्रल्हाद गांजिता जगजेठी । मी प्रकटला कोरडे कोठी । वैकुंठ साडूनि उठाउठी । गजेंद्रासाठी पावलों ॥ १२ ॥ द्रौपदी गांजिता तत्काळी । म्यां कौरवाची तोंडे केली काळीं । आगीने गांजितां गोवळीं । म्या प्राशिला ते काळी दावाग्नी ॥ १३ ॥ गोकुळ गाजितां सुरपती । म्या गोवर्धन धरिला हाती । की गोपिकाची पुरवाचया आती। मी झालों श्रीपति कामारी ॥ १४ ॥ अर्जुनप्रतिज्ञेचे प्राधी । म्या दिवसा लपविला गर्भस्ती । लापूनि जयद्रथासी ख्याती । सुभद्रापति वांचविला ॥ १५ ॥ अवरी नियमन कर,जिक २ परमात्मचिंतनाने ३ प्रयास ४ माशमत ५कच्या, अर्धवट भाजलेल्या ६शुचिर्भूतपणाधिरहित 'अशीच' ७ पडताळ जमिनीवर ८ भोजनास योलाविला ९ निकरपरहित १. भक्तिमार्गान ११ सर्वांचा मिन असा. १२सात १३ मणल्यान, १४ इद्र, १५ इच्छा. १६ सेवक. १७ सूर्य