Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/446

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत सकाम कामुकी करूनियां भक्ती । जे जे काम यांछिती । ते ते निश्चिती तो पुरवी ॥५४॥ अनिरुद्ध माझा निजसखा । शिवाज्ञा भक्ति केली उखा । वाणासुर तारिला देखा । साह्य चित्ररेखा नारदाज्ञा ॥ ५५ ॥ पूर्णाशें ब्रह्मस्थिती । वासुदेव मी आदिमूर्ती । लीलेनें तारिले नेणो किती । तेथील निजभकी उद्धवार्जुनी नांदे ॥५६॥ नव भक्ति नव मूर्ती । तेथील भक्तीची स्थिती । उद्धवा म्यां तुजप्रती । यथार्थगती सांगीतली ॥ ५७ ॥ विश्वावसु पूर्वचित्तिर्गन्धर्वाप्सरसामहम् । भूधराणामह स्थैर्य गधमानमह भुव ॥३३॥ ___ ज्याचे गायन अतिअपूर्व । जो विश्वावसु गर्व । तो मी ह्मणे माधव । ऐके उद्धव सावध ॥ ५८ ॥ नृत्य करूनि मनोहरा । सबाह्य सद्भावे सुंदरा । पूर्वचित्ती जे अप्सरा । ते मी ह्मणे नोवरा भीमकीचा ॥ ५९ ॥ पर्वतांमाजी जे स्थिरपण । तें मी ह्मणे नारायण । पृथ्वीमाजी जो गंध जाण । तो मी श्रीकृष्ण स्वयें ह्मणे ॥ २६० ॥ ___ अपा रसश्च परमस्तेजिष्टाना विभावसु । प्रभा सूर्येन्दुताराणा शब्दो नभस पर ॥ ३४ ॥ उदकाच्या ठायीं सुरसू । तो मी ह्मणे श्रीनिवासू । तेजिष्ठामाजी जो प्रकाशू । तो मी निजतेजाशू उद्धवा ॥ ६१ ॥ चंद्रसूर्यतारांच्या ठायीं । जें तेज तें माझें पाहीं । अनाहत शब्द तो मीही । जो गगनासी कहीं नातळे ॥ ६२॥ ब्रह्मण्याना पलिरह वीराणामस्मर्जुन । भूतानां स्थितिरस्पत्तिरह वे प्रतिसक्रम ॥ ३५ ॥ ब्राह्मणभजनी बळीची थोरी । तो मी कृष्ण मणे निर्धारीं । ब्राह्मणभजन प्रेमें करी। मी पळीच्या द्वारी द्वारपालू॥६३ ॥ नरावतारें अतिसपन्न । पांडवांमाजी वीर अर्जुन । तो मी ह्मणे नारायण । जीवप्राण तो माझा ॥ ६४ ॥ भूताची उत्पत्ति स्थिती ते मी हाणे श्रीपती । भूतासी जे प्रळयगती । तेही मी निश्चिती उद्धवा ॥ ६५ ॥ गत्युक्त्युत्सर्गापादानमानन्दस्पर्शलक्षणम् । आस्वादश्रुत्यवघ्राणमह सर्वेन्द्रियेन्द्रियम् ॥ ३६॥ ज्ञान कर्म उभय इंद्रियें । त्या इंद्रियाचे मी इंद्रिय पाहें । त्याची क्रिया जे जे आहे । ते माझेनि होये अभिव्यक्त ॥ ६६ ॥ गति ग्रहण गमन । उत्सर्ग आणि मोहन । दर्शन स्पर्शन घ्राण । श्रवण स्वादन माझेनी ॥६७॥तें इंद्रियक्रियेचे चलन । तिळभरी नव्हे मजविण । ऐक त्याचेही लक्षण । तुज मी सपूर्ण सांगेन ॥ ६८ ॥ मी मनाचेंही महामन । नयनाचेही नयन । स्पर्शाचेही स्पर्शन । जिव्हेची जाण निजजिव्हा ॥ ६९ ॥ मी प्राणाचेही निजघ्राण । श्रवणाचे आदिश्रवण । ग्रहणाचे निजग्रहण । गतीची जाण मी गती ॥ २७० ॥ मी आनंदाचा आनंदू । मी वुद्धीचाही प्रबोधू। सकळ इंद्रियाचा स्वादू । तो मी मुकुंदू उड़वा ॥ ७१ ॥ मी वाचेची वाचा सावकाश । मी परेचाही परेश । सकळ इंद्रियाचा मी ईश । यालागी हपीकेश नाव माझें ॥७२॥ पृथियी वायुराकाश आपो ज्योतिरह महान् । विकार पुरपोऽव्यक्त रज सत्व तभ परम् ॥ ३७ ।। । तस्वसख्या पचवीस । त्रिगुण घालिता अठ्ठावीस । ऐक त्याचाही विलास । सावकाश सांगेन ॥ ७३ ॥ अहं महत्तत्व पंचतन्मात्रा । हा स्थूळे प्रकृतीचा उभारा । महाभूतद्रिय १ सक्मिणीपति श्रीकृष्ण २ उत्तमरस ३ तेजखी प्राण्यामध्ये तेजस ५ आकाशाला अगोचर असा ध्वनि ६ प्रताप ७भाशस्थिति ८ प्रकट ९ हे सर्व इद्रियव्यापार मी. ९ लक्षण १० प्रकाशक ११ परावाणीचा प्रेरक १. विस्तार १३ प्रथिवी (गध), उदक( रस ),तेज(रूप). वाय ( स्पर्श) व आश (शब्द), वा पचतन्माना, राहावा सहकार, व सातवें महत्तव, मिलन स्थल प्रवृति होते १४ पचमहाभूत व एकाददा इंद्रिय मिळून सोग प्रकारची कार्य होतात