Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/442

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। एफनाथी भागवत. इन्द्रोऽह सर्वदेवाना वसूनामस्मि हव्यवाट् । भादित्यानामा विष्णू रुद्राणा नीललोहित ॥ १३ ॥ देवांमाजी मी इंद्र जाण । वसूंमाजी मी हुतांशन । आदित्यांमाजी मी वामन । रुद्रांमाजी जाण नीललोहितू ॥ ७७ ॥ ब्रह्मांणा भृगुरह राजपणामह मनु । देवर्षीणा नारदोऽह हविर्धान्यसि धेनुषु ॥ १४॥ - शापूनि ब्रह्मा अपूज्य केला । शिवाचा नैवेद्य त्यागविला । विष्णू हृदयीं लाता हाणिला । भृगु वाखाणिला श्रीवत्से ॥ ७८ ॥ ब्रह्मऋषीमाजी संपन्न । भृगु तो भी ह्मणे श्रीकृष्ण । मनुस्वरूप भी आपण । राजर्षि जाण मुख्यत्वे ॥ ७९ ॥ देवमाजी मुनि • नारद । तोही मी ह्मणे गोविद । कामधेनु अतिशुद्ध । स्वरूप प्रसिद्ध ते माझें ॥ १८० ॥ ___मिद्धेश्वराणा कपिल सुपर्णो पतत्रिणाम् । प्रजापतीना दक्षो पितृणामहमर्थमा ॥ १५॥ सिद्धांमाजी कपिल मुनीश्वर । तो मी ह्मणे सारगधर । पक्ष्यांमाजी खगेश्वर । तो मी श्रीधर गरुडरूपें ॥८१ ॥ प्रजापतीमाजी मुख्य । कृष्ण ह्मणे तो मी दक्ष । पितृगणामाजी अध्यक्ष । अर्यमा प्रत्यक्ष स्वरूप माझें ॥ ८२॥ ___ मा नियुद्धव दैत्यानां प्रन्हादमसुरेश्वरम् । सोम नक्षनौपपीना धनेश यक्षरक्षसाम् ॥ १६ ॥ भक्तिप्रतापें अतिअगाध । तो दैत्यांमाजी मी प्रह्लाद । नक्षेत्र औपधींचा जो स्वामी चंद्र। •ते ह्मणे गोविंद स्वरूप माझें ॥ ८३ ॥ यक्षराक्षसांमाजी थोर । माझे स्वरूप तो कुवेर । ज्याचे विश्वास निरतर । असे भाडार हरीचे ॥ ८४ ॥ ऐरावत गजेन्द्राणा यादसा धरण प्रभुम् । तपता घुमता सूय मनुष्याणा च भूपतिम् ॥ १७ ॥ ऐरावत जो गजेंद्र । तो मी ह्मणे यादवेंद्र । वरुण जो जळचरेंद्र । तें ह्मणे उपेंद्र स्वरूप माझें ॥ ८५ ॥ स्वप्रभा प्रकाशनिष्ठ । जग प्रकाशनि उझट । तो सूर्व मी ह्मणे वैकुंठ । अतितिखट निजतेजें ॥८६॥ मनुष्यांमाजी जो भोगी क्षिती । सार्वभौम ज्याच्या हातीं। ज्यातें बोलती भूपती । त माझी विभूती हरि ह्मणे ॥ ८७ ॥ उच्च वास्तुरहाणा धातूनामरिस काञ्चनम् । यम सयमता चाह सर्पाणामस्मि वासुकि ॥१८॥ पागेन्द्राणामनन्तोऽह मृगेन्द्र निष्ट्रिणाम् । आश्रमाणामह तुर्यो वर्णाना प्रथमोऽनघ ॥ १९॥ उच्चैःश्रया तुरंगजाती । तो मी ह्मणे कमळापती । सुवर्ण धातु माझी विभूती । जीलागी लुलाती तिनी लोक ॥ ८८ ॥ दंडधरित्यांमाजी गहन । यमधर्म मी आपण । सामाजी जाण । मी नारायण वासुकी ।। ८९ ॥ अनंत या नामातें जो धरी । तो नाग मी हाणे श्रीहरी । नखदंष्ट्राभंगधारी । त्यामाजी केसरी ह्मणे देवो ॥ १९० ।। चतुर्थाश्चम सन्यास जाण । तो मी ह्मणे नारायण । वर्णाग्रज जे ब्राह्मण । ते मी ब्रह्म जाण बोलतें ॥ ९१ ॥ ___ तीर्थाना स्रोतमा गङ्गा समुद्र सरसामहम् । आयुधाना धनुरह त्रिपुरमो धनुष्मताम् ॥ २० ॥ तीर्थसरितामाजी गार्ग । तें मी हाणे श्रीरग । तडागी श्रेष्ठ तडाग । समुद्र साङ्ग मी ह्मणे हरी ॥ ९२ ॥ आयुधी धनुष्य हतियेर । ते मी ह्मणे सारगधर । त्रिपुरारि मी धनुर्धर । जेणे केला सहार त्रिपुरांचा ।। ९३ ॥ १ अमि • शकर ३ पूज्य मानिला ४ प्रमुरा ५ नक्षनाचा आणि औषधींचा सत्ताधारी ६ जलात राहणान्याचा नायर प्रसर ८ पृथ्वी ९ सर्व भूमी १० घोड्यामध्ये ११ सोन १२ धडपड करितात, लाळ घोटतात १९ शास्त्यामन्य १४ नव, दात, शिंगे धारण करणारे हिल पश, १५षणश्रेष्ठ, १६ गगोदक. १७ हत्यार. १८ श्रीशकर