Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/440

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४३० एकनाथी भागवत. प्रकृतीचे माथी ठेवूनी । तूं कायावाचामनीहूनी । मजलागुनी शरण रिघे ॥ ३४ ॥ यापरी गा तत्त्वतां । सद्भावे शरण येतां । तुज सकळ कर्माची वार्ता । मी सर्वथा शिवों नेदी ॥ ३५ ॥ यालागी गा कोदंडपाणी । मरतें मारितें सांडूनि दोन्ही । सौरी होयी रणांगणीं । मी तुजलागोनि उद्धरीन ॥ ३६ ॥ तूं एक येथे कर्म करिता । मी एक तूतें उद्धरिता । ऐसे भिन्नत्व गा पार्था । माझ्या शरणागता असेना ॥ ३७॥ मज अनंता शरण येणे । आणि जीवत्वे वेगळे उरणे । ते गुळदगडाऐसे र्जिणे । अनन्यपणे नव्हे कारण ॥ ३८ ॥ सरिता सागरा गरण गेली । ते समुद्रचि होऊनि ठेली । पुढती परतावया मुकली । समरसिली सिंधुत्वे ॥ ३९ ॥ गंगा पावोनि सिंधुत्वासी । मागील यावा बंचीना तिसी । तेवीं सवाह्य आत्मसमरसी । शरण अहर्निशी अखंडत्वे ॥ १४० ॥ दीप दावानी भेटों गेला । तो तेव्हडाचि होऊनि ठेला । तेवी मजलागी जो शरण आला । तो मीचि झाला अर्जुना ॥४१॥ पार्था परिस पा चिह्न प्राप्ताचे । हे भूताकार मज अच्युताचें। ऐसे सद्भावे जो देखे साचे। त्यासी ब्रह्मसायुज्याचे साम्राज्य लाभे ॥ ४२ ॥ मज आत्मयाचे निजस्थितीं । संसार मुळी मुख्य भ्रांती । तेथ मारिता मी हे मरती । कोणे हे युक्ती मानावी ॥४३॥ मृगजळ जेथे नसे । तेये तंव कोरडेंचि असे । माझ ठायीं आभासे । तेथ तन्ही असे वोल्हासु कांहीं ॥ ४४ ॥ तेवीं ससाराचे रूप नाम । ठेविता तेथे निखळ ब्रह्म । हाचि ज्याचा स्वभाव परम । ते चालतें ब्रह्म वर्ततां देही ॥ ४५ ॥ देहा जडत्वे न वधी कर्म । आत्मा नातळे धर्माधर्म । हे ज्यासी कळले वर्म । तें चालतें ब्रह्म वर्तता देही ॥४६॥ देहीं वर्ततां तो विदेह । विदेह तेच त्याचे देह । हे माझें परम गुह्य । अर्जुनासी पाहे सांगितले ॥ ४७ ॥ यापरी म्यां नानायुक्ती । युद्धी बोधिला सुभद्रौपती । तेणेही मज करोनि विनंती । प्रशिल्या विभूती तुझ्याऐशा ॥४८॥ ज्या सांगीतल्या अर्जुनासी। त्याचि मी सागेन तुजपाशी । ऐसें पुरस्करूँनि उद्धवासी । निजविभूति त्यासी सागत ॥४९॥ उद्धवा ज्या पुशिल्या विभूती । त्या माझ्या मज न गणवती । मी जगदात्मा निजगती । सख्यासस्थिती गणी कोण ॥ १५ ॥ बहमास्मोन्द्रवामीपा भूताना मुहदीश्वर । अह सर्वाणि भूतानि तेषा म्पित्युभवात्यय ॥९॥ मी हृदयस्थ समर्थ हृदयीं । त्या मज जीयू मागे जे काही । त्यासी विमुख मी नव्हे "कहीं । पुरवी सर्वही ईश्वरत्वे ॥५१॥ जीवू अतिअलेपणे । जे मागे मजकारणे । तें मी त्यासी अलोट देणे । यालागी हाणणें ईश्वर मज ॥ ५२ ॥ मी आत्मा असे हृदयी । हा विश्वास जयासी नाही । ते मृगजळाचे डोही । नावेसकट पाहीं वुडबुडों गेले ॥ ५३ ॥ तेथ नाव करावयाचे कष्ट । वृथा गेले फुकट । तेवीं साधने सोसूनि कचैट । साधनेसकट बुडी गेले ॥ ५४ ॥ माझे प्राप्तीचे मुख्य धर्म । मी हदयीं असे परब्रह्म । हेंचि ज्याचे नित्य १ प्रतीकदे कर्माकर्माच्या पापपुण्याची विरहे लावून २ पापाची. ३ धनुष्पाणि अजुना ! ४ शूर ५ गुळातला दगड गुना कनीय होऊन जात नाही तसे ६ जाणे ७ नदी ८ एकपटली ९ पहिला ओघ तिला मागे खेचीत नाही १. निद-मुक-झाल्याचं रक्षण ऐक ११ मध्ये जेथे विलसे । तेथें कहीं न असे जळलेशु १२ चेतना १२उद १४ दहजर अमल्यामुळे त्याला पर्म बाधन नाही, च आरमा धर्माधर्मातीत आहे १५अर्जुन १६ धीर, आश्वा सादा १७ कधी 10 समारोत, संकटात सापडल्लामा १९ अमर्याद २० आत्माराम २१ अवघड २० सूग