पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/438

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२८ एकनाथी भागवत. येपु येषु च भाषेपु भक्त्या त्या परमर्पय । उपामीना प्रपद्यन्ते संसिद्धिं तद्वदम्य मे ॥३॥ __ ज्या ज्या तुझ्या विभूती । पूर्वी उपासिल्या सती । दृढभावे करोनियां भक्ती । तुझी स्वरूपप्राप्ती पावले ।। ९१॥ त्या सकळ तुझ्या विभूती । कवण स्थिती करण व्यक्ती। कवण भाव कवण गती । हे निश्चितीं मज सांगा ।। ९२ ।। ह्मणसी सकळ भूतांप्रती । तूंचि वोळख माझ्या विभूती । तरी ते तुझी अतक्य स्थिती । न कळे श्रीपती आमुचेनी ॥९३ ॥ गृहश्चरमि भूतात्मा भूताना भूतभावन । म स्या पश्यन्ति भूतानि पश्य त मोहितानि ते॥४॥ सर्व भूतांचा हृदयस्थ । हृदयी असोनि गुप्त । त्या तूतें भूतें समस्त । न देखत देहधमें ॥९४ ॥ त्या देहभ्रमासी देवराया। मूळकारण तुझी माया । तेथे तुझी कृपा झालिया। माया जाय विलया गुणेसी ॥ ९५ ॥ मग सर्वत्र सर्वा ठायीं । सर्व भूती सवाह्य देही । तुझे स्वरूप ठायी ठायीं । प्रकटे पाहीं सदोदित ॥९६ ॥ एवढे तुझे कृपेचे करणे । ते कृपा लाहिजे कवणे गुणे । यालागी तुझ्या विभूति उँपासणे । तुझे कृपेकारणे गोविदा ॥९७॥ याचिलागी विभूतांची स्थिती । समूळ सांगावी मजप्रती । तेचि अर्थीची विनंती । पुढतपुढती करीतसे ।। ९८ ॥ या काश्च भूमौ दिवि वै रमाया विभूतयो दिक्षु महाविभूते। ता मामारयाझनभारितास्ते नमामि ते तीर्थपदापिनम् ॥५॥ स्वर्गमृत्युपाताळस्थिती । विस्तारल्या दशदिशांप्रती । त्या समस्तही तुझ्या विभूती । सांग श्रीपती मजलागीं ॥ ९९ ॥ ऐसा करोनिया प्रश्न । उद्धवे घातले लोटागण । सकळ तीर्याचे जन्मस्थान । मस्तकी श्रीचरण वंदिले ॥ १०० ॥ ऐकोनि उद्धवाच्या प्रश्नासी । परम सतोपे हपीकेशी । पुरस्करोनि उद्धवासी । काय त्यासी बोलिला ॥१॥ जो वैरिगैजयूथपंचानन । कोदंडदीक्षाप्रतापगहन । सखा जिवलग पेढियंता जाण । जीवमाण जो माझा ॥२॥ ज्याचे रथीचे मी धुरेवरी । ज्याच्या अश्वाचे वाग्दोरे धरी । जो उपदेशिला कुरुक्षेत्रीं । उभय सेनेमाझारी रणरगीं ॥ ३॥ तो नरावतार अर्जुन । त्याच्याऐसा हा तुझा प्रश्न । ऐसे उद्धवासी सतोपोन । काय श्रीकृष्ण बोलिला ॥४॥ __ श्रीमगवानुवाच-एवमेतदह पृष्ट प्रश्न प्रश्नविदा वर । युयुरसुना निसने सपनरर्जुनेन वै ॥ ६ ॥ हाचि प्रश्न मजकारणे । पूर्वी पुशिला अर्जुने । जेव्हां तिरस्कारूनि दुर्योधने । युद्ध सैनाणे माडिले ॥५॥ अरिनिर्दळणी प्रतापपूर्ण । धीर वीर आणि सज्ञान । प्रश्नकामाजी विचक्षण । माझा आत्मा जाण अर्जुन ॥ ६ ॥ तेणे अर्जुने कुरुक्षेत्री । युद्धसमयीं महामारी । स्वजनवधाचे भय भारी । हाचि प्रश्न करी मज तेव्हा ॥७॥ ज्ञात्वा जानियध गर्यमधर्म राज्यहेतुकम् । ततो निवृत्तो हन्ताह हतोयमिति रोक्कि ॥ ७ ॥ स तदा पुराव्याम्रो युक्त्या में प्रतियोधित । अध्यभापत मामेन यवा व रणमूर्धनि ॥ ८॥ केवळ राज्यलोभाकारणे । गुरु गोत्र पितृव्य पधणे । हे अतिनिद्य मजकारण । नाहीं झुंझणे प्राणांतीं ॥८॥ लौकिक धर्मप्रवृत्ती । मी मारिता हे मरती । हे महामोहाची नाती। भापपरम्वरूपं . आझासी ३ प्राप्त करावी ४ आगधन करणे ५ प्रभुचरण मर्य वीर्याच तीथा आहेत. ६ उन ७ पातुरूप हत्तींचा नरेन नाश करणारा गिह ८ गाही धनुष्य धरणारा ९ आयइना १० लगाम मियाम्न १२ धोर, घनघोर १३ चतुर, पहित १४ प्राण घेणा-या १५ मेला तरी +