________________
४१२ एकनाथी भागवत. नारदाचे उदारपण । येणेंचि जाण वाखाणे ॥६॥ वज्रकवच पन्हादासी । हेचि भांडवलगांठी त्यासी । शुकादि वामदेवासी । महिमा येणेसी पावले ते ॥ ७ ॥ व्यासवाल्मीकि महावेन्हारे । येणेचि भांडवले झाले सरे । त्यांचेनि भांडवले लहान थोरें । छेदूनि दरिद्रे नांदती ।। ८ ।। त्या सद्गुरूचे श्रीचरण । परम निधींचे निधान । एका जनार्दना शरण । हे आह्मां परिपूर्ण भांडवल ।।९॥ येणेंचि भांडवले प्रस्तुत । प्राप्त झाले श्रीभागवत । तेथ उद्धवासी श्रीअनंत । ज्ञानमथितार्थ सांगत ॥ १० ॥ त्या दोघांची एकांत मातू । प्रकट जाहली जगाआंतू । हा परीक्षितीचा विख्यातू । उपकार लोकांतू थोर झाला ॥ ११ ॥ ज्याचे श्रद्धेच्या आवडी । शुक पावला लवडसवडी । तेणे गुंह्य ज्ञानाची गोडी । प्रकट उघडी दाखविली ॥ १२ ॥ त्या शुकाचे नवल महिमान । कानी न सांगतां गुह्य ज्ञान । श्रवणे तोडोनि भवबंधन । परीक्षिती जाण उद्धरिला ॥१३॥ एथवरी श्रवणाची गोडी । प्रसिद्ध, दाविली उघडी । तरी अभाग्यु दांतखिळी पाडी । कानाची निमटेली नुघडी मिठी ॥१४॥ श्रवणी घालिता वाकोडें । कथासारामृत बाहेरी साडे । श्रवणाआतीता थेवही न पडे । यालागी रडे विपयांसी ॥१५॥ असो हे श्रोत्याची कथा । कथा सांगे जो वक्ता। तोही तैसाचि रिता । घो? आंतोता पायों नेदी ॥ १६ ॥ जैसा गुळउसाचा घाणा । रसु बाहेरी जाये मांदणी । फिकेपणे करकरी" गहना । ते गती वदना वक्तयाचे ॥ १७ ॥ में कथामृताचें गोडपण । तें सद्गुरूवीण चाखवी कोण । यालागी जनार्दना शरण । जेणे गोडपण चाखविले ॥ १८ ॥ परी चाखविली ऊणखूण । तेही अभिनव आहे जाण । स्वाद स्वादिता आपण । होऊनि गोडपण चाखवी ॥ १९ ॥ चाळकाहाती दिधल्या फळा । खावे हे न कळे त्या अवळा । त्याचे मुखी घालूनि गोळा । गोडीचा जिहाळा जनक दावी ॥२०॥ गोडी लागल्या वाळकासी । तेंचि फळ खाय अहर्निशीं । तेवीं जनार्दनें आझासी। गोडी श्रीभागवतासी लाविली ॥ २१ ॥ ऐसी लाविली गोडी चढोवडी । तेणे झाली नवलपरवडी । मज साडिताही ते गोडी । गोडी न सोडी मजलागीं ॥ २२ ॥ ते गोडीने गिळिले मातें । मीपण गेलें गोडीआतौते । ते गोडीचे उथळले भरितें । सबाह्य रिते उरो नेदी ॥ २३ ॥ हैं शुकमुखींचें श्रेष्ठ फळ । गोडीपणे अतिरसाळ । त्वी आंठोळीवीण केवळ । गोडीच सकळ फळरूपें ॥२४॥ ते श्रीभागवतींची गोडी । श्रीकृष्णे निजआवडीं। उद्धवासी कैडोविकडी । भक्ती चोखंडी चाखविली ॥ २५ ॥ करिता माझें भजन । धरिता माझे मूर्तीचें ध्यान । समाधिपर्यंत साधन । उद्धवासी सपूर्ण सागीतले ॥२६॥ ते कृष्णमुखींची मातू । ऐकोनि चौदाव्या अध्यायांतू । उद्धव हरिखेला अद्भुतू । माझा निजस्वा) फावली ॥२७॥ मज कृष्णमूर्तीचें ध्यान । सहजे सदा असे जाण । तेणेच होय समाधि समाधान । तरी का प्रश्न करू आता ॥ २८ ॥ ऐकोनि चौदावा अध्यावा । झाला उद्ध १ सद्गुरुचरणच पन्हादाच्या शरीराचे रक्षण करणारे घनकाय २ मोठे सावकार ३ व्यासवात्मीकाचे भादवलावर लहानथोरानी दारिद्य घालवून ते सपन झाले ४ सद्गुरूशी शरणागती हेच आमचे भांडवल ५ रहस्य, गूढार्थ ६ घाईपाईने, तत्काल ७ गुप्त ज्ञान-आकलन करण्यास अशक्य असें ज्ञान कानी सागता ९ महन घेतलेली १. कानाच्या भात, श्रोत्याआतौता ११ बिंदु १२ उसाचा रस जीत गळतो ती नाद १३ नीरसपणाने १४ मारकर परतो १५ मधुर रसाची धार, १६ आश्चर्यकारक प्रकार १७ अतिशय आले ९८ सालकोईवाचून १९ सांगोपाग २० उत्स्ट २१ समाधान १२ आनदला २३ साघठा २४ होय समाधान