Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/420

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- _ ---


-

--- - - - - एकनाथी भागवते. सोपचित्त ठेवावें ॥ ५१० ॥ तेव्हां चिदाकाश चित्त चिंतन । हेही सांडूनि विविध भेदध्यान । जो मी परमानंद परिपूर्ण । भेदशून्य चिदात्मा ॥ ११॥ तेथे वृत्ति करूनि निमग्न । साडावे चिदाकाशाचेही ज्ञान । तेव्हा ज्ञेय ज्ञाता ज्ञान । हेही स्फुरण स्फुरेना ॥१२॥ एवं ममाहितमतिर्मामेबारमानमात्मनि । विचष्टे मयि सारमन् ज्योतिलिपि सयुतम् ॥ ४५ ॥ यापरी साधकांची निजवृत्ती । माझ्या स्वरूपी मीनल्या स्वरूपस्थिती । तेव्हा मीपणाची स्फुरे जे स्फूर्ती । तेही अद्वैती विराली ॥१३॥ तेथें मीतूपणाचा भास । यापरी निमाला निःशेष । माझें परमानद निजसुख । अद्वैत देख कोंदले ॥१४॥जेवी ज्योतीसी मीनल्या ज्योती। दोहींची होय एकचि दीप्ती । तेवी जीवचैतन्यांची स्फूर्ती । अद्वैतसुखप्राप्ती समरसे ॥ १५ ॥ कोटि स्नेहसूत्रे मांडिती । तेणे कोटि दीप नामाभिव्यक्ती । ते कोटि दीपों एक दीप्ती । तेवी जीव अद्वैती चिन्मात्र ॥ १६ ॥ देहेंद्रिय उपाधिवशे । जीवासी भिन्नत्व आभासे । अद्वैतबोध समरसे । जीबू प्रवेशे स्वरूपीं ॥ १७ ॥ तेव्हा एक परमसुख । हेही ह्मणतें नाहीं देख । एकाकी एकले एक । सुर्खसी निजसुस कोंदले ॥ १८ ॥ जेवीं साखरे साखर चाखित । की उदकी उदक स्नान करित । हो कां घृत जाहले घृताआंत । सुनिश्चित सुवासा ॥१९॥ यापरी माझी ध्यानस्थिती । साधका जाहली परमप्राप्ती। तेचि उपसहारे श्रीपती । उद्धवाप्रती सांगत ।। ५२० ॥ ध्यानेनेत्य सुनीग्रेग युजतो योगिनो मन । सयास्यत्याशु निर्वाण द्रव्यज्ञानक्रियानम ॥ ४६ ॥ . इति श्रीभागवते महापुराणे एकादशरकन्धे भगवदुद्धवसवादे चतुर्दशोऽध्याय ॥ १४ ॥ यापरी तीन ध्यानस्थिती । समाधिपर्यंत माझी प्राप्ती । साधकासी होय शीघ्रगती। यथानिगुती ध्यान करितामा २१॥ हैं माझें ध्यान उत्तमोत्तम । सर्वदा ठसावले जै निःसीम । तें अधिभूत अधिदैव अध्यात्म हा त्रिविधं भ्रम उरों नेदी ॥ २२ ॥ विषयीं विषयो विपयसचम । ज्ञेय ज्ञाता ज्ञानोपक्रम । कर्म कर्ता क्रियाश्रम । यांचे रूपनाम उरों नेदी ॥ २३ ॥ तेय ध्येय ध्याता ध्यान । दृश्य द्रष्टा आणि दर्शन । मन मंता आणि मनन । यांचे समूळ भान उच्छेदी ।। २४ ॥ देवो देवी देवता । भज्य भजन भजता । लक्ष्य लक्षण लक्षिता । हेही कथा नुरेचि ॥ २५ ॥ तेथ योग्यतेसी महायोगू । समाधिसुखाचा सुखभोगू । जीवशिवाचा निजसयोग । हाही उपयोगू उडाला ॥ २६ ॥ तेथे बोध केंचा कैची बोधकता । कैची बद्धता आणि मुक्तता । ब्रह्मनाम हेही वार्ता । जाण सर्वथा बुडाली ।। २७ ।। सत् चित् आणि आनद । या नावाचा जो प्रवाद । तो मज मायावी सबंध । ऐक सोही विशद विभाग ॥ २८ ॥ असताचे व्यावृत्तीं । 'सत' माते मणती श्रुती । करिता जडाची समाप्ती । 'चिन्मात्र' हाणती मजलागीं ॥ २९ ॥ तोडिता दुःखाचा सवधू । मातें झणती 'परमानंदू एवं सच्चिदानंदप्रवादू । हा विपरीत वोधू विद्येचा,॥५३०॥ जेथ असतचि नाहीं । तेथ सत झणणे घडे कायी । समूळ अज्ञानचि जेव्हां नाही तेव्हा चिन्मात्र हेही हाणे कोण ॥ ३१ ॥ जेव्हा दुःखाचा लेश नाही । तेव्हा सुख ह्मणावें कोणे ठायीं । । १ फार शावधगिरीने २ देह व इद्रिये याच्या उपाधीमुळे जीव वेगळा मामतो, परंतु अखट एकाकारता झाला की विध प्रहा आहे जीप हा समल्पामुळे जीवपणात असतो, सकल्पलोप होतांच तो महाच आहे ३ शेवटी ४ त्वरित ५ मागितल्याप्रमाणे द्रव्य, ज्ञान व किया, (दृश्य, द्रष्टा, दर्शन,) असा विविध ७ मननकर्ता ८ योटा ९ मिथ्या भी माया सी उडवल्यामुळे मला सत (सत्यम्यरूप ) हाणतात १० सन्मान