________________
एकनाथी भागवत. सुखरूप ॥२०० ॥ देशे काळे वेदानुवादा । ज्या सुखाची न करवे मर्यादा । त्या सुखाची सुखसपदा । मद्भक्त सदा भोगिती ॥१॥ ज्या सुखाचे सुखप्राप्ती । विरोनि जाय चित्तवृत्ती । सुखें सुखरूप सर्वांगें होती । एवढी सुखप्राप्ती मद्भक्तां ॥२॥ इतर मी सांगों कायी । मोक्षसुखाच्याही ठायीं । या सुखाची गोडी नाहीं । धन्य पाही हरिभक्ती ॥३॥ ऐशिया सुखाकारणे । साधक शिणती जीवेमाणे । तपादि शरीरशोपणे । नत धरणे विपयांचे ॥४॥ एक करिती योगयाग । एक करिती शास्त्रसग । एक करिती सर्वस्वत्याग । एकी सांडिला सग गृहदारा ॥ ५ ॥ एक फळाहारी निराहारी । एक ते नग्न ब्रह्मचारी । एक कडेकपाटी शिखरी । गिरिकंदरौं रिघाले ॥ ६॥ एक ते जटाळ गाँठ्याळ । एक नखधारी ढिसाळ । एक महाहटी विशाळ । एक पिसाळ मत्तमुद्रा ॥७॥ एक तांबडे वोडके । एक ते केवळ सुडके । एक तीर्थाटणे रोड के । एक ते मुके मौननिष्ठ ॥ ८॥ एक रोख्ये एक शंख्ये। एक ते अत्यंत बोलके । एक पाणीपिशी झाली उदकें । कुशमृत्तिके विगुंतली ॥९॥ ऐशा नाना परींच्या व्युत्पत्ती । साधक शिणती नेणो किती । माझ्या भजनसुखाची प्राप्ती । नव्हे निश्चिती कोणासी ॥ २१ ॥ जे माझ्या भक्तांचे निजसुख । तें कोणासी न पवेचि देख । स्वमीही त्या सुखाचे मुंख । अनोळख पै झाले ॥ ११ ॥ चंद्रकिरणींचे अमृत । जेवीं वायसा अप्राप्त । तेवी माझें निजसुख निश्चित । नव्हेचि, प्राध अभक्तां ॥ १२ ॥ थानी लागल्या गोचिडा । अशुद्धचि आवडे मूढा । जवळिल्या क्षीरा वरपडा । नव्हेचि रोकडा अभाग्य ॥ १३ ॥ तेवीं साडोनि माझी भक्ती । नाना साधनी व्यर्थ शिणती । त्यांसी माझ्या निजसुखाची सुखप्राप्ती । नव्हे निश्चिती उद्धवा ॥ १४ ॥ जिहीं माझ्या भजनपरवडी । केली भक्तीची कुळचाडी । ते माझ्या निजसुखाची गोडी। पावले रोकडी आत्यंतिक ॥१५॥ ज्या निजसुखाच्या ठायीं। शिळेपणाची भापाचि नाहीं । विटों नेणे कल्पांतीही । इंद्रियांचा कांहीं न पडे पोंगू ॥१६॥ जे जे विषयाचें सुख । तें तें इंद्रियांपंगिस्तै देख । अपंगिस्त भक्तिसुख चोख । सभाग्य लोक पावती ॥ १७ ॥ जे सुख भोगिता पाहीं । देही तोचि होय विदेही ।तें सुख माझ्या भक्तांच्या ठायीं । प्रकटले कांहीं लोपेना ॥ १८ ॥ हे उत्तमोत्तम भक्त पाहीं । सुख पावले नवल कायी । परी केवळ जे विषयी। भजने त्याही सुखप्राप्ती ॥ १९ ॥ भाग्यवशे सत्सगती। आस्तिक्यभावें अनन्यस्थिती । अल्पही माझी घडल्या भक्ती । विपयनिवृत्ती तेणे होय ॥ २२० ॥ याध्यमानोऽपि मद्भक्तो विषयैरजितेन्द्रिय । प्राय प्रगल्भया भक्त्या विषयैर्नामिभूयते ॥ १८ ॥ माझ्या ठायीं अनन्य प्रीती । प्रेमयुक्त भजनस्थिती । ऐशिया भक्तां विषय बाधिती । हे व्याख्यानस्थिती केवी घडे ॥ २१॥ आवडी करितां माझी भक्ती । विषयवासना जळून जाती । तेथ उपजे विषयासक्ती । हे कोणे युक्ती मानावी ॥२२॥ आरिसा जैटिता उजिळे । १श्रुतीलाही २ हरिभक्त ३ केश पावतात ४ देहास ताप देणे. ५ शास्त्राभ्याय ६ जदा धारण करणार ५ ज्याच्या जसाच्या वडाच्या पारल्याप्रमाणे गाठी झाल्या आहेत असे ८ मोठमोठी नसें असणारे १ हठयोगी १० उन्मत्त व पेचाचवृत्ती (वेल्यासारखे पागणारे ११ चिंध्या नेसणारे, नमनाय १२ अगाला राख फासणारे १३ शस पाजवात हजार १४ मुखाचे तोंड, लवमान १५ र १६ लुब्ध, गुतलेला, वळलेला १७ लागवड १८ गोट, बोली १९ गुना, सफ्ट २०६दियापीन २१ भफिमुख खयभू आहे, इद्रियांदिकावर अवलबून नाही २२कयाप्रकार,गोट २३ पासला असता.