पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/406

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. ॥५४॥ आगमनिगी प्रतिपाद्य । माझी चतुर्भुजमूर्ति शुद्ध । ते निजहृदयीं मी परमानंद । भक्तनिजपद वाहतसे ॥ ५५ ॥ मज निजदेहाची नाही गोडी । गोवळ झालो अतिआवडी । गायी राखें अरंडीदरडी । की थापटी घोडी भक्काची ।। ५६॥ मी अवाप्तसकळकाम । परी प्रेमळांलागी सदा सकाम । देखतां प्रेमळांचा भाव परम । मी आत्माराम उडी घाली ॥५७॥ प्रेमळ देखतांचि दिठी । मी घे आपुलिये सर्वसाटीं । नव्हतां वरि बर्दै सुखकोटी । नये तरी उठाउठी सेवक होय ॥ ५८॥ सांडूनि महत्त्वपरवडी । मी निजभक्ताची उच्छिष्टं काढी । भक्तकाजाचे सकिडी । करी कुरवंडी देहाची ॥ ५९ ॥ उपेक्षुनि निजदेहासी । उद्धवा तुजसारिखिया भक्तांसी । मज आवडती ते अहर्निशी । जीवे सर्वस्वेसी पढियते ॥ १६० ॥ आवडी करितां माझें भजन । मज पूज्य झाले भक्तजन । स्या भक्काचे निजलक्षण । स्वयें श्रीकृष्ण सागत ॥ ६१॥ , निरपेक्ष मुनि शात निर्वर समदर्शाम् । अनुग्रजाम्यह नित्य पूयेयेत्यधिरेणुभि ॥ १६ ॥ __ अनन्य करितां मानें भजन । माझ्या स्वरूपी झंगटले मन । सकळ वासना गेल्या विरोन । वृत्तिशून्य अवस्था ॥ ६२ ॥ आटौटीवीण न प्रार्थिता । अयाचित अर्थ प्राप्त होतां । तोही हाती घेयो जाता । निरपेक्षता बुडाली ॥६३॥ अर्थ देखोनि जो लविन्नला। तो जाण लोभे वोणवा केला । तोही उपेक्षनि जो निघाला । तो म्यां वंदिला सर्वस्वं ॥ ६४ ॥ मार्गी अर्थ पडता । कोणी नाही माझा हाणतां । तोही स्वयें हाती घेतां । निरपेक्षता बुडाली ॥ ६५ ॥ वृत्तिशून्य जे अवस्था । ती नांव जाण निरपेक्षता । ते काळींची जे मननता । ऐक तत्त्वता सागेन ॥६६॥ वेदशास्त्रा) परम प्रमाण । ते माझें शट स्वरूप जाण । न ये स्वरूपी निजनिर्धारण । त्या नाय मनन वोलिजे ॥६७॥ करिता स्वरूपविवंचन । स्वरुपरूप झालें मन । तेथे धारणेवीण मनन । करितां स्मरण होतसे ॥ ६८ ॥ या नाव मननावस्था । सत्य जाण पा सर्वथा । याहीवरी शांतीची जे कथा । तत्त्वता सांगेन ॥ ६९ ॥ कामक्रोध सलोभता । समूळ मूळेंसी न वचतां । देही आली जे निश्चळता । ते न सरे सर्वथा येथ शाती ॥ १७०॥.मत्स्य धरूनिया मनीं । वके निश्चळ राहिला ध्यानीं । ते शाती कोण मानी । अतःकरणी सकाम ॥ ७१ ॥ देही स्फुरेना देहअहंता । विराली कामक्रोधसलोभता । हे शाती वाणे,भाग्यवंता । मुख्य शातता या नांव ॥ ७२ ॥ उद्धवा जाण पा निश्चिती । मजही मानली हेचि शांती । याहीवरी जे समतेची स्थिती । ऐक तुजप्रती सागेन ॥ ७३ ॥ विचित्र भूतें विचित्र नाम । विचित्राकारें जग विपम । तेथे देखे सर्वी सर्व सम । परब्रह्म समत्वे ॥ ७४॥ फाडाफाडी न शिणता । तडातोडी न करिता । माझेनि भजने मद्धका । सर्वसमता मद्भावे ॥७२॥ मद्भावे समता आल्या हाता। खुंटली भूतभेदाची वार्ता । भेदशून्य स्वभावतां । निर्वैरता सहजेचि ॥५६॥ जंगवरी द्वैताचे भान । तंववरी विरोधाचे कारण । अवघा एकचि आपण । तेय वैरी कोण १ वेदशास्त्रात २ भृगुपदचिह ३ दयासोन्यातून ४ पूर्णकाम ५ साम्यतेला, परोपरीला ६थारवा ७धमयज्ञाताल उर्स भफसकटी ६ ऑपाळणी १० आवडते ११ एकनिष्ठपणानं १२ लुब्ध झाले, जडले १३ श्रमावाचून १४ उपस, यक्लिा १५ धन १६ आपल्या स्वरूपाचे ध्यान करिता करिता मन सरपाकार होणं याचं नाव मनन. १७ वरूपामी तदाकार १८ मासा १९ वगग २० ठसते.