________________
३४८ एकनाथी भागवत. ज्ञानखजाची होय प्राप्ती । छेदोनि संसारआसक्ती । सायुज्यमुक्ती मदतां ॥२६॥ माझेनि भजनें मोक्ष पावे । ऐसे बोलिले जें देवे । ते आइकोनिया उद्धवें । विचारू जीवें आदरिला ॥ २७ ॥ देवो सांगे भजनेचि मुक्ती । आणिका ज्ञात्याची व्युत्पत्ती । आणिक साधनें मोक्षाप्रती । सागताती आनआने ॥२८॥ एवं या दोही पक्षी जाण । मोक्षी श्रेष्ठ साधन कोण । तेचि आशंकेचा प्रश्न । उद्धवे आपण माडिला ॥ २९ ।। उद्धव उवाच-वदन्ति कृष्ण श्रेयांसि बहनि ब्रह्मवादिन । तेषा चिकल्पप्राधान्यमुताहो एक्मुग्यता ॥ १ ॥ उद्धव ह्मणे गा श्रीपती । मोक्षमार्गी साधनें फिती । वेदवादियांची व्युत्पत्ती । बहुत सांगती साधने ॥ ३० ॥ती अवघीच समान । की एक गौण एक प्रधान । देवे सांगीतले आपण । भक्तीचि कारण मुक्तीसी ॥ ३१ ॥ __ भवतोदाहत स्वामिन् भक्तियोगोऽनपेक्षित । निरस्य सर्वत सायेन स्वच्याविदोन्मनः ॥ २ ॥ आणिकां साधनां नापेक्षिती । सर्व सगांतें निरसिती । मोक्षमार्गी मुख्य भक्ती । जिणे स्वरूपप्राप्ती तत्काळ ॥ ३२॥ माझ्या स्वरूपी ठेवूनि मन । फळाशेवीण माझे भजन । हेंचि मोक्षाचे मुख्य साधन । देव आपण बोलिलें ॥ ३३ ॥ स्वामी योलिले मुख्य भक्ती । इतर जे साधनें सांगती । त्यांसी प्राप्तीची अस्तिनास्ति । देवे मजप्रती सांगावी ॥ ३४॥ याचि प्रश्नाची प्रश्नस्थिती । विवंचीतसे श्रीपती । त्रिगुण ज्ञात्याची प्रकृती । साधने मानिती यथारुचि ॥ ३५ ॥ ज्याची आसक्ती जिये गुणी । तो तेंचि साधन सत्य मानी । यापरी ज्ञानाभिमानी । नाना साधनी जल्पती॥ ३६॥ परपरा बहुकाळ । ज्ञात्याचें ज्ञान झाले मैळें । तें सत्य मानिती तुच्छ फळें । ऐक प्रांज उद्धवा ॥ ३७॥ चौदाव्यामाजी निरूपणस्थिती । इतुकें सागेल श्रीपती । साधनांमाजी मुख्य भक्ती । ध्यानयोगस्थिती समाधियुक्त ॥ ३८ ॥ इतर साधनांचे निराकरण | तुच्छफलत्वे तेही जाण । सात श्लोकी श्रीकृष्ण । स्वमुखें आपण सागतू ॥ ३९॥ श्रीभगवानुवाच कालेन नधा प्रलये वाणीय वेदमजिता । मयाऽऽदौ ब्रह्मणे प्रोक्ता धर्मो यस्सा मदात्मक ॥३॥ माझी वेदवाणी प्रांजळी । ज्ञानप्रकाशे अतिसोज्वळी । ते नाशिली प्रळयकाळी । सत्यलोकहोळी जेव्हा झाली ॥४०॥ ब्रह्मयाचा प्रळयो होतां । वेदवाणीचा वक्ता । कोणी नुरेचि तत्त्वतां । यालागी सर्वथा वुजाली ॥४१॥ तेचि वेदवाणी कल्पीदीसी । म्याचि प्रकाशिली ब्रयासी । जिच्याठायीं मद्भक्तीसी । यथार्थेसी वोलिलो ॥ ४२ ॥ जे वाचेचे अनुसधान । माझे स्वरूपी समाधान । ऐसें माझें निजज्ञान । ब्रहयासी म्यां जाण सांगीतले ॥ ४३ ॥ तेन प्रोका च पुवाय मनचे पूर्वजाय सा । ततो भृग्वादयोऽगृह्णन् सप्त प्रामहर्षय ॥ ४ ॥ तो सकळ वेद विवंचूनू । ब्रह्मेनि उपदेशिला मनू । सप्त ब्रह्मपी त्यापासूनू । वेद सपूणू पायले ॥ ४४ ॥ ब्रह्मेनि दक्षादि प्रजापती । उपदेशिले त्याचि स्थिती । यापासून नेणो किती। ज्ञानसपत्ती पावले ॥४५॥ सप्त ऋपीची जे मातू । भृगु मरीचि अत्रि विख्यातू । अगिरा पुलस्त्य पुलह ऋतू । हा जाण निश्चितू ऋपिभागू ॥ ४६॥ १ प्राप्त होतो २ मोक्षप्राप्ति ३ नावादी पुरुष मोक्षप्राप्तीची माधने निरनिराळी सागतात ४ इच्छा करीत नाहीत ५ सोडून देतात ६ निष्काम भजन होते किंवा नाही ८ विचार करी ९ मलिन १० सरळ ११ निवारण १२ सप्त झाली १३ प्रळयकाळी १४ सष्टीच्या आरभी १५ उपदेशिली १६ विचार करून १७ गगु, मरीचि, अनि, अगिरा, पुलस्त्य, पुल्हन मत