पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/388

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३७६ एकनाथी भागवत हृदयी मीचि एक । ऐसें पाहे तो सभाग्य देख । हे भजन चोख मत्प्राप्ती ॥ ३६॥ ज्या मज हृदयस्थाचे दीप्ती । मनवुद्धयादिकें वर्तती । ज्या माझिये स्फुरणस्फूर्ती । ज्ञानव्युत्पत्ती पायां लागे ॥ ३७॥ त्या मज हृदयस्थाच्या ठायीं । भजनशीळ कोणीच नाहीं । शिणता बाह्य उपायी । जन अपायीं पडताती ॥ ३८ ॥ ऐशांत संदैव कोणी एक । निजभाग्य अत्यंत चोख । मज हृदयस्थाचा विवेक । करूनि निष्टंक मदजनीं ॥३९॥ करिता हृदयस्थाचे भजन । माझं पावे तो निजज्ञान । वैराग्ययुक्त सपूर्ण । जे ज्ञानी पर्तन रिघेना ॥५४०॥ ज्या ज्ञानाभेणे जाण । धाकेचि पळे अभिमान । तें मी आपुले त्यांसी दें ज्ञान । जे हृदयस्थाचे भजन करिती सदा ॥ ४१॥ ज्या ज्ञानाचिये ज्ञानसिद्धी । अखिल जाती आधिव्याधी । सशय पळती त्रिशुद्धी । भक्त निजपदी पावती ॥ ४२ ॥ सबळ बळें सुभटें । शस्त्राचेनि लखलखाटें । संशयो छेदावा कडकडाटें । हे म्या नेटेंपाटें सागीतले ॥ ४३ ॥ यावरी असे गमेल चित्तीं । ससाराची सत्यप्राप्ती । त्यासी शस्त्र घेऊनि हाती । कोणे युक्ती छेदावा ॥ ४४ ॥ तरी ससार तितुकी भ्रांती । हेचि सांगावया दृष्टांती । पुढील श्लोकाची श्लोकोकी । स्वयें श्रीपती सांगतू ॥ ४५ ॥ ईक्षेत विभ्रममिद मनसो विरास दृष्ट विनष्टमतिलोलमलातचकम् । विज्ञानमेकमुरधेष विभाति माया स्वमस्थिधा गुणविसर्गकृतो विकटप ॥ ३४ ॥ देहादिअहंकारपर्यंत । पिंड ब्रह्मांड जे भासत । तें मनोमात्र विलसत । मिथ्याभूत ससार ॥४६॥ जैसे स्वामी निद्रेमाजी मन । स्वयें देखे त्रिभुवन । तैसेचि हैं दीघस्वम । अविद्या जाण विकाशी ॥४७॥ आन असुनि आन देखती । त्या नाव आभास ह्मणती। शुक्तिकेमाजी रजतनांती । दोरातें ह्मणती महास' ॥४८॥ सूर्याचे किरण निखेळ । ते ठायीं देखती मृगजळ । तैशी शुद्ध वस्तू जे केवळ । तो ससार वरळ ह्मणताती ॥४९॥ तया आरोपासी अधिष्ठान । मीचि साचार असे आपण । जेवीं का कोलिताचे काकण । अग्नितेजे जाण आभासे ॥ ५५० ॥ अलातचक्रींचा निर्धार । अग्नि सत्य मिथ्या चक्र । तेवी निर्धारितां ससार । ब्रह्म साचार ससार मिथ्या ॥५१॥ तेथ आधिदैव आधिभौतिक । आध्यात्मादि सकळिक । अलातचक्राच्याऐसे देख । त्रिगुणमायिक परिणाम ॥५२॥ कोलिताचेनि भ्रमभासे । भ्रमणवळ तें चक्र दिसे । क्षणां दिसे क्षणा नासे । तैसा असे हा ससारू ।।५३ ॥ जंव भ्रमणाचे दृढपण । तंव कोलिताचें काकण । भ्रम गेलिया जाण । काकणपण असेना ॥ ५४॥ तेवी जंव जंव भ्रम असे । तंव तंव दृढ ससार भासे । भ्रम गेलिया अनायासे । ससार नसे पाहताही ॥ ५५ ॥ मी देहो माझे कलन पुत्र । हे भ्रमाचें मुख्य सूत्र । तें न छेदिता पामर । मुक्ताहंकार मिरविती ॥५६॥ एव मायामय ससारू । ऐसा जाणोनि निर्धारू । तेथील सांडूनि अत्यादरू । उपरमप्रकार सागत ॥ ५७ ।। १ तेजान २ बाहेरील उपाधींची वृथा दगदग करितात ३ राड्यात पडतात ४ देवशाली ५ चितन, ध्या। ६ अधोगति ७ मानसिक व शारीरिक व्यथा ८ एक्दम ९ योद्ध्याने १०क्षिन ११ निरनिराळे दह १२ मनाचा रोळ याहे १३ एक असा मलते १४ शिंपेला रुपे रमणतात १५शुद्ध, प्रकाशमान १६ वहबडे लोक १७ पेटटेल कोलीत गरगर फिरविर रणजे भााचे लाल कई दिसते ते १८ फिरत्या कोलिताचा जो वाटोळा चकाकार दिसतो त्याचा १९ मिभ्या २० मायेपासून सुटण्याचा प्रकार