पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/380

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६४ एकनाथी भागवत लाहे ॥ ३५० ॥ जैसे जळींचे जळतरग । जळरूपं जळी क्रीडती चांग । तैसे माझ्या स्वरूपी साग । देह अनेग मद्रूपें ॥५१॥ हो का घृताची पुतळी। थिजोनि जाली एके काळी । परी ते नव्हे घृतपणावेगळी । तेवीं भूतें झाली मजमाजीं ॥५२॥ जळी जळाची जळगार । जळामाजी भासली साकार । तैसे मजमाजी चराचर । अभिन्न साचार मद्रूपी ॥५३ ॥ जैसा एकला एक तंतू । सुतेंचि विणिला सुताआंतू । त्यां वेगळाले ह्मणती तांतू । तैसे मजआंतू जग भासे ॥ ५४ ॥ तंतू पाहतां वस्त्र न दिसे । आत्मा लक्षितां जगचि नसे । येणे अद्वैततत्त्वसौरसे । आहे अनायासें परब्रह्म ॥ ५५ ॥ ऐसा अद्वैतवोधे मी एकू। सर्वात्मा सर्वात्मकू । हा निश्चयेंसी विवेकू । बुद्धिवो निष्टं• जाणावा ।। ५६ ॥ मीचि एक सर्वा ठायीं । हेचि दृढ धरिल्या पाहीं । मग साधनाचे कार्य नाहीं । ठायींच पाहीं नित्यमुक्त ।। ५७ ॥ सर्वात्मा चैतन्यधन । अतिसुलभ हे निजज्ञान । उद्धवा म्यां हे सांगोन जाण । मेदखंडण केले त्यांचे ॥ ५८ ॥ सनकादिकांचा पूर्वील प्रश्न । जो ब्रह्मादिकां अटक जाण । त्याचेही म्यां प्रतिर्वचन । विवंचूंनि ज्ञान सांगीतलें ॥ ५९ ॥ ___गुणेष्वाविशते चेतो गुणाश्वेतसि घ प्रजा । जीवस्य देह उभय गुणाश्वेतो मदारमन ॥२५॥ तुह्मी ब्रह्मयासी पुसिलें पाहीं । विषय रिघाले चित्ताच्या ठायीं । चित्त में रिघालें विपयीं । तें वेगळे काही निवडेना ॥ ३६० ॥ विपयत्यागेविण । कदा नव्हे ब्रह्मज्ञान । त्याही त्यागाची त्यागिती खूण | ऐका सपूर्ण सागेन ।। ६१॥ चित्त विषय दोनी पाहें । ते जीवाचे निजस्वरूप नव्हे । हे उपाधिवशे दोनी देहें। लागली पाहें प्रवाहरू ॥ ६२ ॥ कर्तृत्वभोक्तृत्वरूपं जाण । विषयी जाहलें अंतःकरण । तेणें उभय देहाचे कारण । अहंकारू जाण खवळला ॥ ६३ ॥ तेणे भुलविले चित्त 'विषयांसी । विसरला निजात्मस्वरूपासी । तेणे तदात्मता जीवामनांसी । अतिशयेंसी दृढ झाली ॥ ६४ ॥ चित्त जीवाचें स्वरूप होते । तरी विषयीं लोलुप नव्हतें । हा उभय उपाधी जीवातें । अभिमाने तेथे वाढविला ॥६५॥ जेवीं का विसरोनि आपणासी । स्वमींचिया स्वमदेहासी । अतिप्रीति पाढे पुरुषासी । तैसी दशा जीवासी येथ झाली ॥ ६६ ॥ नित्य शुद्ध मुक्त जाण । जीवाचें स्वरूप चैतन्यधन । त्यासी अभिमाने हे जाण । मिथ्या बंधन लाविले ॥ ६७ ॥ यालागी साडावा अभिमान । ते तुटे सकळ बंधन । अभिमान निरसावया जाण । माझं भजन करावे ॥ ६८ ॥ परी वैराग्येवीण माझी भक्ती । पांचट जाण पा निश्चिती । 0 वैराग्ययुक्त उपजे भक्ती । तै मद्पप्राप्ती जीवासी ॥ ६९ ॥ हृदयीं विषयाचा 'अभावो । आणि सर्वाभूती भगवद्भायो । वैराग्ययुक्ती पहा हो । ते जीवासी मिाहो मद्रुपीं ॥ ३७० ॥ जीव मद्रूपचि तत्त्वतां । त्यासी देहाभिमान जीविता । सदा भूर्ती मझायो पाहतां । सिद्ध मद्रूपता उद्बोधे ॥ ७१॥ जीवासी जाहल्या मद्रुपता । सहजे त्यागू विपयचित्ता । देखें उभयांसी मिथ्यता । न त्यागिता हा त्यागू ॥ ७२ ॥ चित्तविपयांचा त्यागू। पुत्र हो तुमी पुशिला चांगू । तो म्या सागितला अध्यंगू । हा ज्ञानमा" अतिशुद्ध ॥ ७३ ।। ह्मणाल मिथ्या उभयाचे भान । तरी एवढें जीवासी बंधन । लागावया काही कारण । ऐसें काही १तत ऐक्यभावाने ३ पाहें निचर्येकरून ५ कठिण. न सुटणारा ६ उत्तर ७ विवरण करून ८ उपाधीच्या योगगन ९ आसफ १० ब्रह्ममय ११ पोकळ, नि सत्व १२ नसणे १३ स्थिति, योग्यता १४ यथासाग