________________
३६८ एकनाथी भागवत. लाहे ॥ ३५० ॥ जैसे जळींचे जळतरंग । जळरूपं जळी क्रीडती चांग । तैसे माझ्या स्वरूपी साग । देह अनेग मद्रूपें ॥५१॥ हो कां धृताची पुतळी । विजोनि जाली एके काळी । परी ते नव्हे घृतपणावेगळी । तेवीं भूते झाली मजमाजी ॥५२॥ जळी जळाची जळगार । जळामाजी भासली साकार । तैसे मजमाजी चराचर । अभिन्न साचार मद्रूपी ॥५३॥ जैसा एकला एक ततू । सुतेंचि विणिला सुताआंतू । त्यां वेगळाले ह्मणती तांतू । तैसें मजआंतू जग भासे ॥ ५४ ॥ तंतू पाहतां वस्त्र न दिसे । आत्मा लक्षितां जगचि नसे । येणे अद्वैततत्त्वसौरसे । आहे अनायासें परब्रह्म ॥ ५५ ॥ ऐसा अद्वैतवोधे मी एकू । सर्वात्मा सर्वात्मकू । हा निश्चयेंसी विवेकू। बुद्धिवोधे निष्टंकू जाणावा ।।५६ ॥ मीचि एक सर्वा ठायीं । हेंचि दृढ धरिल्या पाहीं । मग साधनाचे कार्य नाहीं । ठायींच पाहीं नित्यमुक्त ॥ ५७ ॥ सर्वात्मा चैतन्यघन । अतिसुलभ हैं निजज्ञान । उद्धवा भ्यां हे सागोन जाण । मेदखंडण केले त्याचें।। ५८ ॥ सनकादिकांचा पूर्वील प्रश्न । जो ब्रह्मादिकां अटेक जाण । त्याचेही म्यां प्रतिवचन । विवंचूंनि ज्ञान सागीतलें ॥ ५९ ॥ गुणेष्वाविशते चेतो गुणाश्चेतसि च मजा । जीवस्य देह उभय गुणाश्वेतो मदारमन ॥ २५ ॥ तुह्मी ब्रयासी पुसिलें पाहीं । विषय रिघाले चित्ताच्या ठायीं । चित्त में रिघालें विषयीं । तें वेगळे काही निवडेना ॥३६० ॥ विपयत्यागेविण । कदा नव्हे ब्रह्मज्ञान । त्याही त्यागाची त्यागिती खूण । ऐका संपूर्ण सागेन ॥ ६१ ॥ चित्त विपय दोनी पाहें । ते जीवाचे निजस्वरूप नव्हे । हे उपाधिवशे दोनी देहें । लागी पाहें प्रवाहरू ।। ६२ ।। कर्तृत्वभोक्तृत्वरूपं जाण । विषयी जाहलें अतःकरण । तेणें उभय देहाचे कारण । अहंकारू जाण खवळला ॥ ६३ ॥ तेणे भुलविले चित्त विषयासी । विसरला निजात्मस्वरूपासी । तेणे तदात्मता जीवामनांसी । अतिशयसी घट झाली ।। ६४॥ चित्त जीवाचें स्वरूप होते । तरी विषयीं लोलुप नव्हतें । हा उभय उपाधी जीवातें । अभिमानें तेथें वाढविला ॥ ६५ ॥ जेवीं का विसरोनि'आपणासी । स्वनीचिया स्वमदेहासी । अतिप्रीति वादे परुपासी । तैसी दशा जीवासी येथ झाली ॥६६॥ नित्य शद्ध मत जाण । जीवाचें स्वरूप चैतन्यघन । त्यासी अभिमाने हे जाण । मिथ्या बंधन लाविले ॥ ६७ ॥ यालागी सांडावा अभिमान । ते तुटे सकळ बंधन । अभिमान निरसावया जाण । माझें भजन करावे ॥ ६८॥ परी वैराग्येवीण माझी भक्ती । पाचट जाण पा निश्चिती । मैं वैराग्ययुक्त उपजे भक्ती । तै मद्पप्राप्ती जीवासी ॥ ६९ ॥ हृदयीं विषयांचा अभावो । आणि सर्वाभूती भगवद्भावो । वैराग्ययुक्ती पहा हो । तैं जीवासी मिाहो मद्रूपीं ॥ ३७० ॥ जीव मद्पचि तत्त्वतां । त्यासी देहाभिमान जीविता । सदा भूती मद्भावो पाहता । सिद्ध मद्रूपता उद्वोधे ॥७१ ॥ जीवासी जाहल्या मद्रुपता । सहजें त्यागू विषयचित्ता । देखें उभयासी मिथ्यता । न त्यागिता हा त्यागू ॥ ७२ ॥ चित्तविपयाचा त्यागू। पुत्र हा तुला पुशिला चांगू । तो म्या सागितला अध्यंगू। हा ज्ञानमा अतिशुद्ध ॥ ७३॥ ह्मणाल मिथ्या उभयाचे भान । तरी एवढें जीवासी बंधन । लागावया काही कारण । ऐसे काही • १ रातु २ ऐक्यभावाने ३ पाहे ४ निधयेकरून ५ कठिण, न सुटणारा ६ उत्तर ७ विवरण करून ८ उपाधीच्या योगाने भासक १० ग्रामय ११ पोकळ, नि सत्व १२ नसणे १३ स्थिति, योग्यता १४ मधासाग