पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/377

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा. ३६७ समसमान । भूतें भूतत्वें समान जाण । तेथ प्रश्नोक्ति वाचारभण । 'तूं कोण' हे अनर्थ ॥ २६ ॥ हो का आपणिया आपण । जो कोणी पुसेल तूं कोण । तो अतिभ्रमें भुलला जाण । निजात्मज्ञान विसरला ॥२७॥ विचारिता प्रश्नाचा अर्थे । एवढा दिसतसे अनर्थे । काही भासेना परमार्थे । तूं कोण हा व्यर्थै प्रश्न तुमचा ॥ २८ ॥ देहासी तूं कोण ऐसे । आत्मा जै स्वयें पुसे । ते आत्मत्वा लागले पिसें । अतिभ्रंशे भूलला ॥२९॥ दोराजगी सर्प नसे । त्यावरी तो भ्रमे भासे । त्या सातें दोरू पुसे । तू कोण ऐसे ते मिथ्या ॥ ३३० ॥ या रीती त्याचे प्रश्नखंडन । उद्धवा ते म्या केले जाण । तेणे भेदाचें निरसन । वचनोती जाण दाविले ॥ ३१॥ प्रश्नखंडणाचे अर्थे । केची करणे कैची भूते । भेद नाही जीवशिवाते । हेही त्याते सूचिले ॥ ३२ ॥ याहीवरी जे कथा गहन । परम कारणेस अभिन्न । त्यासी म्यां सागीतले निजज्ञान । ऐक सावधान उद्धवा ॥ ३३॥ - मनसा वचसा या गृह्यतेऽन्यैरयीन्मियः । अहमेव न मत्तोऽ यदिति बुध्यध्वमासा ॥ २४ ॥ __ मजवेगळा तिळाइतुका । रिता ठावो नाहीं देखा । तेथ व्याप्य आणि व्यापका । अभिन्नत्वं देखा सहजचि ॥ ३४ ॥ मनाच्या सकल्पा आले जे जाण । त्यासी शाब्दिक ह्मणती मिन्न । माझ्या स्वरूपाचा विवर्त तें मन । हे अभिन्न खूण कळेना ॥ ३५ ॥ मन लक्षिता सावधान । सर्वया लक्षेना ते जाण । परब्रह्मही अलक्ष्य पूर्ण । दोनी समान चिद्ये ॥३६ ॥ शिंपीच्या अगी रुपे आभासे । तेंचि ते साचे नसे । माझ्या स्वरूपी मन तैसें। मिथ्या भासे कल्पनामान ।। ३७ ।। विचारितां शब्दमहिमान । शब्दस्वरूपं ज्ञानघन । ज्ञानार्थेवीण वचन । अल्पही जाण असेना ॥ ३८॥ वक्ता वाच्य वचन । तीनी मीचि आहे जाण । बोल वोलका मजवीण । दुसरा जगी कोण असे ॥ ३९ ॥ मी वेदू जाण पा वेदाचा । प्रणवरूप मीचि साचा । मुख्य बाचेची मीचि वाचा । वेगळा शब्दाचा ठावो नाहीं ॥ ३४०॥ दृष्टीचे जे देखणेपण । देखणे तेचि मुख्य ज्ञान । तेचि जाण ब्रह्म पूर्ण । चैतन्यघन निजदृष्टी ।। ४१ ॥ मीचि डोळा मीचि देखता । दृश्य द्रष्टा मीचि तत्त्वता। मजवेगळी देखणी अवस्था नाहीं सर्वथा तिही लोकीं।।४२॥ मीच डोळियाचा निजडोळा। मी सर्वागदेखणा सोज्वळा । मजवेगळी देखणी कळा । नाहीं जिव्हाळा आणिकाचा ॥४३॥ मीचि शब्दातें शब्दविता मीचि श्रवणामाजी श्रोता। ऐशिया एकात्मता पाहता । शब्द निःशन्दता परब्रह्म ॥ ४४ ॥ कान वचन मीचि श्रोता। मीचि जाणता शब्दार्था । ऐकणाही मजपरता । नाहीं तत्त्वता श्रवणाचा ॥ ४५ ॥ मीचि भ्राण मीचि चास । मीचि जाणता सुपास । मजवेगळा रहिवास । परिमळास असेना ॥ ४६ ॥ रसना रसज्ञत्वे चोखडी । परी ते केवळ चामडी । कापून सोडिल्या चापुडी । गोडी अगोडी ते नेणे ॥४७॥ मीचि रसू मीचि रसना । स्वादु सेविता मीचि जाणा । मजवेगळा चवीचाखणा । रसज्ञपणा आन नाही ॥४८ ॥ इतर इंद्रियप्रवृत्ती । त्याही मद्प जाण निश्चिती । मी सर्वात्मा आत्ममूर्ती । क्रियाशक्ती तेही मीचि ॥४९॥ पाचभौतिक देहाचा गोळा भात झणती मजवेगळा 1 चुकोनि व्यापका सकळा । तो कोठे निराळा राहो वाणी बोलावयापुरता विषय २ अथहीन ३ द्वैताचें ४ इद्रियें ५ ऐक्य ६ वास्तविक अस्तित्वात नसनही मायेने भासमान होणारा विकार शब्दाचा मोठेपणा ८ भोकाररूप ९वाचेची वाचा १०नाक ११ स्थान. जागा. १२ जीम १३ कातडी १४ रसाखाद घेणारा. १५दुसरा.