________________
३६६ एकनाथी भागवत. इत्यह मुनिमि पृष्टतत्यजिज्ञासुभिस्तदा । यदयोचमह तेभ्यम्वदुद्धव नियोध मे ॥ २१ ॥ ब्रहयासी पुसिला जो प्रश्न । त्याचा तत्त्वार्थ जाणावया जाण । मज पुशिले तिहीं तूं कोण । अतिविचक्षण जिज्ञासू ॥ ४ ॥ त्यासी स्थूल लिंग कारण । यावेगळी वस्तु चिद्धन । सागावया प्रश्नखंडण । ती श्लोकी जाण म्या केलें ॥५॥ करोनियां प्रश्नखंडण । नित्यानित्य विवेकज्ञान । त्यासी म्या सागीतले जाण । तेचि निरूपण तूं ऐक ॥ ६ ॥ सनकादिकांसमान । उद्धवा तुज मी मानी जाण । यालागी त्याचे ज्ञानकथन । ऐक सांगेन हाणतसें ॥७॥ तें अतिश्रेष्ठ जुनाट ज्ञान । उद्धचा परिसे सावधान । ऐसे ऐकोनियां वचन । येरें मनाचे कान पसरले ॥ ८॥ देहेद्वय सांडोनि मागें । उद्धव श्रवण झाला सर्वांगें । यालागी स्वये श्रीरंगें। गुंह्य ज्ञान स्वागें सांगीतले ॥९॥ देवालयीं लागे रत्नखाणी । त्यांमाजी सापडला स्पर्शमणी । अमृत स्रवे त्यापासोनी । तैसा सभाग्यपणी उद्धवू ॥३१०॥ सांगता श्रीमहाभागवता । श्रीकृष्णासारिखा वक्ता । त्याहीमाजीं हंसगीतकथा । आदरें सागता हरि झाला ॥११॥ सनकादिकाची जे प्राप्ती । ते दाट्रनि उद्धवाचे हाती । स्वयें देतसे श्रीपती । त्याचे भाग्य किती वर्णावे ॥ १२ ॥ ब्रह्मरूप स्वयं वक्ता । तोही उपदेशी ब्रह्मकथा । गुरु ब्रह्मचि स्वभावतां । हे सभाग्यता उद्धवीं ॥१३॥ यालागी निजभाग्य भाग्यवंतू । जगी उद्धवचि अतिविख्यातू । ज्यालागी स्वयं जगन्नाथू । ज्ञानसमयूं तुष्टला ॥१४॥ ॥ हम उवाच ॥ यस्तुनो यधनानात्वमात्मन प्रश्न ईदृश । कथ घटेत वो विमा यत्तुर्या मे क आश्रय ॥ २२ ॥ परमात्मा अवघा एक । तेथ 'मी तूं' हे न रिघे देख । 'तूं कोण' हे जे वाचिक । वृथा शाब्दिक वाचाळ ॥ १५॥ तुही केला जो प्रश्न । त्यासी द्यावया प्रतिवचन । वन्यासी आश्रयो नाही जाण । मीतूंपण दिसेना ॥१६।। तुहीं पुसिले नेणोन । म्या काय सागावें जाणोन । मूळीं नाहीं मीतूंपण । पुशिला प्रश्न तो मिथ्या ॥ १७ ॥ नामरूपवर्णव्यक्ती । नाहीं स्वजातिविजाती। विन हो तुमची वचनोक्ती । न घडे निश्चिती सत्यत्वें ॥ १८ ॥ चारी पुरुषार्थ पूर्ण करिती । हे विनामाची परमख्याती । त्या तुह्मांस ज्ञानाची प्रश्नोती। न घडे निश्चितीं विप्र हो ॥ १९ ॥ असावें जरी चहुपण । तरी पुसणे घडे तूं कोण । आत्म्याचे ठायीं ऐसा प्रश्न । न घडे जाण सर्वथा ।। ३२० ॥ प्रश्न न घडे आत्म्याच्या ठायीं । जरी ह्मणाल देहाविषयीं । तेही न घडे गा पाही । तो देहाचे ठायीं योजेना ॥२१॥ पचात्मकेषु भूतेषु समानेषु च वस्तुत । को भवानिति व प्रश्नो वाचारम्भो धमर्थक ॥ २३ ॥ आदी ब्रह्मा अंती मर्शक । देह तितुका पांचभौतिक । तेथ तूं कोण ह्मणावया देख । वेगळीक दिसेना ॥ २२ ॥ कटक कुंडले मुकुट माळा । करमुद्रिका कटिमेखळा । अलंकार पाहता डोळा । सुवर्णावेगळा अशु नाहीं ॥ २३ ॥ का घडा गाडगे वेळणी । परळ राजण माथणी । हे मृत्तिकेवाचुनी । आन काही असेना ॥ २४ ॥ तेवीं सर्व देहीं देहत्वे जाण । पाचभौतिक समसमान । तेथ मणावया तूं कोण । वेगळेपण असेनाः ॥ २५ ॥ वस्तु वस्तुत्वे १ चतुर २ जाणण्याची इच्छा करणारे ३ तीन देहाची ही नावे आहेत ४ प्रश्न सुटवणे ५ स्थूल व सूक्ष्म ६ पान ७ गुसज्ञान ८ परीस आपण होऊन १० व्यर्थ चाचाळपणाची वडवड ११ प्रशोक्ति १२ ब्राह्मण या नावाचा १३ अनेरुपण, मिनपण १४ ब्रदयापासून मशका (चिलटा)पर्यंत. १५ भागठी १६ कडदोरा १७ मातीची भाका