________________
अध्याय तेरावा. मती । उद्धवा जाण निश्चिती । यालागी काम ते सेविती । नव्हे विरक्ती विपयांची ॥४२॥ तुज ऐसे घाटेल चित्ती । बुडाली तरणोपायस्थिती । खुंटली पाण्याची परम गती । विषयासक्ती अनिवार ।। ४३ ।। जीना अविद्याविषयसवंधू । याचा वाधू अतिसुबद्धू । अविद्यायोग अनादिसिद्ध । तेणे दृढ भेदू जीवासी ॥ ४४ ॥ अतःकरणही अनादी । प्रवाहरू त्याची सिद्धी । तेणे दृढ झाली विषयबुद्धी । त्याग त्रिशुद्धी घडेना ॥४५॥ सत्वीं उत्पन्न अतःकरण । परी ते प्रकृतिकार्य जाण । तेथे भोगाभ्यासे रजोगुण । खवळला कोण आवरी ॥ ४६ ।। विषयीं वाधिले विवेकी । तो विपयत्याग नव्हे ये लोकीं । उद्धवा तुझी आशंका हेच की। ऐक तेविखीं उपावो ॥ ४७ ॥ विवेकियाच्या ठायीं । विषयबुद्धि नुपजे पाही। विक्षेपू झाल्या कंहीवहीं । अभ्यासू तिही करावा ॥४८॥ रजस्तमोभ्या यदपि विद्वान्विक्षिप्तधी पुनः । अतन्द्रितो मनो युजन् दोषदृष्टिन सजते ॥ १२ ॥ हो का रजतमाचेनि गुणे । जरी बुद्धी विक्षिप्त केली तेणे । तरी आळस सानि सनाने । आवरणे मनातें ॥४९॥ अस्थिमासाचा घडिला । विठामूत्राचा कोथळा । स्त्री विचारिता काटाळा । नरकजिव्हाळा तो भोगू ॥२५०॥ भोगी दावूनि दोपदृष्टी । मनासी विपयाची तुटी । करावी गा उठाउठी । नेमूनि निहटी मनातें ॥५१॥ ऐसेनिही मन अतिदुर्धर । नियमासी नावरे अनावर । साधकासी अतिदुस्तर । अशक्त नर ये अर्थी ॥५२॥ तरी ऐक वापा सावधान । मनोनिग्रहाचें लक्षण । तेही सागेन साधन । जेणे प्रकारे मन आकळे ॥ ५३ ॥ अप्रमत्तोऽनुयुलीत मनो भय्यर्पयन शने । अनिर्विष्णो यथाकाल जितश्वासो जितासन ॥ १३ ॥ आळस निद्रेसी दवडूनि दूरी । जो सावधान निवृत्ति धरी । माझे चिद्रूप निर्धारीं । शनै शनैः करी अभ्यासू ।। ५४ ॥ अभ्यासी प्रथम भूमिका । शिकावी आसनगाढिका । मुंळबंध अतिनेटका । आसनजयो देखा शिकावा ॥ ५५ ॥ आसनजयो आल्या हाता । सहजे चढे योगपर्यो । तेथे प्राणापानसमता । अभ्यासिता हों लागे ॥ ५६ ॥ विषय ते मनाआधीन । मन पवनासी वश्य जाण । अभ्यासे वश केला पवन । सहजे मन स्थिरावे ॥५७ ॥यापरी जो हळूहळू । अभ्यासे सार्थक करी कालू । अविरक्त परी प्रवळू । होय भुकालू परमार्थी ।। ५८ ॥ हरिचिंतनीं एकाग्र मन । तै एक होती प्राणापान । हाचि परनजयो पूर्ण । योगसाधन सहजेचि ॥ ५९ ॥ तंव प्राणापान सम जोडी । पट्चक्राचे पदर फोडीत विषयाते चित्त साडी। विपयो बोसडी" चित्तातें ॥२६॥ यापरी या अभ्यासवादे । सकाम कामाचा तेटका तुटे । सनकादिक येणे परियोठे । म्या आत्मनिदै लाविले ॥ ६१॥ एतावान्योग आदिधौ मरिष्यै सनकादिभिः । सर्वतो मन आकृष्य मथ्यद्धावेश्यते यथा ॥ १४ ॥ येणेचि उपदेश देस । माझे शिप्य सनकादिक । अभ्यासवळे अलोलिक । निजात्म१ज्याचा आदि नाही असं २ खाम ३ सरवगुणापासून मत करणाची उत्पत्ति सरी, पण ते मायेचच काय आहे ४ विवेकी पुश्पसुद्धा ५ त्याविषयी ६ फीकाळी ७ चचल ८ पोत, कोपळा, पिशवी ९ उणीव १० सावधपणाने मनाचे नियमन करून ११ महामावना १२ आसन स्थिर फस्न आसनजय पराया १३ गुदस्थानस्थित पहिल आधारचम शानेश्वरी अ०६-९२-९८ पहा १४ योगाच्या मागास १५ वायूस १६ संसारी मनुष्य मुदा १७ भुरोटेला. १८ सोडून जातो १९ तणपा, सपथ २० मागान